वृद्धाश्रमासाठी नाव सुचवा

Submitted by लालशाह on 10 June, 2013 - 02:45

नमस्कार माबोकरानो.
पुण्याच्या जवळ निसर्गरम्य ठिकाणी एक वृद्धाश्रम काढण्याचा विचार असून सर्व तयारी झाली आहे. हे वृद्धाश्रम नॉन प्रोफिट ऑर्गानायझेशन नसून प्रोफिट ऑर्गानेयझेशन असेल. पैसेवाल्या वृद्धाना दर्जेदार सोयी देण्याच्या हेतूने हे वृद्धाश्रम सुरु करीत आहोत.

ट्रस्टच्या वृद्धाश्रमातील उपकार नको आणि प्रवासातील मुक्कामाचे होटेलही नको. तर योग्य किंमत मोजून म्हातारपणी आयुष्यात नवचैतन्य निर्माण होईल असं हे घर असेल. जे वृद्धाना आपलं व हक्काचं वाटेल असं.

एक दोन वर्षात हा उपक्रम विदेशात नेण्याचाही मानस असल्यामुळे मराठी टच असलेलं आंतराष्ट्रीय नाव असायला हवं.
कृपया असं नाव सुचवून माझी मदत करा.

धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैसेवाल्या वृद्धाना दर्जेदार सोयी देण्याच्या हेतूने >> हेतू स्वच्छ आहे. कसलाही आडपडदा नसल्याने मनःपूर्वक अभिनदन आपले.

जिव्हाळा, वात्सल्य, मातोश्री, निवारा यापेक्षा हटके ठेवा काहीतरी. वृद्धाश्रम वाटलाच नाही पाहीजे.
ली मेरीडिएन, मेरीयट, धूम, यो अशी नावं हल्लीच्या काळात चालायला काय हरकत आहे ?

" उधळण" अस नाव ठेवा>> नाव छान आहे पण या नावाची आंतराष्ट्रिय पातळीवर अडचण होईल. मराठी कम इंग्लीश वगैरे काही सुचतं का बघा!

पैसेवाल्या वृद्धाना दर्जेदार सोयी देण्याच्या हेतूने >> हेतू स्वच्छ आहे. कसलाही आडपडदा नसल्याने मनःपूर्वक अभिनदन आपले. >> +१
'स्टे @ होम' - हे नाव कसे वाटते ?

Rejoice

मला ह्यात पैशांची उधळण वाटत नाही. कुणी आपणहून वृद्धाश्रमात जात नाही. वृद्धत्व ही अपरिहार्य गोष्ट आहे, श्रीमंत असो वा गरीब. गात्रं थकल्यावर दोन्ही स्टेटसच्या माणसांना कुणीतरी देखभाल करायची, विश्रांती घ्यायची गरज भासतेच. घरी कुणी देखभालीसाठी उपलब्ध नसेल तर आजी आजोबा इथे येऊन रहाणार. फरक इतकाच की त्यांच्याकडे पैसा आहे व ते तो देऊ करुन त्यांच्या लाईफस्टाईलला साजेश्या बर्‍यापैकी सुविधा मिळवू शकतात. बाकी वृद्धापकाळाची आजारपणं, अडचणी सगळ्यांना सारख्याच.

उलट पैसे देऊ शकणारे लोक चांगलंच करत आहेत. ज्यांना कुणी सांभाळणारं नाही आणि पैसाही नाही अश्यांच्या सेवार्थी वृद्धाश्रमातल्या जागा ते अडवत नाहीयेत.

लालशाह, तुमचा हा प्रोजेक्ट उत्तम चालला तर इतर मोठ्या मोठ्या श्रीमंत हॉस्पिटल्समध्ये जश्या गरीब रुग्णांसाठी काही प्रोव्हिजन्स असतात तसंच वेळ पडलीच तर गरीब वृद्धांसाठीही अल्प प्रमाणात का होईना कराल Happy

तुमच्या वृद्धाश्रमासाठी नाव - "जरा विसावू या वळणावर"

पोस्ट दुखावणारी वाटली तर बिनशर्त डिलिट करेन.

केश्विनी +१. चांगला उपक्रम आहे. पैसे उधळून आनंद वगैरे वाचून विचित्र वाटले. त्यांचे पैसे आहेत, त्यांनी स्वतःला चांगल्या सोयीसाठी वापरले तर उत्तमच आहे की. दुसर्‍याने पैसे कसे खर्च करावे (उधळावे) ते ठरवणारे आपण कोण??

नावे सुचली तर इथे लिहेन. वर सुचवलेले निवांत नाव आवडलं मला.

Rainbow

जरा विसावू या वळणावर हे या विषयावरील मालिकेसाठी चांगले नाव वाटते. बाकी अश्विनी के यांचे विचार पटले.

सेकंड इनिंग्स ठेवा नाव. केश्विनी म्हणतेय ते शतशः पटले. सो प्लस वन. Happy
तुमचा उपक्रम/व्यवसाय यशस्वी होवो.

सांजवात (आयुष्याच्या सायंकाळी हा दिवा प्रकाशाचा दिलासा देतो)
ममता (वृद्धापकाळ हे दुसरे शैशव असल्यामुळे तीच ममता ह्या वृद्धांना इथे मिळेल)
अनुभव संचय (आयुष्यात अनेक अनुभव घेऊन परिपक्व झालेली जुनी खोडं एकत्र येणार म्हणून)
वटवृक्ष (ह्या वृक्षाचे आयुष्य खूप असते आणि ह्याच्या पारंब्या ह्याचा आधारही बनतात आणि नव्या वृक्षाची रुजवातही करतात)..

नाईट वॉचमन!
लास्ट होम / लास्टिंग वे / फायनल होम
फायनल इनिन्ग
हेवन बॉर्डर (बॉर्डर ऑफ हेवन)
कैलाश!

Pages