महाबळेश्वरच्या बाजारातील मेवा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 June, 2013 - 14:29

काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरला गेले होते. निघतानाच्या दिवशी सकाळीच बाजारात गेलो आणि तिथल्या ह्या ताज्या मेव्याने मन एकदम फ्रेश करुन टाकले.

१) स्ट्रॉबेरीज

२)

३) करवंदे

४)

५) तुती

६)

७)

८) अंजीर

९) जांभळे

१०)

११) ताजे ताजे गाजर

१२) लाल मुळा

१३) हे छोटे टोमॅटो आहेत ना?

१४) चेरी, लिची

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटोज!
ते गाजर तर कसले फ्रेश दिस्ताहेत. आपल्याकडे येईपर्यंत त्यांची रयाच जाते पार Sad

बीबीचं नाव वाचुन स्वतःच्या मनाला हज्जारदा बजावलं होतं की हे पेज ओपन नको करुस....
आता जीव जळतोय नुसता......
आत्ताच्या आत्त्त महाबळेश्वरला पळायची इच्छा होतेय......
कसलं तोंपासु आहे हे

रिया >>>बीबीचं नाव वाचुन स्वतःच्या मनाला हज्जारदा बजावलं होतं की हे पेज ओपन नको करुस....
आता जीव जळतोय नुसता......
आत्ताच्या आत्त्त महाबळेश्वरला पळायची इच्छा होतेय......
कसलं तोंपासु आहे हे<<< अगदी अगदी मी हेच म्हणत पेज उघडलं Happy
ती जांभळं तर आता उचलावीशी वाटताहेत. जागू दुष्ट कुठली Happy दे आताच्या आता दे मला .... भ्या SSSS

अहाहा.. महाबळेश्वरला या सीझनला जाणं म्हणजे स्वर्ग रानमेव्याकरता. मस्तच फोटो जागू.

मस्त फोटो जागू! Happy

आपण फळाच्या वाट्याचा आकार बघुन घेतो >> मग तुम्ही वेडे आहात Proud
त्या करंड्यांमधे मॉस भरून त्यावर फळे ठेवतात ते त्या वाट्याचं आकारमान मोठं दिसावं म्हणून नव्हे, तर त्या मॉसवर पाणी मारून त्यातला ओलावा टिकवून ठेवता येतो, आणि त्यामुळे फळे खराब होत नाहीत.

केपी, आमच्याकडे येतात हो ती गाजरं Wink

बरं हो मंजुडे. महाबळेश्वरची येतात का पण?

जागु कधीचे फोटो आहेत हे? म्हणजे या रविवारी गेले तर त्या मलबेर्‍या मिळतील का विचार करतोय. Happy

मस्त गं.. मोबाईलवर फोटो उघडत नव्हते त्यामुळॅ कधी एकदा ऑफिसात येते आणि फोटो पाहते असे झालेलेल..

मला स्ट्रॉबेरीज एवढ्या आवडत नाही पण इतर सर्व प्रकारच्या बेरीज आवडतात. तुती तर एकदम आवडती. (माझ्या अंगणात झाड होते... )

त्या करंड्यांमधे मॉस भरून त्यावर फळे ठेवतात ते त्या वाट्याचं आकारमान मोठं दिसावं म्हणून नव्हे, तर त्या मॉसवर पाणी मारून त्यातला ओलावा टिकवून ठेवता येतो, आणि त्यामुळे फळे खराब होत नाहीत.
<<
अधिक माहितीबद्दल धन्यवाद.
पण मग पुण्यात मंडईत पुठ्ठ्याच्या खोक्यात स्ट्रॉबेर्‍या व लोटगाडी भरून ओले अंजिर किलोने विकतात तिथला ओलावा कसा काय टिकून रहातो? पुणेकरांच्या मायेचा ओलावा असेल बहुतेक तो. Wink

सगळ्या सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

केपी मे च्या अखेरीस गेले होते. आत्ता गेलात तरी मिळतील. फक्त स्ट्रॉबेरीजची साइझ छोटी आहे. जाने-फेब्रु च्या दरम्यान मोठी येतात. पण बाकी मेवा मिळतोय.

आणि मी तिथल्या वातावरणाचे फोटो टाकेन आज किंवा उद्या. अप्रतिम वातावरण आहे. इथला उकाडा तिथे आजिबात जाणवत नाही. मला तर छोट्या मुलीसाठी तिथून ब्लँकेट विकत घ्याव लागल इतका गारवा सकाळ-संध्याकाळ आहे. शिवाय सकाळी ढगही येतात. मी संध्याकाळ पर्यंत फोटो टाकतेच. तुम्ही जाऊनच या आता. आम्ही घरी आल्यावर इथल्या उकाड्याने असे वाटले की अजून काही दिवस तिथे रहायला पाहीजे होते.

मला फक्त त्या बेर्‍यांमधे विंटरेस्ट आहे. बाकी आत्ता तिथले वातावरण अप्रतिमच असते. वाईला पण वाईच चक्कर टाकता येईल. Happy

चिन्नु वरची दिनेशदांची नोट वाच Lol

केपी मग जा लवकर पाउस पडायला लागल्यावर कदाचीत कमी मिळतील.

दिनेशदा आम्ही खोक्यात पॅक करून आणला मेवा पण अगदी निघतानाच घेतला त्यामुळे चांगला राहीला. त्यात अंजीर, स्ट्रॉबेरी, लिची, चेरि अशी फळे होती.

जागू, अफलातून फोटो. मलाही स्ट्रॉबेरीज जास्त आवडत नाहीत. पण एकदा भल्यामोठ्या स्ट्रॉबेरीज आणि त्याही गोड मिळाल्या होत्या महाबळेश्वरात. तुती आणि त्या दुसर्‍या बेरी मात्र खूप आवडतात. तुती म्हटलं की "तुतीच्या झाडावर रेशमाच्या किड्याचे कोष असतात" हे शाळेतल्या पाठ्यपुस्तकातलं वाक्य आठवतं.

Pages