महाबळेश्वरच्या बाजारातील मेवा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 June, 2013 - 14:29

काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरला गेले होते. निघतानाच्या दिवशी सकाळीच बाजारात गेलो आणि तिथल्या ह्या ताज्या मेव्याने मन एकदम फ्रेश करुन टाकले.

१) स्ट्रॉबेरीज

२)

३) करवंदे

४)

५) तुती

६)

७)

८) अंजीर

९) जांभळे

१०)

११) ताजे ताजे गाजर

१२) लाल मुळा

१३) हे छोटे टोमॅटो आहेत ना?

१४) चेरी, लिची

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! Happy

मी कधीतरी ऐकलं आवळे म्हणजे गूजबेरीज् ..

आवळे मुळात बेरीज् असतात का? त्यांनां इंग्लीशमध्ये काय म्हणतात?

ह्ह तेच तर .. ह्या वरच्या गूजबेरीज् आवळे नक्कीच नाहीत ..

मला नाही वाटत आवळे म्हणजे गूजबेरीज् .. मृ?

हो. बघूनच तृप्त व्हावे.
अंजीराच्या टोपलीत भरलेले मॉस पहा आधी Wink

ब्लॅकबेरी की रास्प्बेरी की काय मंतात ती माझी आवडती :क्ष

त्यावरच्या ज्यांना गूजबेरी लिहिलं आहे त्या ब्लॅकबेरीज आहेत (म्हणजे मी लंडनला विकत घेतलेल्या तेव्हा त्यांचे हे नाव होते तिथे लिहिलेले.)

अंजीर आणि जांभळे तर खुपच छान. मस्त मेवा आहे एकदम.
नं ५ (जे गूजबेरी लिहिलय) मला मलबेरि (तुति) वाटतायत आणि नं ६ रासबेरिसारखा प्रकार वाट्तोय.

वरून पाचव्या फोटोत आणि सातव्या फोटोत बाजूला ज्या आहेत त्या ब्लॅकबेरीज् अमेरिकेतल्या अनुभवावरून .. Lol

मधल्या वेगळ्याच दिसत आहेत ..

सशल, अन्जू, एच., प्राजक्ता, सशल, इब्लिस, स्वाती धन्यवाद.

जर नावे चुकली असतील तर नक्की सांगा.

इब्लिस अंजीरच्याच नाही स्ट्रॉबेरीजच्याही वाट्यांमध्ये मॉस असते.

गुजबेरी म्हणजे "आवळे" माझ्याकडे आयकियातुन आणलेला "गुजबेरी प्रिझर्व आहे त्यावर आवळ्या.न्च चित्र आहे.

छान आहे रानमेवा!! खासकरुन करवंद. बा द वे, पिकलेल्या करवंदाना काळी मैना पण म्हणतात ना?
ग़ूसबेरी म्हणजे आवळे. मी ह्या स्प्रिंग मधेच त्याचे रोप लावले आहे.

जागू, मस्त आहे महाबळेश्वरचा मेवा! अगदी हवाहवासा वाटणारा! तुतीचे झाड आहे माझ्याकडे. पण बाकीचा मेवा मात्र तोंपासु.

सुंदर फोटो!

पानांच्या सजावटीसगटचे स्ट्रॉबेरीज आणि करवंदांचे फोटो, तसंच मुळा आणि गाजराचे फोटो जास्तच आवडले.

आहाहा... काय ताजी आणि रसरशीत फळं आहेत.... मस्त!!!!

जांभळं आणि करवंद बघुन तोंपासु... इथे मिळत नाहित Sad

त्या तुतीच्या (मलबेरी) शेजारच्या boysenberries आहेत का?

जागु लै म्हणज लै म्हणजे लैच भारी. Happy लाळेरे लावावे लागणार तोंडाला. त्या सर्वातील तुती ही अतिचशय प्रिय गोष्ट. Happy

तुती म्हणुन जे आहे त्यालाच विकणारा माणुस मलबेरी म्हणत होता. मस्त असते त्याची चव.
मला ते स्ट्रॉबेरी पेक्षाही जास्त आवडले. Happy

फोटो मस्तच.
लाल मुळा रॅडिश नाव सार्थ करतोय. Happy

इब्लिसराव, आपण मॉस म्हणता ते फीलर आहे.
आपण फळाच्या वाट्याचा आकार बघुन घेतो तर आतमध्ये हे सुकलेले मॉस / गवत / काड्या अर्धी वाटी भरुन ठेवलेलं असतं. Lol

लोक्स, आता बेरीज मध्ये वजाबाक्या, बेरजा, गुणाकार, भागाकार करुन त्याचा पण श्रावण घेवडा करतील की काय?? Biggrin

Pages