मेथीच्या चौघड्या

Submitted by Geetanjalee on 6 June, 2013 - 02:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मेथी ( कोवळी ) १ वाटी , धुवून , लसुण चेचून , हिंग मीठ , नेहमीची कणिक १ वाटी पण थोडी घट्ट मळलेली, तूप

क्रमवार पाककृती: 

अतिशय सोपी, झटपट आणि पौष्टिक अशी हे पारंपारिक रेसिपी आहे . तेलात लसूण आणि हिंग टाकून फोडणी करावी आणि त्यात लगेच थोडे पाणी टाकावे

ह्याला थोडीशी उकळी आली कि त्यात मेथीची भाजी टाकून हलवायचे , २ मिनिटे परतून परत त्यात १ ते २ ग्लास पाणी आणि मीठ घालायचे

ताट झाकून शिजायला ठेवून द्यायचे.

आता कणिकेची आपण पोळी करताना लाटतो तशी चौघडी लाटायची , पण पीठ न लावता , तेल लावून. चौघडी पातळ असावी म्हणजे लवकर शिजते .

आणि भाजीला उकळी आली कि त्यात सोडून १-२ मिनिटे झाकायची आणि आता गरम गरम तूप टाकूनच खायची

अधिक टिपा: 

ह्यात मेथीच्या भाजीवरच चव अवलंबून आहे त्यामुळे भाजी कडवट नसावी .

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीतांजली, मी ही रेसिपी परवाच करून पाहिली. चौघड्या मात्र किती मोठ्या चालतील ह्याचा अंदाज नसल्याने साधारण पुरीच्या गोळ्याएवढ्या आकाराची कणीक घेऊन, तेल लावून केल्या. पदर शिजून पूर्ण सुटून गेले नाहीत पण मोकळे झाले होते. फोडणीत मेथी घालून जरा परतून घेऊन मग पाणी घातले कारण घरी मेथीचा कच्चा वास आवडत नाही. मेथीत थोडा कांदा बारीक चिरून घेऊन परतला कारण कांदा खूप आवडतो आणि मेथी थोडी कमी पडेल असे वाटले. थोडे दाण्याचे कूट सुद्धा घातले पाण्याल दाटपणा येण्यासाठी. रेसिपी चांगली वाटली. बेळगावचं थंड, पावसाळी वातावरण असल्याने गरम गरम खायला तर छानच लागली. Wink

व्वा....खुप जुनी आठवण झाली. Happy
थंडीच्या दिवसात अशी मेथीची पाण्याची उकळती भाजी आणि त्यात आम्ही आख्ख्या पोळ्या सोडायचो. त्या लगेच नरम होतात की ताटात घेउन वरुन पुन्हा मेथीची ही आमटी टाकुन गट्टम करायचं. लसुण भरपुर टाकाय्चा मात्र. एकदम तोंपासु.

सोनचाफा,

पुरीच्या गोळ्याएवढ्या कणीकेचा आकार बरोबर आहे ….

हि रेसिपी पाउस पडताना खाताना अगदी मस्त वाटते ….

Geetanjalee
https://pot-puja.blogspot.in