कैरी का कचुमर..

Submitted by सुलेखा on 4 June, 2013 - 04:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

या दिवसात कच्च्या कैर्‍या खूप मिळतात. या कैरीपासुन तयार केलेले एक भन्नाट चवीचे कचुमर करुन पहा.भात,पोळी,भाकरी बरोबर खायला अप्रतिम ..यासाठी लागणारे जिन्नस असे आहेंत :--
अजुन एक म्हणजे यासाठी मोठ्या भोकाच्या किसणीचा वापर करायचा आहे.
कैरीचा किस एक वाटी,
कांदा किस एक वाटी,
किसलेला गुळ अर्धी वाटी ,
कोथिंबीर व पुदिना पाने जाडसर चिरलेली प्रत्येकी अर्धी वाटी,
एक चमचा जिरे,
प्रत्येकी अर्धा चमचा हिरवी मिरची व लसुण पेस्ट.[आवडीप्रमाणे कमी-जास्त चालेले.]
लाल तिखट-मीठ चवीप्रमाणे,
अर्धी वाटी पाणी,
कच्चे धणे व जिरे यांची पुड एक चमचा,
अर्ध्या कांद्याची वरचीच एक गोल वाटी--वाटीसारखी एक पाकळी,
एक कोळ्सा [धुरीसाठी]
२ चमचे तूप.
हे सर्व मिश्रण एकत्रीत करण्यासाठी एक मोठा बाऊल व त्यावर बसेल असे एक झाकण .

क्रमवार पाककृती: 

सर्व प्रथम गॅस वर कोळसा गरम करायला ठेवा.लाल रंगाचा होईपर्यंत हा निखारा तापवायची आहे.
एका मोठ्या बाऊल मधे किसलेली कैरी व कांदा तसेच कोथिंबीर पुदिना,हिरवी मिरची-लसुण पेस्ट,गूळ,जिरे,तिखट -मीठ,धणेजिरे पुड,पाणी असे सर्व जिन्नस एकत्र करुन हाताने छान कालवुन घ्यावे .रसदार मिश्रण तयार होईल्.तसेच गूळ विरघळल्याने पाणी सुटेल
आता कांद्याची गोल वाटी या मिश्रणाच्या मधोमध ठेवुन त्यात गॅसवर तापवलेला कोळशाचा लाल निखारा चिमट्याने ठेवावा.
त्यावर तूप टाकुन लगेच बाऊलवर झाकण ठेवावे.
२ मिनिटाने झाकण काढुन निखारा बाहेर काढुन टाकावा ,कांद्याच्या वाटीत्ले तूप मिश्रणावर घालुन ती वाटीही बाहेर काढुन टाकावी.
आता सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळावे.
चटकदार "कैरी कचुमरचा" आस्वाद घ्यावा.

अधिक टिपा: 

हे कचुमर एका वेळेसच संपवायचे आहे.टिकाऊ नाही.

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकार.
सुक्या माश्यांच्या किसमूरला पण अशी धुराची फोडणी देतात.

नेहमीसारखीच भारी आहे रेसिपी.

वैभव, माळवी पाककृतीचे जे मूळ नाव आहे ते लिहिले असावे.

बहिष्कृत माबोकर,
माळवी खासियत प्रमाणे कवठाची चटणी--
कवठाची चटणी भरपूर कोथिंबीर्आणि लसुण, तिखटाच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची,जिरे ,तिखट व मीठ घालुन करतात्.यात गूळ मात्र घालत नाही.
कचुमर म्हणजे बारीक वाटलेली चटणी नाही तर लहान लहान चिरलेल्या/किसलेल्या साहित्याचे एकत्रीत केलेले कालवण किंवा कोशिंबीर.

वैभव,
काही पदार्थांची नांव ज्या त्या भाषेत घेतली कि नेमक्या वस्तुचा "फील "येतो.जसे--पराठा,नान्,फुलका,तंदुरी,रोटी,तरीवाली सब्जी,रायता,चाट,पकौडी,....दाल

वैभव, माळवी पाककृतीचे जे मूळ नाव आहे ते लिहिले असावे.>>>>>
वैभव,
काही पदार्थांची नांव ज्या त्या भाषेत घेतली कि नेमक्या वस्तुचा "फील "येतो.जसे--पराठा,नान्,फुलका,तंदुरी,रोटी,तरीवाली सब्जी,रायता,चाट,पकौडी,....दाल>>>>>>>>>>>>>>>>>

भरत, सुलेखा, तसंही असेल पण माझाही कुरापत काढण्याचा हेतु नव्ह्ता, वाटलं ते बोललो, असो गै. स. न.
चालु दया Happy

मस्त!! Happy