फोटोग्राफी स्पर्धा..जुन.. "कळत नकळत"..निकाल

Submitted by उदयन.. on 3 June, 2013 - 06:11

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " जुन " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या वेळी विषय ठरवत असताना "स्ट्रीट फोटोग्राफी" हा विषय डोळ्यासमोर आला. फोटोग्रॉफी प्रकारांमधे हा प्रकार विशेष आहे... म्हणुन या वेळेला हा विषय आम्ही विचार करुन निवडला.. पण हा प्रकार प्रोफेशनल मधे येतो.. झुम आउट, विशिष्ट कोन पकडुन फोटो काढणे. इत्यादी बरेच ऑप्शन यात येतात.. "स्ट्रीट फोटोग्राफी" मधे फोटो हे रस्त्यावरच्या घडामोडींवरचे असतात..लोकांचे हावभाव, काही विशिष्ट घडणार्या गोष्टी.. इत्यादी टिपणे या प्रकारात अपेक्षित असते. लोकांच्या न कळत त्यांचे फोटो काढणे त्याचबरोबर त्या फोटोंमधे रस्त्यावर घडणार्या घडामोडी येणे ...हे मुख्य वैशिष्ट्ये आहे या विषया मधे....

हौशी लोकांसाठीच हा विषय थोडा वेगळा करुन "कळत नकळत" असा केलेला आहे.. फोटो रस्त्यांवर घडणार्या घडामोडींचे आणि लोकांना न क़ळत काढलेले हवे.यात काहीही समावेश करता येईल...

निकाल

प्रथम क्रमांक: आशुचँप - हितगुज

ashuchemp 1st.jpgद्वितीय क्रमांक: अमित मोरे - जपानी तरुणी

amit more 2nd.jpgतृतिय क्रमांक - इंद्रधनुष्य – कॉमनमॅन

IMG_4933.JPGउत्तेजनार्थ :-

१) अंकु - ग्राहकाची वाट बघणारी बाई

anu uttejanarth 2.jpg

२) माझी भटकंती - मी आले, निघाले

mazi bhatakanti uttejnarth 3.JPG

३) अगो - फुगेवाले जोडपे

ago uttejanarth 1.jpg

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :

१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी"

२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा"

४) फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची

५) फोटोग्राफी स्पर्धा.. मे..."खेळ मांडला"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहेली, खाली दिलेली लिंक बघा. पिकासा वरुन मायबोली वर फोटो कसे टाकायचे याची माहिती आहे त्यात. साईज तुम्हाला योग्य वाटेल ती द्या.

http://www.maayboli.com/node/43465

सहेली, ही पोस्ट टाकायच्या चौकोनाखाली "मजकूरात image किंवा link द्या." असे वाक्य आहे, त्यातिल image वर क्लिक केलेत की सगळे समजेल. १५३ (की १७३?) केबी पेक्षा लहान आकाराचा फोटू इथेच अपलोड करता येतो, अन तो मलाही दिसतो Proud पिकासावरुन टाकलेत तर माझ्याकडून त्याचा अजाणता "अनुल्लेख" होईल जे करणे मला आवडत नाही.

स्पर्धेसाठी नाही, पण इंटरेस्टिंग स्ट्रीट फोटो आहेत म्हणून देत आहे
पहिला फोटो ऑगस्ट २०१२ मधला आहे. आम्ही रहात होतो तिथपासून आयफेल टावरपर्यंत चालत जाताना बार्क्या कंटाळला चालून चालून. मग त्याला गाड्यांकडे बघत चालायला सांगितले तर रमला जरासा. ही एकदमच आवडली म्हणून सेलफोन वर काढला फोटो

Aneesh in paris.jpg

मग आमची लंडन अन पॅरिसची कौतुकं ऐकून बहीण अन तिचा नवरा कुठल्यातरी टूर कंपनी तर्फे दहा दिवसात १२ देश टाइप टूर वर गेले ऑक्टोबरमधे. पॅरिसमधे जेमतेम एक दिवस होता त्यांना. दुसर्‍या दिवशी यूरो डिस्नेला न जाता त्यांनी अजून एक दिवस पॅरिसमधेच काढला. त्यांनी तिथे फिरताना काढलेला फोटो

Mita kotian In Paris.jpg

पहिला एका हिलस्टेशनवर काढलेला.
आणि दुसरा महेश्वरच्या (इंदोर) रस्त्यावर काढलेला. (मला दोन फोटोंच्या मधे मजकूर टाकता येत नाहीये. )

DSC_0871.jpgDSC_2255~1.jpg

लिंबुदा, तुम्हाला दिसावेत म्हणून इथूनच अपलोड केलेत.

>>>> टळटळीत उन्हात हिच्या कूल स्माईल ने फ्रेश वाटलं <<<<<
ढगाळलेल्या पावसाळी हवेत एसीमधे बसलेले अस्ताना टळटळीत उन्हासारखे पान्ढरे चौकोन बघुन माझ्याही चेहर्‍यावर कूल(?) स्माईल पसरतय! Proud

माझी पण येन्ट्री

१) केनडी स्पेस सेंटर नासा

Nasa.JPG

२) हॉलीवुड मधला प्रसिध्ध स्टार वॉक ऑफ फेम.....

DSC04844.JPG

@प्रितीभुषण : त्यांची साईझ अजुन कमी करण्यापेक्षा पिकासावर अपलोड करा आणि तिथून लिंक द्या.पिकासावरील फोटो इथे कसे अपलोड करायचे याबद्दल उदयचाच एक उपयुक्त धागा आहे.

पिकासा ते मायबोली फोटो देणे http://www.maayboli.com/node/43465

जपानी सकुरा मात्सुरी स्ट्रीट फेस्टिवलला काढलेला हा फोटो...
जपानी तरुणींची फोटोसाठी दिलेली मोहक भावमुद्रा आणि माझे योग्य ठिकाणी असणे.. समीकरण चांगले जमून आले.

आणि ही एक हिरवीकंच प्रे़़क्शक..

फोटो क्रमांक १ :

"पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला" असा सूर लावत, आपल्या आवडत्या श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकी मध्ये सामील झालेल्या भक्तगणांचे भाव टिपणे म्हणजे कोणत्याही प्रकाशचित्रकारासाठी एक पर्वणीच.

DSCN5796.JPG

फोटो क्रमांक २ :

मी आले, निघाले...
सजले, फुलले, फुलपाखरू झाले...

DSCN1632.JPG

>>>> माझे सगळे फोटो २६६ केबी च्या जास्त आहे कमी कसे करता येतिल <<<<
मायक्रोसॉफ्ट फोटो एडिटर मधे फोटो फाइल उघडल्यास तिथेच फोटोचा साईझ कमी करण्याची सुविधा आहे ती वापरुन साईझ कमी करता येतो (फाईलला सेव्ह अ‍ॅजने नवे नाव देऊन हे करावे म्हणजे मूळ प्रत शिल्लक रहाते)
मायबोलीची सुविधा वापरुन इथेच फोटो डकवणे स्वागतार्ह ठरेल. Happy धन्यवाद.

मोकीमी, अमित, भटकंती, मस्त फोटो.

लिंबु भाउ.......तुमच्या ऑफिस च्या बॉस चा नंबर द्या..... चांगली खरडपट्टीच काढतो त्याची... पिकासाचे फोटो दिसत का नाही.. याचा चांगलाच जाब विचारतो... अश्या भाषेत विचारतो की ... पिकासा काय इतर सगळ्याच प्रकारचे फोटो Wink तुम्हाला कंम्पुटर वर दिसु लागतील... :खोखो:.
.

फक्त पाच दिवस राहिले शिल्लक Sad पावसामुळे क्यामेरा बाहेर काढणेही अवघड जातय, मी काय करू? (मी काय करू हा प्रश्न कुणाशीतरीबोलायचय या विभागात हलवू का? Wink )

Pages