फोटोग्राफी स्पर्धा..जुन.. "कळत नकळत"..निकाल

Submitted by उदयन.. on 3 June, 2013 - 06:11

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " जुन " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या वेळी विषय ठरवत असताना "स्ट्रीट फोटोग्राफी" हा विषय डोळ्यासमोर आला. फोटोग्रॉफी प्रकारांमधे हा प्रकार विशेष आहे... म्हणुन या वेळेला हा विषय आम्ही विचार करुन निवडला.. पण हा प्रकार प्रोफेशनल मधे येतो.. झुम आउट, विशिष्ट कोन पकडुन फोटो काढणे. इत्यादी बरेच ऑप्शन यात येतात.. "स्ट्रीट फोटोग्राफी" मधे फोटो हे रस्त्यावरच्या घडामोडींवरचे असतात..लोकांचे हावभाव, काही विशिष्ट घडणार्या गोष्टी.. इत्यादी टिपणे या प्रकारात अपेक्षित असते. लोकांच्या न कळत त्यांचे फोटो काढणे त्याचबरोबर त्या फोटोंमधे रस्त्यावर घडणार्या घडामोडी येणे ...हे मुख्य वैशिष्ट्ये आहे या विषया मधे....

हौशी लोकांसाठीच हा विषय थोडा वेगळा करुन "कळत नकळत" असा केलेला आहे.. फोटो रस्त्यांवर घडणार्या घडामोडींचे आणि लोकांना न क़ळत काढलेले हवे.यात काहीही समावेश करता येईल...

निकाल

प्रथम क्रमांक: आशुचँप - हितगुज

ashuchemp 1st.jpgद्वितीय क्रमांक: अमित मोरे - जपानी तरुणी

amit more 2nd.jpgतृतिय क्रमांक - इंद्रधनुष्य – कॉमनमॅन

IMG_4933.JPGउत्तेजनार्थ :-

१) अंकु - ग्राहकाची वाट बघणारी बाई

anu uttejanarth 2.jpg

२) माझी भटकंती - मी आले, निघाले

mazi bhatakanti uttejnarth 3.JPG

३) अगो - फुगेवाले जोडपे

ago uttejanarth 1.jpg

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :

१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी"

२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा"

४) फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची

५) फोटोग्राफी स्पर्धा.. मे..."खेळ मांडला"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा फोटो स्पर्धेसाठी नाही देत कारण एकतर क्लिअर नाहीये आणि अगदी लहान आहे. पण मोह आवरला नाही इथे टाकायचा. Happy

मला बाकीच्या पिवळ्या टॅक्सींमधे एकच काळी गाडी हे दाखवायचे होते Happy

photo (9).JPG

संकल्पना आवडली. प्रथमच भाग घेत आहे.

प्रवेशिका - १

सिअ‍ॅटलमधील प्रसिद्ध 'पाईक प्लेस मार्केट' मधे लग्न आटोपल्या नंतर फोटोसेशन साठी उभ्या असलेल्या करवल्या. त्यांच्या नकळत मागच्या बाजूने टिपलेलं हे छायाचित्र.

प्रवेशिका - २

कात्रज रस्त्यावरील भरधाव मोटरसायकल टिपण्याचा एक प्रयत्न.

माझा एक छोटा प्रयत्न
महाबळेश्वर च्या बाजार पेठेत फिरताना काढलेला हा एक फोटो.. ग्राहकाची वाट पाहणारी बाई Happy
Picture 026 - Copy.jpg

>>>> अय्य्य्या तिच्या हातात कोंबडी आहे <<<<<
नन्तर ती कोम्बडी (की कोम्बडा?) ग्राहक अंकूच्या हातात आली असावी! Wink

अवल, सुन्दर मुलिचा दिमाखदार फोटो Happy (विषयानुरूप असेल/नसेल, पण मला आवडला.)
अन्कुरी, मस्तच, अगदी बुढ्ढीके बाल विकणारा छोटामुलगा देखिल कबुतरान्शी खेळू पहातोय.

ओह, अस आहे होय. माझ्या स्क्रिनवर सगळेच धुसर दिसते Sad
काल मेव्हण्याच्या इथे फ्लॅट स्क्रिनवर सगळे फोटो पाहिले, कसले मस्त सुस्पष्ट दिसतात. अगदी मी टाकलेले फोटो देखिल इतके क्लिअर दिसत होते तिथे!

, पण ते बुढ्ढीके बाल तिकडे मागे अड्कवले आहेत.>>>>>>>>>.मलाही ते त्या मुलाच्या उजव्या हातात आहेत असच वाटलं. Happy

विषय थोडा अवघड दिलाय. पण तरीही ठेवणीतील हा फोटो उपयोगी पडतो का पाहू या.

भरपेट जेवण झाल्यावर आठवण होते ती विड्याची. या विड्याच्या पानांचा मोठा आठवडेबाजार पानांसाठी प्रसिद्ध असलेल्या बारामती इंदापूरजवळील निमगाव केतकीत रस्त्याच्या कडेला भरतो. येथून विड्यांच्या पानांचा लिलाव होतो.
Picture 002 copy.jpg

हा फोटो स्पर्धेसाठी नाही.
कोकणातल्या एका रस्त्यावरून जात असताना गाडीतून घेतलेला फोटो.

फेरफटका, दुसरा फोटो - विषय मस्तच, तिथे त्याव्ळेस फोटो काढावा हे सुचणेच महान. Happy फोटो बघुन मला खुदुखुदु हसायला आले.

बर, उदयन, एक करता येईल का? प्रश्नाच्या उत्तरान्करता गुणश्रेणी देण्याची सोय आहे तसे येथिल प्रत्येक फोटोच्या पोस्टवर करता येईल का?

नको.... गुण..... महीनाभर सगळे एकाच पातळीवर.. समसमान असतात... निकालाची आतूरता संपुन जाईल...
.
शिवाय.. जजेसनां पण काही काम राहू द्यावे...;)

Pages