फोटोग्राफी स्पर्धा..जुन.. "कळत नकळत"..निकाल

Submitted by उदयन.. on 3 June, 2013 - 06:11

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " जुन " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या वेळी विषय ठरवत असताना "स्ट्रीट फोटोग्राफी" हा विषय डोळ्यासमोर आला. फोटोग्रॉफी प्रकारांमधे हा प्रकार विशेष आहे... म्हणुन या वेळेला हा विषय आम्ही विचार करुन निवडला.. पण हा प्रकार प्रोफेशनल मधे येतो.. झुम आउट, विशिष्ट कोन पकडुन फोटो काढणे. इत्यादी बरेच ऑप्शन यात येतात.. "स्ट्रीट फोटोग्राफी" मधे फोटो हे रस्त्यावरच्या घडामोडींवरचे असतात..लोकांचे हावभाव, काही विशिष्ट घडणार्या गोष्टी.. इत्यादी टिपणे या प्रकारात अपेक्षित असते. लोकांच्या न कळत त्यांचे फोटो काढणे त्याचबरोबर त्या फोटोंमधे रस्त्यावर घडणार्या घडामोडी येणे ...हे मुख्य वैशिष्ट्ये आहे या विषया मधे....

हौशी लोकांसाठीच हा विषय थोडा वेगळा करुन "कळत नकळत" असा केलेला आहे.. फोटो रस्त्यांवर घडणार्या घडामोडींचे आणि लोकांना न क़ळत काढलेले हवे.यात काहीही समावेश करता येईल...

निकाल

प्रथम क्रमांक: आशुचँप - हितगुज

ashuchemp 1st.jpgद्वितीय क्रमांक: अमित मोरे - जपानी तरुणी

amit more 2nd.jpgतृतिय क्रमांक - इंद्रधनुष्य – कॉमनमॅन

IMG_4933.JPGउत्तेजनार्थ :-

१) अंकु - ग्राहकाची वाट बघणारी बाई

anu uttejanarth 2.jpg

२) माझी भटकंती - मी आले, निघाले

mazi bhatakanti uttejnarth 3.JPG

३) अगो - फुगेवाले जोडपे

ago uttejanarth 1.jpg

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :

१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी"

२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च.."भावमुद्रा"

४) फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची

५) फोटोग्राफी स्पर्धा.. मे..."खेळ मांडला"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा फोटो बहुतेक स्पर्धेत बसेल असं वाटतय. (नसेल तर इथुन काढुन टाकेन)

हा कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर (ज्यालाच अंबाबाई मंदीर असही म्हणल जातं) इथे काढलाय.
मागे मंदिराचे शिखर दिसत आहे, तर समोरील भाग म्हणजेच गरुड मंडप.
कोणाचं दर्शन झालय, कोणी फेरी मारतय, कोणी दर्शन घेवुन चिन्तेचा भार देवीवर सोडुन निवांत, तर कोणी तरिही काळजीत...

1

बा द वे, इतके प्रतिसाद आणि फोटु फारच कमी आलेत म्हणुन लगेच जुनेच फोटु शोधुन शोधुन हा फोटो सापडलाय.

हा दुसरा फोटो.
आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात तुकाराम महाराजांची पंढरपुरच्या वारीला निघालेली पालखी मुक्कामी असते.
त्या वारीच्या तयारीतील भक्तगण.
मागे मंदीर दिसतय. वारीच्या स्वागताचे फलक विषयाची माहिती देत आहेत..

1

अजुन तरी विषयाच्या खुप जवळ जातील असे फोटो सापडले नाहीत.
किंवा मला विषय अजुन कळत नकळत असावा. Happy
म्हणजे कळालाय पण अजुन हातात नाही आलाय असं काहिसं....

झकास, धाग्याच्या नावात ’कळत-नकळत’ म्हणूनच लिहीलय. कुणाला कळत तर कुणाला नकळत असा विषय. Proud

झकोबा पासून स्फुर्ती घेऊन......
(पण हे स्पर्धेची एन्ट्री म्हणून नाहीत! Sad अतिशय सूमार दर्जाचे क्यामेरा सेटीन्ग, पण तरीही विषयानुरूप आहे म्हणून वेलदुर बंदरावरिल फेरीबोटीचा हा एक फोटो नमुन्यादाखल, येथे अजुनही बरेच फोटो काढलेत पण विषयानूरुप जास्त सन्ख्येने व्यक्तिरेखा नसल्याने देणे टाळतोय)

Dabhol bandar 1 DSCN1068.jpg

आता टाकतोच आहे, तर फेरीबोटीतील प्रवासाचा हा एक (कृपया रस्ता "स्ट्रीट" कुठे आहे असे विचारू नये Proud )

या फोटोत उजव्या हाताला पाठमोरी बाईक दिसते तीवरील भगवी पिशवी पुढील प्रवासात निसटुन पडली, पुन्हा उलटे वीसेक किमि परत येऊनही मिळाली नाही, रोकड/दागदागिने असा जवळपास ३५हजाराचा ऐवज गेला! लिम्बीच्या सर्व डायर्‍या/पुस्तके गेलि!
या फोटोन्ची हीच एक सणसणीत आठवण व त्या पिशवीचे "शेवटचे" दर्शन! सरते वर्षाच्या शेवटच्या दिवशी, नविन वर्षाचे स्वागत करताना हा झटका जिव्हारी बसला होता. अन पुढे दापोलित काकाकडे गेलेले असताना काही झालेच नाही असे दर्शविणे खूप कठीण गेले होते.
Dabhol pheriboat 1 DSCN1073.jpg

असो.
हा एक "रस्ता अन त्यावरील "वर्दळीचा" दूर्मिळ फोटो Proud
असेच एकदा लिम्बीच्या गावी जात असताना चढावर टूव्हीलर चढली नाही, सबब आधीच खाली उतरुन हेल्मेटधारी लिम्बी पायीपायी येत असताना, असा क्षण टीपण्याच्या मोह कसा सुटावा? Wink
Limbi walking on Road DSCN0104.JPG

पावसाळ्यात मरिन ड्राइवला काढलेला फोटो मैत्रिणिंबरोबर भटकताना पावसाचे क्षण टिपावसे वाटले... सोनी एरीक्स्नच्या अगदी साध्या मोबाइल मधुन घेतलेला माझा एक आवडता फोटो Happy

Image035_0.jpg

हे चालतील का?

पहीले प्रचि त्रिवेंद्रमच्या कोवलम समुद्रकिनार्‍यावर घेतलेले आहे. जवळ-जवळ दिड-दोन तासाच्या अथक धडपडीनंतर सुद्धा जाळ्यात अपेक्षित संख्येने मासे न सापडल्याने विचारात पडलेले मच्छीमार...
अलिप्तपणे बघत असलेला एक बघ्या...
आणि तन्मयतेने त्या मच्छीमारांची धडपड कॅमेर्‍यात शुट करणारी एक विदेशी स्त्री !

दुसरे चित्र मुन्नारच्या हिलटॉप पॉईंटकडे जाणार्‍या चिंचोळ्या रस्त्यावर...
आपले बोट धरावे म्हणून लेकीच्या मागे लागणार्‍या बापाला जणु काही ऐकुच आले नाही अशा अविर्भावात धुडकावून लावणारी अतरंगी पोर...

rohtang.jpg

हा फोटो रोहतांग पास वर काढला आहे. साधारण ४ वर्षांपूर्वी (एन - ८२ वापरून )

रोहतांग पासच्या अरुंद रस्त्यावर एक मेंढ्यांचा कळप चालला होता. फोटो कडे मेंढपाळांचे लक्ष नाही (मेंढ्यांच्या आणिक मेंढपाळांच्या नकळत काढलेला फोटो) पण अगदी लक्षपूर्वक बघीतल तर लांबवर बसलेल्या तीन बायकांच फोटो कडे लक्ष आहे असा भास होतोय
(बायकांच्या नजरेतून काही सुटत नाही म्हणतात Proud )

>>>> पण अगदी लक्षपूर्वक बघीतल तर लांबवर बसलेल्या तीन बायकांच फोटो कडे लक्ष आहे असा भास होतोय <<<<
तो भासच्च आहे!
[नै त काय मेलं? बायकांच आपल्याकडेच लक्ष आहे/असते असा भास तर अनेकान्ना सदासर्वकाळ होत अस्तो! Proud ]

प्रवेशिका १ : सिमला येथील मॉल रोडवरील चौक

IMG_1897.JPG

प्रवेशिका २ : बाघा बॉर्डर येथील भारत व पाकिस्तानमधील रस्त्यावरील "स्वर्ण जयंती" प्रवेशद्वार

Picture 615.jpg

माझ्याकडे १० ते १२ फोटो आहेत इथे टाकण्यासारखे (म्हंजे विषयाला धरून फोटो म्हणून भारी नाहीत Happy ) बेश्टॉप २ घेता का Wink
असो टाकते आज .

उदयन, विषयाचे विश्लेषण चान्गले दिलय हां तुम्ही! Happy
फक्त अशा दृष्यान्चे ऐनवेळेस फ्रेमिन्ग करताना "ऑब्जेक्ट" काय घ्यावा अन काय नको असे होते, कित्येकदा ऑब्जेक्ट हरवूनच जातो, किन्वा सम्पुर्ण फ्रेमच ऑब्जेक्ट बनलेली असते. असो. येथुन पुढे हे भान लक्षात ठेवुन आणता येईल. जसजसा एकेक फोटो येतोय, तसतसे अधिक समजत जातय.
छान विषय.

१) पारंपारिक वेषात , उत्साही टूरिस्टांना फिरवणारी रिक्षा
२)एका गजबजलेल्या कॅनॉल रस्त्यावर, आपल्या मैत्रीणीसाठी हा बहाद्दर आर्त सूर आळवतोय! त्यासगळ्या गर्‍दीला बेदखल करून !
३) म्युनिकच्या एका बिझी चौकात उभा हा कलाकार.
DSCN5500_0.JPGIMG-20110522-00431.jpgIMG-20120510-00385.jpg

उदयन, विषयाचे विश्लेषण चान्गले दिलय हां तुम्ही!
फक्त अशा दृष्यान्चे ऐनवेळेस फ्रेमिन्ग करताना "ऑब्जेक्ट" काय घ्यावा अन काय नको असे होते, कित्येकदा ऑब्जेक्ट हरवूनच जातो, किन्वा सम्पुर्ण फ्रेमच ऑब्जेक्ट बनलेली असते. असो. येथुन पुढे हे भान लक्षात ठेवुन आणता येईल. जसजसा एकेक फोटो येतोय, तसतसे अधिक समजत जातय.
छान विषय.
>>>> लिंब्या - या प्रकारच्या फोटोग्राफिमध्ये जसे काही वेळेस मुद्दाम एखादे पाठमोरे कलरफुल ऑब्जेक्ट त्या फोटोचे सौंदर्य वाढवते (वानगीदाखल खाली फोटो देत आहे) तसेच कुठलेही स्पेसिफीक ऑब्जेक्ट (माणसे) नसताना वेगवेगळ्या माणसांचे नॅचरल हावभाव (जसे की रेल्वे स्टेशन, एखादा चौक, बस स्टँड, बाजार ई.) आपोआप फोटोत कॅप्चर होतात (जसे माझ्या वरील २ फोटोत आहेत).

AAP_6.JPG

>>>> काही वेळेस मुद्दाम एखादे पाठमोरे कलरफुल ऑब्जेक्ट <<<<
नशिबवान आहात! Wink
आम्ही काढलेल्या फोटोत जेव्हातेव्हा ऑब्जेक्ट एकच एक! लिम्बी! Proud
असो, पण उदाहरण कळले Happy या महिन्यात या विषयावर खूप शिकायला मिळणार आहे असे दिसते.

इन्ना, छान Happy

सुंदर फोटो!

मयुरींचा पावसाळ्यातला मरीन ड्राइव्ह आणि विशालचा 'बोट नको, मी चढते' मुलगी-बाबा फोटो विशेष आवडले.

उदयन, खुप फोटो असल्याने मला हे बीबी इथून बघता येत नाहीत. सर्व महिन्यांच्या विजेत्या फोटोंचा एखादा वेगळा बीबी करता येईल का ?

दिनेश दा............ विजेत्यांचा फोटो मी वर धाग्यात निकाल झाल्याबरोबर लावतो.... तुम्ही विजेते फोटो प्रत्येक महिन्याच्या धाग्यांमधे बघु शकतात ... आपल्याला शोधायची आवश्यकता नाही आहे Happy

आणि काही खास फोटोंसाठी एक वेगळा धागा उघडायचा विचार आहे

स्वराली.........................
.
.
धन्यवाद........ न्युयोर्क टाईम्स चा देखील छान होता......

स्ट्रीट फोटोग्राफी सारखा आगळा वेगळा विषय निवडल्या बद्दल ज्युरी टिमचे मनापासून कौतुक! कारण या अवघड विषयाचे परिक्षण करणं म्हणजे डोक्याला भुंगा...

ज्यांचा या विषयात गोंधळ उडालेला आहे त्यांनी Google वर स्ट्रिट फोटोग्राफी सर्च करा... बरिच उपयुक्त आणि अभ्यासु माहिती टिपां सकट दिलेली आहे.

प्रचि १
वरळी सीफेस वर फिरताना काही मुलं आपल्या तक्रारी कॉमनमॅनशी शेअर करताना दिसली.. त्या वेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने त्या मुलांनी सरळ कॉमनमॅनचा ताबा घेऊन त्याला आपलासा केला होता. त्यांचं हे हितगुज क्लिक करण्याचा केलेला प्रयत्न...

प्रचि २
म्हैसुर पॅलेस तर अप्रतिम आहेच, तसेच समोर बागही तितकीच सुंदर आहे. या बागेतील भटकंती दरम्यान तळपत्या उन्हात चवताळलेल्या सिंहाचे टिपलेलं हे शिल्प...

IMG_8147

हा रिसाईज केलेला फोटो पांढर्‍या चौकोनांचा निषेध नोंदवणार्‍यांसाठी :p
IMG_4933.JPGIMG_8147.JPG

हा रिसाईज केलेला फोटो पांढर्‍या चौकोनांचा निषेध नोंदवणार्‍यांसाठी

>> Happy

पण काहीही म्हणा.. लिंबुजींचा या बीबीवरचा उत्साह अगदी पाहण्यासारखा असतो.

Pages