Submitted by बागेश्री on 28 May, 2013 - 01:07
सोपं नसतं,
आपल्या अस्तित्वाची वळकटी करून ठेऊन
एखाद्याच्या पायाखालचा गालिचा होणं!
आपलं सुंदर असणं जपताना,
त्याच्या यशापयशाची पाऊलं झेलणं.....झेलत राहणं
नसतंच सोपं....!
कधी अनवाणी, कधी धूळ माखली
कधी कुणाच्या ओढीनं धावत गेलेली,
तर कधी अनिच्छेने परतून आलेली....... पाऊलं
आपलाही रंग कसा टिकावा, कायम...
सतत झेलत राहिल्यावर?
अस्वच्छ होऊ,
धूतले जाऊ,
वाळवले जाऊ....!
शेवटी विरलो म्हणून टाकून दिले जाऊ....
आता,
अनावधानाने आपणच कुठेतरी ठेवलेली,
आपली वळकटीही.......... हरवलेलीच!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त ! आवडली
मस्त !
आवडली
मस्त... .. आवडली..! पु.ले.शु!
मस्त... .. आवडली..!
पु.ले.शु!
वाह, खूप सुंदर ....
वाह, खूप सुंदर ....
ह्रदयस्पर्शी !!! बागू
ह्रदयस्पर्शी !!!
बागू गुस्ताखी मुऑफ सखे !
सोपं नसतं,
आपला आवडता कार्यक्रम गुंडाळून ठेवून
त्याच्या क्रीकेट-मॅचसाठी रिमोट देणं !
मालिकेतील आगामी घटनांची उत्सुकता ताणली जात असताना,
त्याच त्या निरस कॉमेंट्रीची कलकल झेलणं...झेलत राहण
नसतचं सोपं....!
कधी सस्पेंस, कधी फ्लॅशबॅक
कधी अचानक ट्वीस्ट घेतलेली
तर कधी मूळ पदावर परतून आलेली....स्टोरी
आपल मूळ अस्तित्व कसं टिकवाव कोणी ?
सतत पहात राहिल्यावर
यातल गलिच्छ राजकारण !
भ्रमिष्ठ होऊ,
भरकटले जाऊ,
चेकाळले जाऊ...!
शेवटी मूर्ख म्हणून दुर्लक्षिले जाऊ....
आता,
अनावधानाने आपणच कुठेतरी ठेवलेल,
टिव्हीच रिमोटही.... हरवलेलच !
सुप्रिया - जबरी, जबरीए ...
सुप्रिया - जबरी, जबरीए ...
कसली गुस्ताखी, सखे? फारच
कसली गुस्ताखी, सखे?
फारच उत्कृष्ट विडंबन आहे हे, माझ्या रचनेपेक्षा जास्त आनंद देऊन गेली तुझी पोस्ट... मजा आया
आपला आवडता कार्यक्रम गुंडाळून ठेवून

त्याच्या क्रीकेट-मॅचसाठी रिमोट देणं !>>>
असं होतं खरं
आवडेश
आवडेश
<<<फारच उत्कृष्ट विडंबन आहे
<<<फारच उत्कृष्ट विडंबन आहे हे, माझ्या रचनेपेक्षा जास्त आनंद देऊन गेली तुझी पोस्ट... मजा आया >>>
ओय !!!
निखळ गम्मत म्हणून घे, तुझ्या रचनेच्या जवळपासही फिरकायची कुवत नाहीये यात !
धन्स !
-सुप्रिया.
वा बागेश्री ! चांगलं लिहिलय्स
वा बागेश्री !
चांगलं लिहिलय्स तू पण समारोप मला जरा अजून व्यापक असता तर अधिक आवडला असता
प्रस्तावनेतल्या विचाराला आणि पुढे येत येत गेलेल्या वळणाना अजून एका पायरीने का होईना उंचावर नेणारा असा नाही वाटला
आपलं सुंदर असणं जपताना,<<<< मला तुझ्या कवितेत सर्वात अधिक आवडतं ते हेच तुझं सौंदर्यावर असलेलं नितांत प्रेम आतून बाहेरून अतीशय सुंदर लिहितेस तू अगदी तुझ्या अवलोकनात मधुबालाचा फोटो असण्यातही ते सौंदर्यपूजन आहे ज्य्ताबद्दल मी कधी तुझी टिंगल केली असली तरी मला त्याबद्दल मनातून नितांत आदर वाटतो तुझा !!!
असंच लिहीत जा !

वर एक विडंबन आलेलं आहे तुझ्या सखीचं त्यात एक बदल करावासा वाटतो
>>>>यातल गलिच्छ फिक्सिंगचं राजकारण !<<<<
असो
~वैवकु
'अस्तित्वाची वळकटी' ही
'अस्तित्वाची वळकटी' ही संकल्पना फार आवडली.
कवितेचा विषय आपल्या आधीच्या कवितांमधून थोड्याफार फरकाने येऊन गेलेला आहे असे वाटते. यू हॅव पोटेन्शियल टू ब्रिंग मोर सब्जेक्टस थ्रू पोएट्री.
कवितेचे 'वळकटी' हे नाव मला व्यक्तिशः आवडले असते.
बागेश्री, उत्तम रुपक! फार
बागेश्री, उत्तम रुपक! फार आवडली कविता.
सुप्रिया, तुमचेही रुपक मस्तच
वा सुंदर आवडेश
वा सुंदर आवडेश
कविता आणि विडंबन दोन्ही मस्त
कविता आणि विडंबन दोन्ही मस्त
सुप्रियातै नवा धागा काढ
वैवकू, आणि मला तुझ्या
वैवकू, आणि मला तुझ्या प्रतिसादांबद्दल हेच आवडतं, की तू प्रत्येक रचनेला, स्वतंत्र समजतोस, ती प्रत्यक्ष जगण्याचा प्रयत्न करतोस- समरूप होऊन आणि मग परखड मत देतोस.
शेवटासाठी सहमत आहे, व्यापकतेबद्दल अगदी निश्चित विचार करेन.
विदिपा,
तुम्ही गेल्या दोन वर्षांत अनेकदा मला हे सुचवलं आहे... पण माझा परिघ विस्तृत नसावा की काय, की ह्या भावनेतले रुपकं संपल्याशिवाय माझी सुटका नाही वा मीच पुढाकार घेत परिघाला छेद देण्यासाठी प्रयत्न करावाच, हे ठरवायला हवंय.
बेफी, केदार खूप आभार
विनायक, वर्षे, शशांक, तुमचं मत कळालं नाहीतर काहीतरी मिसिंग वाटत रहातं, धन्स मित्रांनो
व्वा! दोन्ही कविता मस्तच.
व्वा! दोन्ही कविता मस्तच.
सुप्रियांनी जे केलेले आहे
सुप्रियांनी जे केलेले आहे त्याला विडंबन का म्हंटले जात आहे लक्षात आले नाही.
सुप्रियांनी जे केलेले आहे
सुप्रियांनी जे केलेले आहे त्याला विडंबन का म्हंटले जात आहे लक्षात आले नाही.<<<<:हाहा:
ती कविता आहे असेही म्हणता येत नाही म्हणून असेल बहुधा
कविता आवडली.
कविता आवडली.
सुंदर सुंदर बागेश्री.. अन
सुंदर सुंदर बागेश्री..
अन सुप्रियाची टिप्पणीही.
वा! कविता आवडली
वा! कविता आवडली बागेश्री!!
मला खरंतर समारोपही आवडला.
Pulasti
Pulasti
कविता आवडली. सुरुवातीच्या ओळी
कविता आवडली.
सुरुवातीच्या ओळी उल्लेखनीय.
व्वा!! मस्तय..... कधी
व्वा!! मस्तय.....
कधी अनवाणी, कधी धूळ माखली
कधी कुणाच्या ओढीनं धावत गेलेली,
तर कधी अनिच्छेने परतून आलेली....... पाऊलं
आपलाही रंग कसा टिकावा, कायम...
सतत झेलतं राहिल्यावर?
अस्वच्छ होऊ,
धूतले जाऊ,
वाळवले जाऊ....!
शेवटी विरलो म्हणून टाकून दिले जाऊ....
>>> बेस्ट... एकदम थेट..
रचना आवडली !
रचना आवडली !
जीवनातला कडवट अनुभव सोप्या
जीवनातला कडवट अनुभव सोप्या आणि प्रभावी शब्दात मांडलाय..... छान.
आवडली
आवडली
आपल्या आस्तित्वाची वळकटी
आपल्या आस्तित्वाची वळकटी बनली........येथवर ठीक
पण? ती हरवू नये!!! ( आपल्या उशाशीच ठेवावी---एक माझा विचार...कालांतराने-
येईल कामास)
असो कविता मात्र झकास.
आवडली.
आवडली.
Vijayajee.... welcome तुमचा
Vijayajee.... welcome
तुमचा तो विचार वाचण्यास उत्सुक
देव काका... टायपो दुरुस्त
देव काका...
टायपो दुरुस्त करते आहे
Pages