गालिचा

Submitted by बागेश्री on 28 May, 2013 - 01:07

सोपं नसतं,
आपल्या अस्तित्वाची वळकटी करून ठेऊन
एखाद्याच्या पायाखालचा गालिचा होणं!

आपलं सुंदर असणं जपताना,
त्याच्या यशापयशाची पाऊलं झेलणं.....झेलत राहणं
नसतंच सोपं....!

कधी अनवाणी, कधी धूळ माखली
कधी कुणाच्या ओढीनं धावत गेलेली,
तर कधी अनिच्छेने परतून आलेली....... पाऊलं

आपलाही रंग कसा टिकावा, कायम...
सतत झेलत राहिल्यावर?
अस्वच्छ होऊ,
धूतले जाऊ,
वाळवले जाऊ....!
शेवटी विरलो म्हणून टाकून दिले जाऊ....
 
आता,
अनावधानाने आपणच कुठेतरी ठेवलेली,
आपली वळकटीही.......... हरवलेलीच!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि मला तुझ्या प्रतिसादांबद्दल हेच आवडतं, की तू प्रत्येक रचनेला, स्वतंत्र समजतोस, ती प्रत्यक्ष जगण्याचा प्रयत्न करतोस- समरूप होऊन आणि मग परखड मत देतोस.
>>> Rofl

Rofl

Rofl

Pages