फ्रेंच ओपन टेनिस - २०१३

Submitted by Adm on 24 May, 2013 - 08:49

यंदाच्या वर्षीच्या क्ले कोर्ट सिझनचा शेवट करणारी आणि उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २६ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. ब्रिटीश अँडी मरेने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. महिलांमध्ये अग्रमानांकीत सेरेना विल्यम्स, गतविजेती मारिया शारापोव्हा आणि तृतिय मानांकीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांच्यात विजेतेपदाची चुरस असेल. गेल्यावर्षी पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसलेली सेरेना विल्यम्य यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि नदाल एका हाफमध्ये आले आहेत तर फेडरर आणि फेरर एका हाफमध्ये आहेत.

मानांकिन खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील:
जोकोविक वि. टिपरार्विच
नदाल वि गॅस्केट
फेरर वि बर्डीच
त्सोंगा वि फेडरर

सेरेना वि कर्बर
राडावान्स्का वि इर्रानी
ना ली वि अझारेंका
क्विटोव्हा वि शारापोव्हा

स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शारापोव्हा एकदाची फायनलला पोहोचली आहे !
मला वाटलं पहिल्या सेटमध्ये परवा सारखच होणार.. पण आज ते दुसर्‍या सेटमध्ये झालं..
सर्व्हिसचं काहितरी करायला पाहिजे राव ! किती ते डबल फॉल्ट्स !

आता सेरेना वि इर्रानी..

पूनम, फेडरर हारणारच जोको जिंकणारच हे कुठल्या स्टॅट्सवर आधारीत निकाल आहेत म्हणतेस ?

सेरेना इन सुपरफॉर्म.. मला नाही वाटत कालचा शारापोव्हाचा खेळ पहाता की ती फायनल जिंकु शकेल.
सारा इर्रानीपेक्षा टफ फाईट देईल फार फार तर.
साराला तर काल सेरेनाच खेळ अजिबातच झेपला नाही. मला तर वाटलं होतं सेरेना ६-०,६-० च टाकणार मॅच खिशात.
सेरेनाला मानलं पाहिजे. वयाचा काहीही परिणाम जाणवत नाही तिच्या खेळावर.

मयुरेश अगदी !
सारा इर्रानीने फारच अपेक्षाभंग केला.. ती चांगली फाईट देईल असं वाटलेलं खरं म्हणजे.
शारापोव्हाने खेळ फारच उंचावला, मधेच ढेपेगिरी केली नाही, सर्व्हिस नीट केली तरच ती जिंकू शकेल.

आजच्या दोन्ही मॅचेस सही होतील अशी अपेक्षा आहे. चारही जण डबल हँडेड खेळणारेच आहेत. सो मज्जा आनेको मांगता.. Happy
ज्योको आणि फेरर फायनल व्हावी अशी इच्छा आहे.. पण ते नदाल आणि त्सोंगावर अवलंबून आहे :फिदी:.

मला ज्योकोचं एक आवडतं. जेव्हा त्याला प्रतीस्पर्ध्याचा एखादा शॉट आवडतो तेव्हा खुल्या दिल्याने तो तिथल्या तिथे त्याचं कौतुक करतो. परवा हासलाही अशीच दाद दिली त्याने. आपला पॉईंट गेला म्हणुन उगाच तोंड वेंगाडत बसला नाही. Happy

म्हणूनच मला राफा वि ज्योको मॅचेस आवडत नाहीत.. !!
पण मॅचेस मस्त होणार दोन्ही..

राफा...... राफा........!
ज्योको.....ज्योको.. !!
त्सोंगा.... त्सोंगा...... !!! Happy

मला ज्योकोचं एक आवडतं. जेव्हा त्याला प्रतीस्पर्ध्याचा एखादा शॉट आवडतो तेव्हा खुल्या दिल्याने तो तिथल्या तिथे त्याचं कौतुक करतो. >> जोकोने एका ऑस्ट्रेलियन (अथवा अमेरिकन) फ़ायनलला फ़ेडरर विरूद्ध चिटीन्ग करून जिन्कण्याचा गुन्हा केला आहे. फ़ेडरर जिन्कत असताना निष्कारण वेळ घालवून आणि प्रेक्षकान्ना फ़ूस देउन.
जिन्कत असताना सगळेच स्पोर्टस्मन स्पिरीट दाखवतात.
असो.

माझ्या दृष्टीने आज पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना असल्यासारखी परिस्थिती आहे. कोणी का जिन्केना.

जोको आणि नादालच्या सामन्यात मला त्यान्चे दोघान्चेही अशक्य आउट्प्लेस्ड पोझिशन मधून मारलेले विनर्स आणि पासिन्ग शॉटस मात्र बघायला आवडतात,

त्रिविक्रमा,फेडीच्या बाबतीत कधी केलय हे ज्योकोने? मी ती मॅच पाहिली नसावी.

जिन्कत असताना सगळेच स्पोर्टस्मन स्पिरीट दाखवतात....>>>
अमेरिकन ओपनच्या एका मॅचमध्ये ज्योकोने फेडीच्या मागे मारलेल्या शॉटला फेडीने धावत मागे पळत जाऊन दोन पायांच्या मधुन शॉट मारत उत्तर दिलं होतं आणि पॉईंट मिळवला होता तेव्हा तर ज्योकोने टाळ्या वाजवुन त्याचं कौतुक केलं होतं आणि ती मॅचही फेडीच जिंकला होता. Happy

शारापोव्हा फायनला आली की आनंद होतो.. पण मग समोर ताकदवान सेरेना आहे म्हटल्यावर आनंदी आनंद.. निकाल आधीच कळतो.. ! यावेळी शारापोव्हा चमत्कार करते का ते पहायचेय..

फेडररचा 'तेंडुलकर' झालाय.. Sad आता राफा वि. जोको.. कोणी का जिंकेना, .. पण जोको जिंकलेला आवडेल..

स्टॅट्स लागतात म्हणजे काय ? तुम्ही एवढं छातीठोकपणे हा हारणारच होता तो हरणारच होता म्हणता म्हणून विचारलं. असं काय बॉ नक्की सिक्रेट आहे ज्यामुळे तुम्हाला आधीच माहिती असतं. एवढी वर्षं सातत्याने गेम फॉलो करून आम्हाला कसं ते गावलं नाही. Proud

Pages