यंदाच्या वर्षीच्या क्ले कोर्ट सिझनचा शेवट करणारी आणि उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २६ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. ब्रिटीश अँडी मरेने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. महिलांमध्ये अग्रमानांकीत सेरेना विल्यम्स, गतविजेती मारिया शारापोव्हा आणि तृतिय मानांकीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांच्यात विजेतेपदाची चुरस असेल. गेल्यावर्षी पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसलेली सेरेना विल्यम्य यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि नदाल एका हाफमध्ये आले आहेत तर फेडरर आणि फेरर एका हाफमध्ये आहेत.
मानांकिन खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्या अश्या होतील:
जोकोविक वि. टिपरार्विच
नदाल वि गॅस्केट
फेरर वि बर्डीच
त्सोंगा वि फेडरर
सेरेना वि कर्बर
राडावान्स्का वि इर्रानी
ना ली वि अझारेंका
क्विटोव्हा वि शारापोव्हा
स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..
मारिआ
मारिआ शारापोव्हा............
नदाल..........................:)
चला.. परागभाऊंनी आपले नेहमीचे
चला.. परागभाऊंनी आपले नेहमीचे कर्तव्य इमानेइतबारे पार पाडले आहे... आता बाकीच्यांनी चर्चा सुरू करून आपले कर्तव्य पार पाडा.. .
पुरुषांमध्ये माझ्या मते नदाल किंवा ज्योको आणि महिलांमध्ये सेरेना किंवा अझारेंका..
ज्योको आणि नदाल एकाच गटात असल्यामुळे फेडी निदान फायनलपर्यंत तरी पोहोचेल अशी आशा आहे... .
फेडरर जिंदाबाद!
फेडरर जिंदाबाद!
आला का बा फ! नदालच
आला का बा फ!
नदालच जिंकणार!
फेडरर म्हातारा झाला, त्यातून क्ले कोर्ट! जातोय लवकरच घरी
पुढच्या फेरीत फेडरर विरुद्ध
पुढच्या फेरीत फेडरर विरुद्ध देवबर्मन... बिच्चारा देवबर्मन... गेल्या वेळेस पण कुठल्यातरी स्लॅम मध्ये पहिली राऊंड जिंकल्यावर दुसरी राऊंड जोकोअ विरुद्ध होती...
या वर्षी नदाल वि ज्योको अशी
या वर्षी नदाल वि ज्योको अशी सेमी होण्याची शक्यता आहे असे वाचले.
यूरो.. हो... कारण ते दोघे
यूरो.. हो... कारण ते दोघे एकाच हाफ मध्ये आहेत... तसेच फेडरर विरुद्ध फेरर दुसरी सेमी होऊ शकेल...
व्हिनस विल्यम्स आणि नादिया पेट्रोव्हा ह्या दोघी सीडेड खेळाडू पहिल्याच दिवशी स्पर्धेतून बाहेर गेलेल्या आहेत..
नदालचा खेळ सध्या बहरात आहे.
नदालचा खेळ सध्या बहरात आहे. तरी पण ज्योको व नदाल यात जो विजयी होइल तो खूप दमला असेल ६ तास सामना खेळून. म्हणून फ़ेडररच विजेता होणार.
कळावे, लंडनला भेटू.
पराग... आणी ग्रँड स्लॅम
पराग... आणी ग्रँड स्लॅम टेनिसचा धागा उघडणार नाही अस कस होईल?
विक्रमसिंह.. फारच विशफुल थिंकिंग! मला फेडरर किंवा राफा दोन्हीपैकी कोणीही जिंकले तरी चालेल पण ज्योको व नदाल यात जो विजयी होइल तो खुप दमलेला असेल ६ तास सामना खेळुन दमतील हे विधान तुमच्यासारख्या जाणकार टेनिसप्रेमीनी करावे याचे नवल वाटले... नदालला गेल्या ८ वर्षात व ज्योकोला गेल्या ३-४ वर्षात दमलेला कोणी पाहीला आहे का?
पण आज पहिल्या फेरीत नदालला अनपेक्षितपणे कडा मुकाबला करायला लागला.. पण जोपर्यंत ज्योको किंवा फेडरर रोलाँ(?) गॅरसवर नदालला हरवत नाहीत तोपर्यंत माझ्या मते नदाल विल ऑल्वेज बी फेव्हरेट हिअर..
व्हिनसने आता रिटायर व्हावे.. सालाबादप्रमाणे यंदाही ती नुसती हजेरी लावुन गेली..
खर म्हणजे महिलांमधे गेल्या १५ वर्षात फ्रेंच ओपनच काय पण कुठल्याच ग्रँड स्लॅममधे ख्रिस एव्हर्ट्-मार्टिना नवरातिलोव्हा किंवा स्टेफि ग्राफ्-अरांचा सँकेज व्हिकारिओ किंवा स्टेफी ग्राफ्-मॉनिका सेलेस यांच्यात जश्या चुरशीच्या लढाया झाल्या तश्या झाल्या नाहीत व नजीकच्या काळात होतील अशी चिन्हही दिसत नाहीत..:(
विक्रमसिंह.. फारच विशफुल
विक्रमसिंह.. फारच विशफुल थिंकिंग! >> हो. पण इथे दुसरा काही मार्ग दिसत नाही.
फेडररकडून ग्रँडस्लॅम
फेडररकडून ग्रँडस्लॅम जिंकण्याची आशा करणे आता कमी झालंय
नदालला गेल्या ८ वर्षात व
नदालला गेल्या ८ वर्षात व ज्योकोला गेल्या ३-४ वर्षात दमलेला कोणी पाहीला आहे का? ...>>> हो.. गेल्या वर्षीची ऑस्ट्रेलिअन ओपनची फायनल. तेव्हा शेवटी शेवटी दोघही पार दमले होते.. नदाल जास्तच. कारण ट्रॉफी प्रदान समारंभाच्या वेळेस त्याची अवस्था पाहुन ज्योकोने त्याला खुर्ची दिली मागवुन.
अरे वा! तज्ज्ञ मंडळी जमली
अरे वा! तज्ज्ञ मंडळी जमली की..
धाग्यास शुभेच्छा!
मी जाते.
खर म्हणजे महिलांमधे गेल्या १५
खर म्हणजे महिलांमधे गेल्या १५ वर्षात फ्रेंच ओपनच काय पण कुठल्याच ग्रँड स्लॅममधे ख्रिस एव्हर्ट्-मार्टिना नवरातिलोव्हा किंवा स्टेफि ग्राफ्-अरांचा सँकेज व्हिकारिओ किंवा स्टेफी ग्राफ्-मॉनिका सेलेस यांच्यात जश्या चुरशीच्या लढाया झाल्या तश्या झाल्या नाहीत व नजीकच्या काळात होतील अशी चिन्हही दिसत नाहीत..<<<<<< +१
मुख्य म्हणजे कोणत्याही महिला टेनिस खेळाडूंमध्ये तेवढी कन्सीस्टंसी दिसतच नाहीय. प्रत्येक ग्रॅन्ड स्लॅम फायनलमध्ये वेगवेगळ्या खेळाडू दिसतात. त्याही 'वन स्लॅम फायनल वंडर' वाटतात.
अरे वा जमले का सगळे.. काल
अरे वा जमले का सगळे..
काल ज्योकोचा पहिला सेट पाहिला.. एकदम नेक टू नेक झाला.. तो गॉफिन चांगला खेळत होता...
बर्डीच हरला.. पहिला खळबळजनक निकाल.. अर्थात मॅच मॉन्फिल्स बरोबर होती.. त्याला दुखापतींमुळे वाईल्ड कार्ड घ्यावं लागलं.. आता सुधारेल रँकिंग त्याचं..
मुख्य म्हणजे कोणत्याही महिला टेनिस खेळाडूंमध्ये तेवढी कन्सीस्टंसी दिसतच नाहीय. >>>> विल्यम्स वगळता सगळ्या ढेपाळतात कन्सीस्टंसी च्या बाबतीत..
मयुरेश.. खुर्चीचे अगदी बरोबर!
मयुरेश.. खुर्चीचे अगदी बरोबर! पण माझ्या आठवणीनुसार खुर्च्या दोघांनाही दिल्या होत्या.. तिथल्या ग्राउंड् किपर्सनी.. जाकोव्हिकनी नाही..
बिचारे दोघे ग्रँड स्लॅम हिस्टरी मधली लाँगेस्ट फायनल.. जवळ जवळ ६ तास खेळुन दमले होते व अॅवॉर्ड सेरिमनी मधे एकापाठोपाठ एक टुर्नामेंट ऑफिशियल्स व स्पॉन्सर्स कसले पाल्हाळ लावत होते..(मला वाटत आतापर्यंतच्या सर्व ग्रँड स्लॅम अॅवॉर्ड सेरिमनीमधे ती सगळ्यात जास्त वेळ चाललेली.. पाल्हाळ लावलेली... प्रि अॅवॉर्ड सेरीमनी असावी..:) ) शेवटी ते पाल्हाळ चाललेले असताना..तब्बल १०-१५ मिनिटे नुसते उभे राहील्यामुळे त्या दोघांचे पाय स्टिफ व्हायला लागले असावेत.. कारण खेळताना अॅथलिट्स नेहमी पाय हलवत असतात.. पळत असतात व सहा तास खेळून झाल्यावर एकदम १०-१५ मिनिटे स्तब्ध उभे राहील्यावर असे होउ शकते व पायात गोळे येउ शकतात. त्यामुळे मला वाटते की ते दमल्यामुळे बसु बसु करत नव्हते तर इतका वेळ अॅक्टिव्हली खेळत असताना एकदम असे १०-१५ मिनिटे स्टँडस्टिल राहील्यामुळे ते उभे राहु शकत नव्हते. माझ्या मनात किंचीतही संदेह नाही की नुसते उभे राहण्या ऐवजी त्यांना जर अजुन तासभर खेळायला लागले असते तरी ते जिद्दीने खेळु शकले असते इतका त्या दोघांचा स्टॅमिना व इतकी त्यांची विल पॉवर जबरदस्त आहे.
आणि हे लक्षात घे की आदल्याच दिवशी जाकोव्हिक सेमि फायनल मरे विरुद्द खेळला होता...तिही तब्बल साडेचार तास चालली होती..
२००९ फेडरर -रॉडिक विंबल्डन फायनल,२००८ फेडरर-राफा विंबल्डन फायनल , १९८१ मॅकेन्रो-बोर्ग विंबल्डन फायनल व १९८४ मॅकॅन्रो-लेंडल फ्रेंच ओपन फायनल या अजुन काही एपिक म्हणता येतील अश्या ग्रँड स्लॅम फायनल्स मला आठवतात. या प्रत्येक फायनल विषयी एक एक स्वतंत्र लेख लिहीता येतील अश्या त्या फायनल्स होत्या .(मला वाटत मी कधीतरी १९८४ मॅकॅन्रो-लेंडल फ्रेंच ओपन फायनल बद्दल लिहीले होते)
पण २०१२ नदाल्-जाकोव्हिक ऑस्ट्रेलियन ओपन फायनल म्हणजे स्टॅमिना व जिद्द याचे एक अविस्मरणिय उदाहरण होते...हॅट्स ऑफ टु बोथ ऑफ देम!
अशीच अजुन एक अविस्मरणिय फायनल यंदाही फ्रेंच ओपनला बघायला मिळो हिच इच्छा!...:)
पण २०१२ नदाल्-जाकोव्हिक
पण २०१२ नदाल्-जाकोव्हिक ऑस्ट्रेलियन ओपन फायनल म्हणजे स्टॅमिना व जिद्द याचे एक अविस्मरणिय उदाहरण होते...हॅट्स ऑफ टु बोथ ऑफ देम!>>> +१!
अवॉर्ड सेरेमनीत मला वाटतं कोणा दिग्गजाचा सत्कार (बोर्ग?) होता, त्यामुळेही सेरेमनी लांबली. दोघांनाही उभं राहवत नव्हतं म्हणून खुर्च्या दिल्या होत्या, पण भाषणं झालीच! नंतर ते दोघं स्वतःही खूप बोलले (उभं राहून)
पण माझ्या आठवणीनुसार खुर्च्या
पण माझ्या आठवणीनुसार खुर्च्या दोघांनाही दिल्या होत्या.. तिथल्या ग्राउंड् किपर्सनी.. जाकोव्हिकनी नाही.. >>> अनुमोदन !
पण २०१२ नदाल्-जाकोव्हिक ऑस्ट्रेलियन ओपन फायनल म्हणजे स्टॅमिना व जिद्द याचे एक अविस्मरणिय उदाहरण होते...हॅट्स ऑफ टु बोथ ऑफ देम! >>>> ह्यालाही अनुमोदन !
कियाचा प्रेसिडेंट बराच वेळ बोलत बसला तेव्हा..
तिथल्या ग्राउंड् किपर्सनी..
तिथल्या ग्राउंड् किपर्सनी.. जाकोव्हिकनी नाही..>> हो पण नदालला उभं रहाणं कठीण जात होतं ते पाहुन त्यांनी दिल्या आणि ज्योकोने पहिली खुर्ची नदालला बसायला दिली असं काहीसं मला आठवतय.
नंतर ते दोघं स्वतःही खूप
नंतर ते दोघं स्वतःही खूप बोलले (उभं राहून)
पौर्णिमा..
मयुरेश.. अरे जाउ दे रे.. ते दोघेही दमले होते यात काही वादच नाही... अरे शेवटी ती पण माणसच आहेत ना?
६ तास टेनिस खेळणे हे नक्कीच
६ तास टेनिस खेळणे हे नक्कीच साधी गोष्ट नाही. या दोघांचा स्टॅमिना आणि जिद्द जबरद्स्त आहेत खर तर जेत्याची मानसिकता पण हवी आणि आहे. तरी पण केवळ ६ तास खेळले म्हणून एपिक फायनल अस म्हणायला थोड जड जातं. जॉन इसनरची विंबल्डनची मॅच बरीच लाब चालली होती जरी ती फायनल नव्हती.
>> अवॉर्ड सेरेमनीत मला वाटतं
>> अवॉर्ड सेरेमनीत मला वाटतं कोणा दिग्गजाचा सत्कार (बोर्ग?) होता
रॉड लेव्हरचा सत्कार ..
खुर्च्या, पाण्याच्या बाटल्या दोघांनांही दिल्या पण ज्योको ने आधी त्याच्या हातात आलेली बाटली राफाला दिली असं माझी मेमरी सांगते ..
हे घ्या..
हे घ्या..
http://www.youtube.com/watch?v=GTrG4WYxRfs
ज्योको ने आधी त्याच्या हातात आलेली बाटली राफाला दिली असं माझी मेमरी सांगते .. >>> हो बरोबर आहे.. ज्योकोने बाटली पास केली पुढे.. पाणी द्यायला आलेला माणूस ज्योकोच्या बाजूने आला.. स्ट्रेचेस दोघेही करत होते.. राफा मागे नेटचा आधार घेऊन बसला. ज्योको ओणवा बसून स्ट्रेचेस करत होतो... शेवटी खुर्च्या आल्या..
चला. आता फ्रेंच ओपन २०१३
चला. आता फ्रेंच ओपन २०१३ बद्दल चर्चा करूयात.
फेडी सोमदेव देवबर्मनला हरवुन तिसर्या फेरीत. ज्योकोही तिसर्या फेरीत.
भूपती-बोपण्णा दुहेरीत पहिल्याच फेरीत बाहेर. पेस-मेल्झर दुसर्या फेरीत.
ली ना, वोझियांकी दुसर्याच फेरीत पराभूत. सेरेना,आझारेंका तिसर्या फेरीत.
काल ली ना फारच स्वैर खेळत
काल ली ना फारच स्वैर खेळत होती.. ! वॉझ्नियाकी पण हरली.. ती जॅन्कोविच, दिनारा साफिना वगैरेंच्या लायनीत जाऊन बसली आहे आता.. !
कालच्या बर्याच मॅचेस पावसाने राहिल्या... आज खूप आहेत त्यामुळे.
आत्ता मध्य- पश्चिम युरोपात
आत्ता मध्य- पश्चिम युरोपात बर्यापैकी थंडी आहे म्हणजे साधारण मार्च महिन्यात असते तसे वातावरण आहे. त्याचा परिणाम कितपन होईल कोण जाणे एकूण स्पर्धकांवर
टण्या मला वाटतं (अर्थात
टण्या मला वाटतं (अर्थात जाणकार प्रकाश टाकतीलच) थंडीपेक्षा जर वातावरण उष्ण असेल तर खेळाडू लवकर दमणॅ वगैरे होत असेल. थंडी could be an advantage and wind is something that they would be worried about. तिथे वारे पण आहेत का?
मी यंदा फेडेक्स आणि योको अशा दोघांना सपोर्ट करतेय महिला टेनिसमध्ये सेरेना आवडत नसल्यामुळे कुठे पैसे लावायचे ते ठरलं नाहीये पण अझारेंका आणि मारिया दोघींना चिअर अप करू शकते. बघुया कोण गूण उधळ्तं ते
काल फेडी चा टॉपस्पिन बॅकहॅन्ड
काल फेडी चा टॉपस्पिन बॅकहॅन्ड कमालीचा होता. असा जर चालला तर पुढच्या राउंड्स मधे मजा येइल.
अरे काल एक मॅच चालू होती-
अरे काल एक मॅच चालू होती- रॉबर्टॉ वि कोणीतरी (नाव विसरले). नीओ स्पोर्ट्सवर तीच एक मॅच दाखवत होते. चार सेट्सपर्यंत पाहिली. टू सेट्स ऑल होता स्कोअर. तिचा निकाल काय लागला? आज पेपरात त्या जोडीचं नावच नाही
देशात फक्त निओ स्पोर्ट्सवरच आहे ना प्रक्षेपण?
पूनम, रॉबर्टो नव्हे रॉब्रेडो
पूनम, रॉबर्टो नव्हे रॉब्रेडो आणि मॉन्फिल्स.. रॉब्रेडो जिंकला ५ सेटमध्ये.
देशात फक्त निओ स्पोर्ट्सवरच आहे ना प्रक्षेपण?...>>>हो. मला अॅड ऑन विकत घ्यायला लागला डिशमध्ये त्यामुळे
Pages