फ्रेंच ओपन टेनिस - २०१३

Submitted by Adm on 24 May, 2013 - 08:49

यंदाच्या वर्षीच्या क्ले कोर्ट सिझनचा शेवट करणारी आणि उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २६ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. ब्रिटीश अँडी मरेने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. महिलांमध्ये अग्रमानांकीत सेरेना विल्यम्स, गतविजेती मारिया शारापोव्हा आणि तृतिय मानांकीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांच्यात विजेतेपदाची चुरस असेल. गेल्यावर्षी पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसलेली सेरेना विल्यम्य यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि नदाल एका हाफमध्ये आले आहेत तर फेडरर आणि फेरर एका हाफमध्ये आहेत.

मानांकिन खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील:
जोकोविक वि. टिपरार्विच
नदाल वि गॅस्केट
फेरर वि बर्डीच
त्सोंगा वि फेडरर

सेरेना वि कर्बर
राडावान्स्का वि इर्रानी
ना ली वि अझारेंका
क्विटोव्हा वि शारापोव्हा

स्पर्धेची वेबसाईट : http://www.rolandgarros.com/en_FR/index.html

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोब्रॅडो जिंकला का? थँक्स मयूरेश. चांगली चालली होती मॅच. पण इतर कोणत्या दाखवल्याच नाहीत. सुरूवातीच्या मॅचेस आलटून पालटून इतर कोर्ट्सवरच्याही दाखवतात खरंतर.

हुश्श ! जिंकला...
काही काही विनर्स जबरी मारले.. पण एकंदरीत कोर्ट कव्हरेज गंड्ल्यासारखं वाटलं.. होपफुली पुढचा आठवडा चांगला जाईल..

शारापोव्हा किती अनप्रेडिक्टेबल खेळ्ते.. ! आज दुसर्‍या सेट्च्या सुरुवातीला किती भयंकर खेळली.. !

आज कित्येक महिन्यांनी हास-इस्नर मॅच बघितली. मजा आली.

३ वर्षापूर्वीपर्यन्त नीट फॉलो केलेय. आता तज्ञ मंडळींनी गेल्या ३ वर्षतल्या कोणत्या मॅचेस शोधून पाहू तेही सुचवा. यु ट्युबवर असतील का पूर्ण मॅचेस? १२ ची ऑसी ओपन फायनल पाहीनच.

पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दोन जोड्या
फेरर आणि रॉब्रेडो
फेडी आणि त्सोन्गा

महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीची एक जोडी
सेरेना आणि स्वेतलाना कुझनेत्सोव्हा

आजच्या सेंटर कोर्टवरच्या सगळ्या मॅचेस इंटरेस्टींग आहेत..
स्किव्होनी चांगली खेळत्ये ह्यावर्षी परत... पहिली मॅच तिची आणि अझारेंकाची.. मग ज्योको आणि राफाच्या मॅचेस.. मग स्टिफन्स वि शारापोव्हा...

कर्बरला कुझनेत्सोव्हाने हरवलं.. क्विटोव्हापण हरली.. ती वनस्लॅम वंडर होण्याच्या अधिकाधिक जवळ जाते प्रत्येक स्पर्धेनंतर.. इर्रानी तीन सेटमध्ये जिंकली..

राफा आणि पोव्हाच्या कालच्या मॅचेस चांगल्या झाल्या..
स्टिफन्स काला फार प्रभाव पाडू शकली नाही.. ज्योकोचा शेवटचा सेट पाहिला.. चांगला खेळला.. अझारेंका किरकोळीत जिंकली..
आजच्या क्वॉर्टर फायनल्स चांगल्या होतील !

कालची टाकलेली पोस्ट गंडली बहुतेक!

@ पराग
राफाच कोर्ट कवरेज मधे प्रोबलेम नाही आहे. नडाल इस गोइंग अराउंड हीज बॅकहॅन्ड. तो जास्ती जास्त बकहॅन्ड कनवर्टकरून इनसाईड आउट फोरहॅन्ड मारयचा प्रयत्नात असतो त्यामुळे त्याचे फोरहॅन्ड कोर्ट ओपन राहात आहे. फनिनी आणि नीशीकोरी यानी बरेचसे विनर राफाच्या फोरहॅन्डला मारलेले आहेत.
काल कॉमेंटेटर सांगत होता राफाच्या फोर्हॅन्ड फटक्याचा टॉपस्पिन चा वेग ६००० RPM आहे आणि तो average fastest forehand पेक्षा १००० ने जास्त आहे.

फार कमीवेळा राफाचा फोरहॅन्ड नेट मधे जातो कारण या RPM मुळे तो नेट १ फुटांवरुन क्रॉस करतो आणि बेसलाइन जवळ जावून जोरात उसळतो. हा फटका सिंगल हॅन्डेड बॅकहॅन्ड मारणरयाला निगोशीएट करणं कठीण आहे. पुढ्ची मॅच स्टॅन वावरिंका बरोबर आहे. त्याला हा फटका बराच त्रासदायक ठरु शकतो कारण तो सिंगल हॅन्डेड बॅकहॅन्ड मारतो.

वारविंका-गास्के मॅच सही झाली. एकदम क्लोज मॅच. शेवटपर्यंत अनप्रेडिक्टेबल. गास्के जिंकू शकला असता, पण मध्येच अचानकच त्याची लय जात होती.

रोब्रॅडोने अजून एक फाईव्ह सेटर जिंकली.

तो जास्ती जास्त बकहॅन्ड कनवर्टकरून इनसाईड आउट फोरहॅन्ड मारयचा प्रयत्नात असतो त्यामुळे त्याचे फोरहॅन्ड कोर्ट ओपन राहात आहे. फनिनी आणि नीशीकोरी यानी बरेचसे विनर राफाच्या फोरहॅन्डला मारलेले आहेत. >>> हो बरोबर आहे.. फनिनिच्या मॅचला तर हे खूपच वेळा झालं.. पण त्याच्याविरुद्ध काही वेळेला, (जास्तीकरून पाहिल्या आणि दुसर्‍या सेटच्या मध्यापर्यंत) बॉल त्याच्यापासून इतका लांब जात होता की तो रिटर्न मारायचा प्रयत्नच करत नव्हता.. असं सहसा त्याच्या बाबतीत होत नाही.. म्हणून कोर्ट कव्हरेजबद्दल म्हंटलं..
बाकी त्याचे क्रॉसकोर्ट फोरहँड जबरदस्त असतात!

हो.. वावरिंकाची मॅच चांगली झाली काल.. मी मधेमधे स्कोर ट्रॅक करत होतो..

पुरुषांच्या राउंड ऑफ १६ मधले ८ जणांचा बॅकहँड सिंगल हॅंडेड आहे, असे कुठेतरी वाचले.

राफाचे 'माय स्टोरी' वाचायला घेतलेय.

त्सोंगा भारी.. !!! सही खेळला.. मस्त सर्विस.. जबरी गेम.. आता त्याची आणि फेररची सेमी मस्त होणार.

फेडरर किती ढिसाळ खेळला.. ३४ अनफोर्स्ड एरर्स.. !!सर्व्हिसही ठिकच...

त्सोंगा जबरीच. सरळ ३ सेट मधे फेड्याला घरी पाठवल. पहिले ४ गेम बघता आले. सुरुवात तर फेडरर ने बरी केली होती पुढे काय झाले?

वावरिंका -नदाल बघण्या सारखी असेल. आता किती सिंगल हॅन्डेड राहातील सेमिफायनल मधे?

सुरुवात तर फेडरर ने बरी केली होती पुढे काय झाले?...>>> पहिल्या सेटमध्ये त्सोंगाचा गेम ब्रेक करून ४-३ ने पुढे होता तो. पण नंतरच्या गेममध्ये स्वतःची सर्व्हीस गमावली आणि नंतर पूर्ण खेळ ढेपाळला त्याचा :(. अन्फोर्स्ड एरर्स फारच असतात हल्ली त्याच्या विनरच्या प्रमाणात.

होप की वावरिंका चांगली लढत देईल नदालला आज.

माझं मन सांगतय की ज्योको जिंकेल ही स्पर्धा पण मेंदू म्हणतोय नदाल.. :). बघू कोण जिंकतय दोघातलं. :).

लेडीजमध्ये सेरेनाचा सध्याचा फॉर्म पहाता मला वाटत नाहीये की अझारेंका किंवा शारापोव्हा तिच्या समोर टिकाव धरू शकतील...

हरणारच होता फेडेक्स! Proud

फेररची मॅच अगदीच वन सायडेड.

पग्या, मयूरेश, तुम्ही फेडररची मॅच कुठे पाहिलीत काल? नीओ प्राईमवर फेडररची मॅच चालू होती, आणि नीओ स्पोर्ट्सवर फेररची. आमच्याकडे स्पोर्ट्सच दिसतंय फक्त Sad

सेरेनाबद्दल अनुमोदन मयूरेश.

पुरूषांचे उपांत्यपूर्व फेरीचे चारही सामने तीन सेटचे झाले. त्यातल्या त्यात टॉमी हासने ज्योकोला बरी लढत दिली अन्यथा बाकी सगळे सामने एकतर्फीच झाले.

शेरापोव्हा/यांकोव्हिचचा शेवटचा सेट पाहिला. शेरापोव्हाने डॉमिनेटिंग गेम केला. पहिला सेट ६-० हरल्यानंतर मॅच काढल्याबद्दल तिचं कौतुक करायला हवं. Happy
गो मारिया. आता मारिया आणि अझारेंका आमनेसामने येणार त्यामुळे जो कुणी जिंकेल तिला फायनलसाठी सपोर्ट करणार Proud

काल राफाची मॅच मस्त झाली ! एकदम त्याच्या नेहेमीच्या स्टाईलने खेळला !! जोरदार क्रॉसकोर्ट फोरहँड मारले.. नेटजवळही मस्त खेळला.. काल सर्व्हिसपण खूप चांगली केली.

हासने ज्योकोला जरा फाईट दिली.. पण त्याला योग्यवेळी पॉईंट्स मिळवता आले नाहीत...

शारापोव्हाने तिच्या अनप्रेडिक्टेबल खेळाचं अजून एक उदाहरण दाखवलं.. पहिला सेट किती घाण खेळली! दुसर्‍यासेट पासून खेळ उंचावतच नेला.. दुसर्‍या आणि तिसर्‍या सेटच्या सुरुवातीला ज्यांकोविकनेही जोरदार लढत दिली.. काही काही रॅलीज मस्त झाल्या.. ज्यांकोविक एखादी स्लॅम जिंकली पाहिजे खरतर...

आज पोव्हा अझारेंका चांगली होईल.. इर्रानी पण सेरेनाला चांगली लढत देईल असं वाटतय समहाऊ..

काल वावरिंकाला नडालची सर्विस रीड करता येत नव्हती. तो कायम बॅकहॅन्ड्ला पडणार हेच गृहीत धरून खेळत होता. निशीकोरी आणि फनिनी कडे काही तरी स्ट्रेटेजी तरी होती वावरिंकाने ती पण दाखवली नाही. तो आपल्या बॅकहॅणन्ड गार्ड करण्याच्या नादात बाकी सगळ विसरला बहुतेक.

राफाचा फोरहॅन्ड तलवारी सारखा चालतो आहे. रिपींग अपार्ट एवरी अपोनंट ही इज फेसिंग.

ज्योको आणि राफाची सेमी . राफाचा फोरहॅन्ड वि. ज्योकोचा जोरकस डबल हॅन्डेड बॅकहॅन्ड दोघांची रीट्रीवल आणि डीफेंस स्किल्स, मॅच बरीच लांबली तरी आश्चर्य नाही. ज्योकोवीच निशीकोरी आणि फनिनी ने वापरलेलीच स्ट्रेटेजी राफावर वापरणार. या साठी तरी मॅच बघावी म्हणतो.

जोको जिंकणार हे माहित होतंच, पण तरी हासने मस्त फाईट दिली. छान झाली मॅच.

मॅच बरीच लांबली तरी आश्चर्य नाही. >> असंच होऊदे! दोघंही मस्त खेळत आहेत. टफ होऊदे ही सेमी.

Pages