कारल्याची कोशिंबीर

Submitted by प्राजक्त्ता on 20 May, 2013 - 09:14
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ ते३ कारली, कांदा, Salt, कोथिंबीर, ओले खोबरे, साखर, तेल आणि फोड्णीकरता मोहरी

क्रमवार पाककृती: 

प्रथम कारली धुवून बारिक चिरुन घ्यावी. नंतर गरम तेलात खरपूस तळून घ्यावी. मग त्यात बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे, साखर, Salt घालून एकत्रित करावे. तयार कोशिंबीरीव्र मोहरीची फोड्णी द्यावी.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांकरता
माहितीचा स्रोत: 
शेजारच्या काकी
आहार: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ ही भाजी झाली की हो !!
तळून कोशिंबीर करतात असे कोठेच ऐकीवात नाही बघा आमच्या तरी
पण भारी लागणार ही डिश करून बघणार बघा मी
Happy

मस्त लागेल यात शंकाच नाही, पण त्या आधीच तळून घेतलेल्या काचर्‍यांवर परत फोडणीचं तेल ओतायचं धैर्य होणार नाही Wink

छान आहे रेसीपी. करुन पाहिन.
प्राजक्ता, चटणीसारख कारल्याच्या चकत्या थोड तेल लावून रोस्ट केल्या ओव्हन मध्ये तर तळायची गरज पडणार नाही अस वाटतय.

मस्त लागेल हे प्रकरण.
भाजी म्हणता येणार नाही कारण एकदा चकत्या तळल्यावर चकत्यामध्ये इतर सारा मालमसाला(फोडणीखेरिज) घालताना उष्णता द्यायची नाहीये. म्हणजे गॅसवर्,आचेवर हा पदार्थ करायचा नाहीये.

नवीन धागा काढण्याऐवजी येथेच कार्ल्याच्या भाजीचा एक प्रकार देत आहे .१तेल गरम करून त्यात थोडी लसूण चटणी परता .२ हिरव्या टोमेटोच्या (कार्ल्याच्या निम्मा अथवा कमी) काचऱ्या घालून अर्धवट शिजू द्या .३आता कार्ल्याच्या काचऱ्या ( दाबून कडू पाणी वगैरे न काढता ) टाकून शिजवा .४शेवटी मीठ घाला . ही भाजी दिसते छान ,आटत नाही . कच्चे अंबट टोमेटो आणि लसूणचटणीचा एकत्रित परिणाम होऊन कडुपणा चवदार होतो .

आमच्या सा.बा. हा प्रकार करतात.. त्या कारल्याच्या पातळ काचर्‍या खोल तव्यात तेलावर परतून घेतात. डायरेक्ट तळून वगैरे घेत नाहीत.. (नशीब माझे ! नाहीतर आवडत असूनही घशाखाली उतरलं नसतं कारलं :)). त्यात कांदा, खोबरं, कोथिंबीर, मीठ, साखर चवीपुरती..फोडणी वेगळी देत नाहीत.. नवर्‍याच्या प्रयोगात त्याने ह्यात आयत्या वेळी दही घातल्याचे आठवत आहे.. तेही वाईट लागलं नव्हतं. Srd ची भाजी सुद्धा करून बघायला हवी..टोमॅटो घालून कधी केली नव्हती.

आज केली होती. मस्त लागते. पाककृतीसाठी आभारी आहे. Happy
तळली नाहीत, शॅलो फ्राय केली आणि वरुन फोडणी घातली नाही पुन्हा. तरीही छान लागली.

Karli-Koshimbir.jpg