Submitted by प्राजक्त्ता on 20 May, 2013 - 09:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
२ ते३ कारली, कांदा, Salt, कोथिंबीर, ओले खोबरे, साखर, तेल आणि फोड्णीकरता मोहरी
क्रमवार पाककृती:
प्रथम कारली धुवून बारिक चिरुन घ्यावी. नंतर गरम तेलात खरपूस तळून घ्यावी. मग त्यात बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे, साखर, Salt घालून एकत्रित करावे. तयार कोशिंबीरीव्र मोहरीची फोड्णी द्यावी.
वाढणी/प्रमाण:
३-४ जणांकरता
माहितीचा स्रोत:
शेजारच्या काकी
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Salt ला मीठ असे म्हणतात
Salt ला मीठ असे म्हणतात
हो पण ते मला टाईपता येत
हो पण ते मला टाईपता येत नव्हते. त्याबदद्ल सॉरी.
ही भाजी झाली असे
ही भाजी झाली असे वाटतेय
चूभूदेघे
तुम्ही भाजी समजा. माझी काही
तुम्ही भाजी समजा. माझी काही हरकत नाही
सॉरी कशाला ? meeTha असे लिहा.
सॉरी कशाला ? meeTha असे लिहा.
तळलेल्या काका (कार्ल्याच्या
तळलेल्या काका (कार्ल्याच्या काचर्या) घालून कांको.
चांगली लागेल, कार्लं कसंही आवडतं.
ओ ही भाजी झाली की हो !! तळून
ओ ही भाजी झाली की हो !!
तळून कोशिंबीर करतात असे कोठेच ऐकीवात नाही बघा आमच्या तरी
पण भारी लागणार ही डिश करून बघणार बघा मी
पापडाचा खुडा की काय करतात ना?
पापडाचा खुडा की काय करतात ना? याला कार्ल्याचा खुडा म्हणायला हरकत नाही मग.
मस्त लागेल यात शंकाच नाही, पण
मस्त लागेल यात शंकाच नाही, पण त्या आधीच तळून घेतलेल्या काचर्यांवर परत फोडणीचं तेल ओतायचं धैर्य होणार नाही
छान आहे रेसीपी. करुन
छान आहे रेसीपी. करुन पाहिन.
प्राजक्ता, चटणीसारख कारल्याच्या चकत्या थोड तेल लावून रोस्ट केल्या ओव्हन मध्ये तर तळायची गरज पडणार नाही अस वाटतय.
मस्त लागेल हे प्रकरण. भाजी
मस्त लागेल हे प्रकरण.
भाजी म्हणता येणार नाही कारण एकदा चकत्या तळल्यावर चकत्यामध्ये इतर सारा मालमसाला(फोडणीखेरिज) घालताना उष्णता द्यायची नाहीये. म्हणजे गॅसवर्,आचेवर हा पदार्थ करायचा नाहीये.
नवीन धागा काढण्याऐवजी येथेच
नवीन धागा काढण्याऐवजी येथेच कार्ल्याच्या भाजीचा एक प्रकार देत आहे .१तेल गरम करून त्यात थोडी लसूण चटणी परता .२ हिरव्या टोमेटोच्या (कार्ल्याच्या निम्मा अथवा कमी) काचऱ्या घालून अर्धवट शिजू द्या .३आता कार्ल्याच्या काचऱ्या ( दाबून कडू पाणी वगैरे न काढता ) टाकून शिजवा .४शेवटी मीठ घाला . ही भाजी दिसते छान ,आटत नाही . कच्चे अंबट टोमेटो आणि लसूणचटणीचा एकत्रित परिणाम होऊन कडुपणा चवदार होतो .
धन्यवाद सीमा ओव्हनमध्ये नक्की
धन्यवाद सीमा ओव्हनमध्ये नक्की रोस्ट करुन बघेन.
आमच्या सा.बा. हा प्रकार
आमच्या सा.बा. हा प्रकार करतात.. त्या कारल्याच्या पातळ काचर्या खोल तव्यात तेलावर परतून घेतात. डायरेक्ट तळून वगैरे घेत नाहीत.. (नशीब माझे ! नाहीतर आवडत असूनही घशाखाली उतरलं नसतं कारलं :)). त्यात कांदा, खोबरं, कोथिंबीर, मीठ, साखर चवीपुरती..फोडणी वेगळी देत नाहीत.. नवर्याच्या प्रयोगात त्याने ह्यात आयत्या वेळी दही घातल्याचे आठवत आहे.. तेही वाईट लागलं नव्हतं. Srd ची भाजी सुद्धा करून बघायला हवी..टोमॅटो घालून कधी केली नव्हती.
आज केली होती. मस्त लागते.
आज केली होती. मस्त लागते. पाककृतीसाठी आभारी आहे.
तळली नाहीत, शॅलो फ्राय केली आणि वरुन फोडणी घातली नाही पुन्हा. तरीही छान लागली.