ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज २०१३ -"बेस्ट इन शो"

Submitted by लाजो on 16 May, 2013 - 09:17

ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज -"बेस्ट इन शो"

दर वर्षी प्रमाणे परवा, १४ मे रोजी आमच्या ऑफिसमधे चॅरिटी साठी बेकिंग चॅलेंज होते. त्यासाठी केलेला हा केक. केक जजेस आणि ऑफिसातील लोकांना अतिशय आवडला. तुम्हाला ही आवडेल अशी आशा करते Happy

~~~~~~~~~~~~~~~~

बेक ऑफ साठी 'सध्या बातम्यात असलेले इश्युज, मुख्य घटना इ.' अशी सर्वसाधारण थीम असते. इथे नव्या बनणार्‍या सबर्ब्ज मधे वूड फायर्ड हिटर्स वापरण्यावर बंदी आणली आहे. मुख्य कारण धूरामुळे होणारे प्रदूषण. हिच थीम घेऊन मी केक बनवला होता.

१. सर्वप्रथम दोन चॉकलेट केक्स बनवले.

२. केक्स बेक होत असताना पुठ्ठ्याचे छप्पर बनवुन घेतले. आणि पुठ्ठ्याचीच चिमणी बनवली.

३. ओट स्लयासेस वापरून भिंती बनवल्या आणि ट्रान्स्परंसी वापरून खिडक्या.

४. पुठ्ठ्याच्या छपरावर आणि चिमणीवर अ‍ॅल्युमिनियम फॉइल लावुन घेतली. छतावरच्या टाइल्स म्हणून 'आफ्टर डिनर मिंट्स'च्या चपट्या वड्या मेल्टेड चॉकलेट ने चिकटवल्या. चिमणीला मेल्टेड चॉकलेट लावुन त्यावर ओट स्लयसेसचा चुरा चिकटवला. चिमणीत कापुस भरला **

५. बॅटरी ऑपरेटेड टी लाईट कँडलवर चॉकलेट बिस्किट स्टिक्स (लाकडसारखे दिसावे म्हणून) मेल्टेड चॉकलेट ने चिकटवल्या.

ट्रान्स्परंट खिडक्यांमधुन टी कँडलची फुरफुरणारी (फ्लिकर होणारी) ज्योत अगदी वुडफायर लावल्यासारखी दिसत होती Happy

६. घर साईटवर ठेवले आणि आजुबाजुचे लँडस्केलिंग इ इ , फायनल केले. गाडी पार्क करायची जागा, पाँड, छत्री वगैरेंची जागा निश्चित केली.

७. अगदी शेवटी ऑफिसमधे गेल्यावर टी कँडल ऑन केली, भिंतींवर छत ठेवले Happy

-----

** मी खरतर अ‍ॅक्च्यल धूर येण्याची सोय केली होती. चिमणीच्या आत एक बाटलीचे छोटे झाकण अ‍ॅल्यूमिनियम फॉइल मधे गुंडाळून बसवले होते. त्यात उदबत्तीचा तुकडा लावायची सोय केली होती. अगदी थोडासाच धूर तयार होत होता. पण ही कल्पना फायनल करायच्याआधी सोमवारी बेकऑफ च्या ऑरगनायजर ला मी माझी कल्पना दाखवून परवानगी मिळेल का म्हणून विचारले. परंतू बेक ऑफ बंदिस्त हॉल मधे होणार असल्यामुळे आणि तिथे स्मोक डिटेक्टर्स असल्यामुळे धूर जरी नगण्य असला तरीही उगाच काहि प्रॉब्लेम्स नकोत म्हणून माझी कल्पना फेटाळली Sad म्हणून मला धूर म्हणून कापूस ठेवायला लागला...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चॅलेंज मधे केलेले केक्स्/पेस्ट्रीज इ इ ऑक्शन करतात. यंदा २५-३० एक एंट्रीज होत्या. $१२५० जमा झाले.

यंदाची चॅरिटी होती 'पेगॅसस'. अपंग मुलांसाठी हॉर्स रायडिंग शिकवणारी सेवाभावी संस्था आहे. या संस्थेचे कार्य पूर्णतः डोनेशन्स वर चालते. इथे काम करणारे देखिल सगळे वॉलेंटिअर्स आहेत. मध्यंतरी पुरेशी डोनेशन्स न मिळाल्यामुळे संस्था बंद पडणार होती. परंतू ही बातमी कळताच कित्येक लोकांनी, संस्थानी, ऑफिसेस नी लगेच मदतीचा हात पुढे केला आणि पेगॅसस ला बंद पडण्यापासुन वाचवले Happy

पेगॅसस बद्दल अधिक माहिती इथे मिळेल http://www.pegasusact.com.au/

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ऑल फॉर चॅरिटी बेकिंग चॅलेंज २०१२ -"बेस्ट इन शो"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव. फायरप्लेस आणि तिचा धूर- फारच कल्पक!! घराचे एकूण लॅन्डस्केपिंगही भारी.. पॉन्ड, लिझर एरिया वगैरे. नो वन्डर तुझा पहिला नंबर आला. हार्दिक अभिनंदन.

अतिशय सुंदर. आणि त्या टेबलावर इतरांच्या साध्या केक्सच्या गर्दीत तुझा केक अगदी उठुन दिसतोय.

सही$$$$
___________/\_____________ आता तुला गुरु मानुन ई-बेकिंग क्लास करणार आहे तुझ्याकडे. Happy

आता तुला गुरु मानुन ई-बेकिंग क्लास करणार आहे तुझ्याकडे. >>>> वर्षे, लाजोचा पुतळा समोर ठेऊन केक बेकिंगला सुरवात कर. मग गुरुदक्षिणा म्हणून तिला एक आवन घेऊन दे. Proud

खुप खुप धन्यवाद मंडळी Happy

४-५ दिवस कामात अडकल्याने इथे येऊन आभार मानु शकले नाही त्याबद्दल सॉरी.........

@ मामी Happy कित्ती ते आपल्या बाबीचं कौतुक Lol

इथे केक करणारा प्रत्येक जण चॅरिटीसाठी जास्त जास्त पैसे गोळा व्हावेत या हेतुने केक बनवतो. ज्याला जसा वेळ मिळेल, उत्साह असेल तसे केक/बिस्किटे बनवतात. मी एका केक साठी ७-८ तास वेळ दिला तर काहिंनी २-३ प्रकारचे वेगवेगळे केक्स बनवुन आणले होते. मग ते साधे कॅरट केक का असेनात. प्रत्येक केक चे ऑक्शन होते आणि साधा कॅरेट केक देखिल कधीकधी बीडींग वाढत वाढत $३०-४० ला विकला जातो Happy माझा उत्साह जरा अतिच असल्याने मी डेकोरेशन वगैरे करते Lol

@ साती, धन्स Happy

@ सशल, अशा प्रेझेन्टेशन्स् मध्ये सगळं एडिबल असणं गरजेचं नसतं का?<<< अशी रिक्वायरर्मेंट काहि नव्हती तरी ९०-९५% केक एडिबल असणे गृहित धरले जाते. माझ्या केक मधे कार, बॅटरी ऑपरेटेड लाईट, खिडक्या आणि पुठ्ट्याचे छत व छत्री सोडुन बाकी सर्व खाण्यायोग्य पदार्थ आहेत. चॉकलेट्स वगैरे चिकटवण्याआधी अ‍ॅल्युमिनिअम फॉइइल लावुन घेतली आहे त्यामुळे ती चॉकलेट्स देखिल खातायेण्या योग्य होती.

ज्या टीम ने माझा केक विकत घेतला त्यातल्या बर्‍याच टीममेम्बर्सनी आवर्जुन मला 'केक आवडला आणि भरपूर व्हरायटी खायला मिळाली' असे येऊन सांगितले Happy

@ वर्षा Lol ईगुरू Lol

परत एकदा सर्वांचे आभार Happy

Pages