निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक... खूप्प गोड कविता...

जिप्स्या आर्या खरंच बोलली... सब रुख तेरेपे आतापासून Lol

जागुले... खर्री मज्जा येतीये नुसता विचार करूनच कि आता आपण मनात आलं कि भेटू शकू.. Happy
या नवीन घरासमोर्,मागे,जांभळाची,गुलमोहराची,पेरू,आंब्याची झाडंच झाडं आहेत. निरनिराळे पक्षी सुद्धा दिसले.
पावसावार्‍यामुळे जमीन जांभळी झालेली दिसली... वरून मोठ्या प्रमाणात टपटपणार्‍या जांभळांमुळे....
समोरच्या गार्डन मधे विड्याच्या पानाचा वेल अजगराप्र्माणे पसरलेलाये.. बहीण एकदम खुश झाली कारण माळ्याने तिला मोठाचा मोठ्ठा वेल खुडून दिला तिला तिच्या घरी लावायला हवा होता म्हणून

आज दिनेश दा कुठाहेत??????????

वर्षूताई तुझ आनंदीमन तुझ्या लेखनात उतरल आहे.
मी महाबळेश्वरला गेले होते तेंव्हा तिथे मला खुप कॅकटसचे प्रकार दिसले. मला तेंव्हा मला तुझी आठवण आली. नंतर फोटो टाकेनच.

अगं हे फळ किनू का? उघडून खाऊन बघ ना.>>>>>>>>>.बघते आज.(लक्षात राहील तरं) Happy
गौरी, सुंदर दिसतय ते फ़ुल. Happy
मामी,शकून, जागू, फ़ोटो छानच. Happy

नंतर मग आहेच दुपटी -बाटल्या सांभाळणं >> जिप्स्या त्याचेही अप्रतिम फोटो काढेल. Happy

वर्षूताई, मागच्या गटगला मला जमले नव्हते. आता तुम्हाला नक्की भेटता येइल.

आजची सगळ्यात गोड बातमी, बर्षू आणि रम्मीना आता हवं त्यावेळी भेटता येईल.. काश माझ्या या भेटीत भेटता आले असते !

ज्या फळांपासून अमारुला करतात ती फळे मी काल खाल्ली...

काल आभाळात चंद्राच्या पाच सहा कोरी बघितल्या का ?

दोन्हीचे फोटो काढलेत. ( पहिल्या वाक्याचा, दुसर्‍या वाक्याशी संबंध लावेल तो... वेडा Wink )

जिप्स्या त्याचेही अप्रतिम फोटो काढेल. >>>>>>>>>>>.माधव, कॅमेरा हातात घ्यायला वेळ तरी असेल का? Wink
तसही नंतर मित्रांबरोबर धुडगूस घालता येणार नाही हा दूरदर्शी विचार म्हणून जिप्स्या आता दर शनीवारी-रविवारी भटकून घेतोय. Proud

साऊथ आफ्रिकन फ्रूट,' मारुला'

हत्तींचं विशेष आवडतं फळ.. त्यांना हे फळ खाऊन धुंदी येत असावी..

मारुला पासून बनवलेले अमरूला क्रीम लिकर ड्रिंक( १७% अल्कोहोल)

Happy ब्राझिल मधे टेस्ट केलेलं.. बदामाचा वास आणी स्लाईट कडवट चव आहे या ड्रिंक चं.. खूप नाही आवडलं मला.. ब्राझिल मधे ,'अमारुया' असा उच्चार होता या ड्रिंक चा..

ज्या फळांपासून अमारुला करतात ती फळे मी काल खाल्ली...

काल आभाळात चंद्राच्या पाच सहा कोरी बघितल्या का ?

दोन्हीचे फोटो काढलेत. ( पहिल्या वाक्याचा, दुसर्‍या वाक्याशी संबंध लावेल तो... वेडा ) >>>>> वर्षूने दिलेल्या बाकी सर्व माहितीने याचा संबंध कळला .... Happy

जिप्स्या तु येउच नकोस इथे आता काहि महिने>>>>हो, जागू, काहि ऐकणार नाही म्हणुन मी अ‍ॅडमिनला विनंती करणार आहे, या धाग्याचे नाव "निसर्गाच्या गप्पा" ऐवजी "जिप्स्याच्या गप्पा (जिप्स्याबद्दल गप्पा)" असं ठेवा. Proud

जिप्स्या - तुलाही आवडतंच की चिडवलेलं - ते कळतंय आम्हा सर्वांना - त्याशिवाय का इथे येतोस तू ....

पण हे बघ, लवकरच पाऊस संपून जाईल ..... त्याआधीच पावसाळी राईड्स (ट्रेक्स नाही ऽ रे ) होऊन जाऊ देत
कारण - असा पावसाळा पुन्हा नाहि येणे .....

किती दाटती मेघ हे अंतराळी
किती रेशमाच्या झडींची नव्हाळी
त्वरेने निघावे सुसाटून तू रे
असा पावसाळा पुन्हा नाहि येणे

तेव्हा लगे रहो जिप्सीभाय .....

मनही मनमें लड्डू फुटे
नैनोंमें फुलझडीया छुटें
होठोंपर (किबोर्डपर) तकरार.....

जिप्स्या - तुलाही आवडतंच की चिडवलेलं - ते कळतंय आम्हा सर्वांना - त्याशिवाय का इथे येतोस तू ....

तेच ना... मुद्दाम मुद्दाम येऊन बघायचे आणि मग रुसायचे, तक्रारी करायच्या....... Happy

तेच ना... मुद्दाम मुद्दाम येऊन बघायचे आणि मग रुसायचे, तक्रारी करायच्या.......>>>>>>>>>>>>>>त्या सुद्धा परत सगळ्यांनी चिडवावे म्हणून. Proud

एक भाप्र Uhoh

ढगफूटी म्हणजे नेमकं काय?
आणि ती कुठेही होऊ शकते का? कि फक्त ठराविक भागातच? सध्या उत्तराखंडमध्ये ढगफुटीच आलीय ना?

जिप्स्या, हे गुगलवर सापडल.
काही वेळा, पाऊस देणार्‍या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यायोगे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात.
सध्या उत्तराखंडमध्ये ढगफुटीच आलीय ना>>>>>>>>>>>हो. Sad

हे पण वाच. http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id...

लिंक घरी जाऊन बघतो.>>>>>>>>>>>>.इथे पेस्ट करू का नंतर संपादित करेन. Happy

वाच. नंतर सांग. संपादीत करेन. Happy

ढगफुटी Bookmark and Share Print E-mail
निसर्गाचे विलक्षण पण जीवघेणे तांडवनृत्य..
प्रशांत दीक्षित
लेहमध्ये ६ ऑगस्ट २०१०रोजी झालेली ढगफुटी ही जगाला आजपर्यंत माहित असलेल्या ढगफुटींच्या घटनांतील सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते. अगदी थोडय़ा काळात इतक्या मोठय़ा प्रमाणात जगात आजपर्यंत कुठेही पाऊस पडलेला नाही. अवघ्या एका मिनिटात दोन इंच पाऊस.. ढगफुटी या शब्दातच या घटनेचा अर्थ स्पष्टपणे कळतो. टाकीचा संपूर्ण तळच निघाला तर टाकीतील पाणी जसे वेगाने खाली पडेल तसेच येथे होते. फक्त येथे कित्येक मैल पसरलेला पाण्याचा ढग असतो आणि त्यामध्ये अब्जावधी गॅलन पाणी भरलेले असते. आकाशातील पाण्याचा ढग अक्षरश फुटतो आणि अगदी कमी वेळात पाण्याचा जणू स्तंभच जमिनीवर झेप घेतो.
ढगफुटीच्यावेळी नेमके काय होते? या प्रक्रियेची सुरुवात कशी होते? विज्ञानाने अर्थातच याचा शोध घेतला आहे. गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा लॅटिन शब्द आहे. क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे व निम्बस म्हणजे ढग. थोडक्यात झपाटय़ाने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग ही सुरुवात असते.
गरम हवा व आद्र्रता यामुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढत जाते. पाण्याचे अब्जावधी थेंब या ढगांमध्ये विखुरले जातात. यातूनच पुढे जोरदार पाऊस पडतो. पण कधीकधी या ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो. याला अपड्राफ्टस् असे म्हणतात. पाण्याच्या थेंबाना घेऊन तो वरवर चढत निघतो. हा निसर्गाचा विलक्षण खेळ असतो. या स्तंभाबरोबर वेगाने वर चढताना पाण्याचे थेंब चांगले गरगरीत होऊ लागतात. कधीकधी ३.५ मिमीहून मोठे आकारमान होते. काहीवेळा या वर चढणाऱ््या हवेच्या स्तंभात अतिशय गतिमान असे वारे निर्माण होतात. ढगातच छोटी छोटी वादळे उठतात. या वादळात पाण्याचे थेंब सापडतात. वादळात वेगाने गिरक्या घेत असताना एकमेकांवर आदळतात आणि या मस्तीत एकमेकांमध्ये मिसळून आणखी मोठे होत जातात. हवेचा स्तंभ आता पाण्याच्या मोठमोठय़ा थेंबाना घेऊन वरवर चढू लागतो.
हवेच्या स्तंभाची जितकी ताकद असेल तितका तो वर चढतो आणि मग जत्रेतील चक्राचा पाळणा जसा झपकन खाली येऊ लागतो तसेच या स्तंभाचे होते. या स्तंभाने तोलून धरलेले पाण्याचे मोठे थेंब त्या पाळण्याप्रमाणेच अतिशय वेगाने खाली झेपावतात. यावेळी त्यांना स्तंभातील ऊर्जाही मिळालेली असते. सुसाट वेगाने ते जमिनीकडे येतात. हवेचा स्तंभ आता जमिनीच्या दिशेने तयार होतो. याला डाऊनड्राफ्ट असे म्हणतात. थेंबाचा वेग प्रथम साधारणपणे ताशी १२ किमी असतो. तो बघता बघता ताशी ८० ते ९० किमीपर्यंत पोहोचतो.
ढग मोठा असला तरी त्याचा विस्तार जास्त नसतो. यामुळे जमिनीवरील लहानशा भागात पाण्याचा जणू स्तंभ कोसळतो. मोठाले थेंब व प्रचंड वेग यामुळे जमीन व त्यावरील सर्व काही अक्षरश झोडपून निघते. झाडे, लहान प्राणी, कच्च्या इमारती यांच्यासाठी पाण्याचा हा मारा धोकादायक असतो. जमिनीची पाणी शोषून घेण्याची वेगवेगळ्या ठिकाणची क्षमता वेगवेगळी असते व पाणी शोषून घेण्यासाठी वेळही लागतो. येथे काही मिनिटातच प्रचंड पाणी ओतले गेल्यामुळे पाणी शोषून घेण्याचे जमिनीचे कामच थांबते आणि जिकडे-तिकडे पुरासारखी स्थिती निर्माण होते. ढगफुटी डोंगरावर झाली तर पाण्याचे लोंढे डोंगरावरून निघतात. त्यांच्याबरोबर मोठय़ा प्रमाणात माती पायथ्याकडे ढकलली जाते.
वरती चढणारा स्तंभ व खाली येणारा स्तंभ यांच्यामुळे हे सर्व घडते. यापैकी डाऊनड्राफ्ट हे जास्त धोकादायक असतात. हवेचा हा स्तंभ जेव्हा वेगाने जमिनीवर आदळतो तेव्हा ती ऊर्जा तितक्याच वेगाने आजूबाजूला फेकली जाते. यामुळे पाण्याबरोबर चारी दिशेने वाऱ्याची वावटळ उठते. हे वारे कधी ताशीदीडशे ते दोनशे किमी इतका वेग घेतात. या वावटळीमुळे लहान झाडे एका रेषेत झोपल्यासारखी मोडून पडतात. विमानांसाठी हवेचे हे स्तंभ सर्वात धोकादायक असतात. विमान अशा स्तंभात सापडले तर हमखास कोसळते. जगातील अनेक विमान अपघातांना हवेचे हे स्तंभ कारणीभूत ठरले आहेत. किंबहुना या अपघातांमुळेच या स्तंभांचा अभ्यास सुरू झाला.
ढगफुटीच्या वेळी आणखी एक अनोखी घटना घडते. मात्र त्याची मौज घेण्याचे भान कुणालाही नसते. ढगफुटीच्या आधीच हवामान अर्थातच पावसाळी असते. काळोखी दाटत जाते. मात्र प्रत्यक्षात पाऊस पडताना काळोखाचे प्रमाण एकदम कमी होते. कधीकधी जणू सूर्यप्रकाशात पाऊस पडल्यासारखा भासतो. पावसाचे भलेमोठे थेंब हे याचे कारण आहे. हे थेंब आरशाप्रमाणे काम करतात व प्रकाश परावर्तित करीत राहतात. यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रकाश दिसतो. थेंबाचा पृष्ठभाग वाढल्यामुळे नेहमीच्या थेंबापेक्षा चारपट अधिक प्रकाश ढगफुटीच्या थेंबातून परावर्तित होतो.
ढगफुटी ही हिमालयासाठी नवीन गोष्ट नाही. दरवर्षी मान्सून पठारावरून हिमालयाच्या भेटीला जातो. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यातून घेतलेले पाणी तेथे नेऊन ओततो. हिमालयात असे ढग अनेकदा फुटतात. मात्र बहुदा ही ढगफुटी खूप डोंगराळ भागात होत असल्याने त्याची बातमी होत नाही. मनुष्यवस्तीत ती घडली की लगेच आपले लक्ष वेधून घेते. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी पडलेला पाऊस हा ढगफुटीचाच प्रकार होता. त्या दिवशी आठ तासात ९५० मिमी पाऊस पडला. वेग व थेंबांचा आकार आणि पाणी घेऊन येणारा हवेचा स्तंभ जमिनीवर आदळल्यावर होणारे परिणाम यामुळे ढगफुटीतून अपरिमित नुकसान होते. यावर उपायही काही नसतो. निसर्ग मस्तीत येऊन धुमाकूळ घालतो. हे त्याचे तांडवनृत्य असते. ते समजून घेताना छान वाटते, पण अनुभवताना जीवघेणे ठरते. लेहवासीय सध्या तोच अनुभव घेत आहेत.

ढगफुटीच्या प्रमुख घटना
* लेह (६ ऑगस्ट २०१०) फक्त एका मिनिटात ४८.२६ मिमी पाऊस
* बरोट, हिमाचल प्रदेश, (२६ नोव्हेंबर १९७०) एका मिनिटात ३८.१० मिमी पाऊस
* पोर्ट बेल, पनामा (२९ नोव्हेंबर १९११) पाच मिनिटांत ६१.७२ मिमी पाऊस
* प्लंब पॉईंट, जमेका (१२ मे १९१६) पंधरा मिनिटात १९८.१२ मिमी पाऊस
* कर्टिआ, रुमानिया (७ जुलै १९४७) वीस मिनिटांत २०५.७४ मिमी पाऊस
* व्हर्जिनिया, अमेरिका (२४ ऑगस्ट १९०६) चाळीस मिनिटांत २३४ मिमी पाऊस

शोभा, खूप छान माहिती आहे ही.
शशांकजी, तुम्ही तर शीघ्रकवीच आहात !
वर्षू ताई, मायदेशी स्वागत !

किती अनोखी माहिती आहे शोभा ही! मस्तच. "‘कुमुलोनिम्बस’ कसला गोड शब्द आहे. कालिदासाच्या वाड्मयातील वाटतो अगदी. Proud

http://www.hindustantimes.com/India-news/NewDelhi/Heavy-rains-lash-north...
हि लिंक पण बघा ढगफुटीची!

Pages