निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभा अगं कोवळ्या दोडक्यांची भाजी, तांदळाच्या पिठात दोडक्याचा खीस घालून थालिपिठं, दोडकाभात आणि ती शिरांची चटणी असं सगळं खूप मस्त होतं पण तो बिचारा बहुतेकांचा दोडकाच!
माझा मात्र लाडका.

व्वा....ताजे दोडके काय मस्त दिसताय्त.
मलाही आवडते दोडक्याची भाजी. मुगाची दाळ घालुन किंवा तुरदाळबरोबरचा दाळ्-दोडका, किंवा दाण्याचा कुट लावुन केलेली भाजी.

तांदळाच्या पिठात दोडक्याचा खीस घालून थालिपिठं, दोडकाभात>>>>>>>>हे नाही केलं कधी. Uhoh
दाण्याचा कुट लावुन केलेली भाजी.>>>>>>>>>>>आमच्याकडे हीच होते. Happy

मानुषी , दोडकी मस्तच आणि माझा पण लाडका आहे हा दोडका.
जागू , अग मी पण महाबळेश्वरला गेलेले. आपण बहुदा एकाच वेळी होतो तिथे.
हि फूल मी तिथेच बघितली. खूप मधमाश्या, भुंगे होते ह्या फूलांवर आणि खूप सुवासिक होती ही फूल.
कशाची आहेत बर??????

DSCN0425.JPGDSCN0429.JPG

मानुषीताई दोडके मस्त, आम्ही शिराळी म्हणतो. श्रीरामपूरला आम्ही असताना आमच्या मालकांकडे घोसाळ्याचा वेल होता आणि आम्हाला ताजी घोसाळी मिळायची त्याची आठवण झाली, शिराळी बघून.

जागू, तु पान नं २४ वर टाकलेल्या फुलांना काय म्हणतात? इकडे अमेरिकेत पाहीलीयेत फुलं पण दुकानात काय शोधावं ते समजलं नाही. >>
त्या फुलांना इथले नर्सरीवाले स्ट्रॉ फ्लॉवर्स म्हणतात. बर्पी.कॉम वर बिया मिळतील.

जागूनं टाकलेली फुलं कित्येक दिवस अशीच दिसतात, सुकली तरी. नाव मात्र माहित नाही.

मानुषी, दोडके बघून मस्त वाटलं. मी आता पालक, गवार, (अजून थोडी) शेंगावाली चवळी, मटकी (दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे) आणि हिरवे वाटाणे लावले आहेत. आधी लावलेल्या चवळीला मस्त शेंगा आल्या आणि येताहेत.

वर्षा सुरू झाली तरी सगळे वर्षुताईच्या नावानं का बरं ओरतायत??? Proud वर्षुताई एका प्रोजेक्टमध्ये गुंतली आहे. लवकरच पुन्हा मायबोलीवर येईल.

नुसतीच सावलीत वाळवायची - डार्क , ड्राय प्लेस, दमट पणा नसावा , अशा जागी गुच्छ उलटे लटकवावेत असं म्हणतात कुठलेही फुलं , हर्ब्ज सुकवताना. लॅव्हेंडरचे गुच्छ असेच सुकवलेले पाहिलेत

तुला जे पाहीजे ते मिळो >> बिअर्डेड आइरेसिस निळे किंवा पिवळे चालतील Proud

बघ्ते बिया घेउन. फुलं वाळवता आली तर देवासाठी छान हार बनवेन. Happy
हायला... कुठे राहतेस तु?? माझ्याकडे ढीगाने कंद आहेत याचे. सांग सांग पटकन :))

माझ्याकडे निळया-जांभळ्या-पिवळ्या छटांचे आहेत.

एक Northern Mockingbird जातीचा पक्षी सध्या आमच्या इथे रोज रात्री साडेअकराच्या आसपास जागा होतो आणि पहाटेपर्यंत किलबिलत राहतो मोठ्यांदा! Sad गेले ४ दिवस हाच प्रकार चालू आहे. आता मला त्या पक्ष्याच्या तब्ब्येतीची काळजी वाटू लागली आहे. कळत नाहीये नेमकं काय कारण असेल त्याच्या या जागण्याचं. कोणाला त्याच्या या behavior pattern बद्दल काही माहीती आहे का?

इथे आहे माहिती आइरिस बल्ब / र्‍हायझोम्स कसे मेल करावेत त्याबद्दल
http://faq.gardenweb.com/faq/lists/iris/2001100718011746.html

अमेरिकेच्या ४८ राज्यांमधे पोस्टाने पाठवता येतात. थर्ड क्लास / सरफेस मेल सर्वात स्वस्त पडावे.
पत्ता कळवू का ?

मानुषी...........मस्तच गं. आमच्याकडेही हा दोडका लाडका आहे हं! घरची अशी ताजी ताजी भाजी मिळाली तर मग आणखी काय पायजे?

उजू, तू दिलेला फोटो कदाचित फोक या वेलीची असू शकतील. पण नक्की नाही सांगता हेत. कारण फोकाची पानं तुझ्या फोटोत दिसताहेत तशी नसतात. आणि फोकाच्या वेलीला अंगभर दुधासारखा चीक असतो. पण फुलं बर्‍यापैकी वाटताहेत.

जिप्स्या, वाचत नसेलच... हळदीची घाई झालीय का रे ? अनिलच्या शेतात असेलच, ती लावू या.>>>>>>>>>दिनेशदा, ही आयडीया चांगली आहे>>>>तुम्ही सगळे जर असंच चिडवणार तर मी डिसेंबरपर्यत या धाग्यावर एकही फोटो/पोस्ट टाकणार नाही. :धमकी देणारा बाहुला: Proud Happy

रच्याकने, इत्काचांग्लापिंपळाच्यापानाचाफोटुटाक्लात्याचंकुण्णालाकौतुक्चंनै. Sad

जिप्सी, पिंपळाचा फोटो एकदम मस्त आहे बरं! Happy Wink
साधना, गेळ्याच्या झाडाला दुसरं नाव रानपेरू, आणि बोटॅनिकल catunaregum spinosa..

Mhanaje akshata December la padaychyat tar. Mag he sangayala to varcji firvun aaleli post ka???
saral sang na ji tharaliya ti tarikh. Wink

Mhanaje akshata December la padaychyat tar. Mag he sangayala to varcji firvun aaleli post ka???
saral sang na ji tharaliya ti tarikh

exactly... मोनाली तुमने मेरे मुह की बात छिन ली..

मानुषी Happy

आता खूपच जणांना दोडका आवडलेला दिसतोय. तर मग हे घ्या अजून काही वेलावरचे दोडके.......

मामी बरंच काही लावलेलं दिसतंय! गो गर्ल गो...................................
जिप्सी मला आवडली हां पिंपळपानं! (गुर्जींचे फोटो आवडणार नाहीत असं होईल का?)
.

इत्काचांग्लापिंपळाच्यापानाचाफोटुटाक्लात्याचंकुण्णालाकौतुक्चंनै >> जिप्स्या, तुझ्या फोटोंचे कौतुक करणार्‍या शब्दांकरता एक वेगळा शब्दकोश काढ बरे! आम्ही काही साहित्यीक नाही, प्रत्येक वेळेला नविन शब्द कुठून आणायचे? त्यात परत तू फुलं, पक्षी इतकेच नाही तर काट्यांचेही फोटो काढत असतोस. तुझे ठीक आहे तुला काट्यातही गुलाब दिसण्याचे दिवस आहेत. आम्ही पामरांनी काय करावे? ऑ? Happy

रच्याकने, लक्ष्मी-नारायणाच्या फोटोची वाट पाहून पाहून थकलोय मी. तोफोटोनेमकाटाकतनाहीयेसआणिम्हणेकौतुककरा. मंडळी, तुम्हाला दिसले का लक्ष्मी-नारायण? Wink

बर्‍याच दिवसांनी आल्यावर मस्त भिजून गेलो इथल्या पोस्टीत. मजा आली. गटग? अरे वा! आम्बोलीला जायचं तर ऑगस्ट ठरवा की! मला पपनसं आणता येतील वाडीवरून (कोणाला काय तर कोणाला काय Happy )

मानुषी दोडक्यासाठी अभिनंदन. Happy

त्या मी फोटो टाकलेल्या फुलाला आम्ही कागदी फुले म्हणतो. पुर्वी आमच्याइथेही खुप यायची. ह्याचा हार २ महिन्यापेक्षा जास्त टिकतो.

माधव लक्ष्मि-नारायण तुम्हाला दिवाळीनंतर भेटतील. तोपर्यंत पूजा अर्चा चालू ठेवा Happy

आज पाउस येउन-जाउन आहे. माझ्याकडच्या कुंडीतल्या हळदीला मस्त कोंबे आली आहेत हिरवी गार.

जागु आम्ही त्याला भुताची फुले म्हणायचो.. (का? विचारु नका, लहानपणी काही गोष्टी अगदीच कैच्याकै असतात...) ही फुले खरेच महिनामहिना टिकतात. हल्ली पाहिलीच नहई कुठे.

<<<जिप्स्या, तुझ्या फोटोंचे कौतुक करणार्‍या शब्दांकरता एक वेगळा शब्दकोश काढ बरे! >>> माधवदा, अगदि बरोबर सांगितलेत तुम्ही. पूर्ण अनुमोदन!!

इत्काचांग्लापिंपळाच्यापानाचाफोटुटाक्लात्याचंकुण्णालाकौतुक्चंनै >> जिप्स्या, तुझ्या फोटोंचे कौतुक करणार्‍या शब्दांकरता एक वेगळा शब्दकोश काढ बरे! आम्ही काही साहित्यीक नाही, प्रत्येक वेळेला नविन शब्द कुठून आणायचे? त्यात परत तू फुलं, पक्षी इतकेच नाही तर काट्यांचेही फोटो काढत असतोस. तुझे ठीक आहे तुला काट्यातही गुलाब दिसण्याचे दिवस आहेत. आम्ही पामरांनी काय करावे? ऑ? स्मित

रच्याकने, लक्ष्मी-नारायणाच्या फोटोची वाट पाहून पाहून थकलोय मी. तोफोटोनेमकाटाकतनाहीयेसआणिम्हणेकौतुककरा. मंडळी, तुम्हाला दिसले का लक्ष्मी-नारायण? डोळा मारा>>>>>>>>>>माधवच्या संपूर्ण पोस्ट्ला अनुमोदन. Happy

Pages