निसर्गाच्या गप्पा (भाग - १४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 May, 2013 - 15:22

निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौरी त्या फळांना अगदी पेरूसारखा वास येतो

या फळाचे दुसरेही काही नाव आहे काय?? मी खुप पाहिलेय हे आंबोलीला.

वैशाली कबुतरांना तोंड पाहता यावं म्हणून लावल्यात Lol

बाय द वे - निसर्गमय झालेल्या आयड्यांच्या लिष्टित माझं नाव नाही? Angry
णिषेढ

तु अजुन बाळ आहेस गं रांगते.. म्हणुन..

जाग्गुआत्या येईल, बालाला बघेल, बालाचं नावही शालेत घालेल.. ललु नको हा.. येईल येईल जाग्गुआत्या येईल इतक्यात राधाला झोपवुन..... तोवर आत्याने आणलेल्या बेरीज खा...

बाय द वे - निसर्गमय झालेल्या आयड्यांच्या लिष्टित माझं नाव नाही? >>>>>>>>>
जाग्गुआत्या येईल, बालाला बघेल, बालाचं नावही शालेत घालेल.. ललु नको हा.. येईल येईल जाग्गुआत्या येईल इतक्यात राधाला झोपवुन..... तोवर आत्याने आणलेल्या बेरीज खा...>>>>>>>>>>>थांब हा आर्याच नाव पण घालायच आहे. सांगू आपण दोन पाळणे आणायला. Proud

Dakshina & Aarya palana sajavun jhala ki ghalatech sandhyakali tumachi nave.

aamachyaithe chan paus padayala aataach suruvat jhali aahe.

साधना, वाघाटीची फळे पण जरा मोठी पण अशीच दिसतात. ती बाजारात विकायलाही येतात. गेळफळे मात्र कधी बाजारात दिसली नाहीत.
आर्याच्या लेकाचे अभिनंदन !

तूम्ही पावसाच्या गप्पा मारता आहात, आमच्याकडे सध्या कडाक्याची थंडी आहे !

एखाद्या शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात जेवण, मग रात्रीच्या गाडीने कोल्हापूरला, शनिवारी सकाळी कोल्हापूरात अंबाबाईचे दर्शन, मग अनिलच्या गावाला भेट. परत कोल्हापूरला एक रात्र मुक्काम, दुसर्‍या दिवशी ( रविवारी ) सकाळी अंबोलीला. दिवसभर तिथे भटकणे. संध्याकाळी तिथून परत पुण्या / मुंबईला.. असा बेत करतोय.
ज्यांना जिथे शक्य आहे तिथे जॉईन होऊ शकतात.. तारखा मग कळवतो. एकदा तारीख ठरली की मग इमेल्स करतो.

अर्थात अनिल आणि साधना यांची सोय बघावी लागेल.

Aata jipsy kashala yetoy tumachya barobar, tyache vegalech gtg chalu asatil.

aarya abhinandan g lekache aani tujhehi.

Shobha aata bhaji khanyasarskha joracha paus suru jhala aahe.

महाबळेश्वरच्या बाजारत असे मध विक्रेते बसतात पोळे घेउन पण ती गुळाची मध असते.

आर्या, लेकाचं अभिनंदन!

जिप्सी, महाबळेश्वरला सरकारी मधमाश्या पालन केंद्र आहे, तिथे गेळा, जांभूळ, कारवी अश्या विशिष्ट फुलांचा मध विकत मिळातो. आतापर्यंत इतक्या वेळा गेळ्याचा मध खाल्ला होता, पण हे झाड माहित नव्हतं. या वेळी फोटो काढून आणल्यावर "आपले वृक्ष" मध्ये सापडलं. या फुलांनाही चांगला वास असतो असं म्हटालंय महाजनांनी पुस्तकात, पण फुलाचा, फळाचा वास बघितला नाही मी. (उंचावर होती जरा.)

साधना, त्याचं दुसरं काही नाव सांगितलंय का पुस्तकात ते बघते.

दिनेशदा, तुमच्या बरोबर आंबोली म्हणजे पर्वणीच की! सगळ्यांचीच भेट होईल. पुण्यात असून मी अजून कुणालाच प्रत्यक्ष भेटले नाहीये. पण माझी लेक लहान आहे अजून, तिला घेऊन जमेल का शंका वाटते.

सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद!! Happy
तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीशी होत्या त्याच्या, म्हणुनच हे शक्य झाले. नाहीतर खरं म्हणजे मला अनपेक्षित होता रिझल्ट! Happy

Dineshda kahi kalji karu naka tyane adhich ek dharali aahe aats tumhala nahi to dharanar.

महाबळेश्वरच्या शेर गार्डनमध्ये म्युझियमच्या बाहेर हे पाण्यात टाकलेले दगड होते. हे म्हणे रामाने बांधलेल्या सेतूतले दगड आहेत. ते पाण्यात बुडवले तरी वर येत होते.

जागू, आम्ही गिरीराजच्या होणार्‍या बायकोला पण असे ट्रेकला घेऊन गेलो होतो. दिवसभर आम्ही तिची खुप
काळजी घेतली. ( दोघांना अजिबात एकटे सोडले नाही. )

पण तूझे काय ? तू येणार का ?

अवनी,

आठवतेय तेव्हापासून मी ७ जूनची वाट बघत असे. मुंबईत तरी बहुतांशी पाऊस तारीख पाळत असे.

Pages