निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
गारा ! अरे वा ! नेहमीप्रमाणेच
गारा ! अरे वा !
नेहमीप्रमाणेच सरकारी संस्थांनी पावसासाठी काहीही तयारी केलेली दिसत नाही.
मानुषी, आम्ही कढीपत्त्याची पानं पण ओळखली बरं का !
आर्या,
गांधीलमाश्या या त्यांच्यातल्या आदीमानव. ज्या गांधीलमाश्यांनी जमिनीवर अन्न शोधले त्यांच्या झाल्या मुंग्या आणि ज्यांनी झाडावर अन्न शोधले, त्यांच्या झाल्या मधमाश्या.
मुंग्या आणि मधमाश्यांनी समुहाची ताकद ओळखली आणि एक वेगळीच संस्कृती निर्माण केली. गांधीलमाश्या
आजही एकाकी जीवन जगतात.
सर रिचर्ड अटेंबरो यांचा
सर रिचर्ड अटेंबरो यांचा बिगिनींग ऑफ लाईफ असा दोन भागातला ३डी माहितीपट यू ट्यूबवर आलाय.
५० वर्षे प्रक्षेपणक्षेत्रात कार्य करुनही, अजून नव्या ( खरं तर जुन्याच ) गोष्टींचा शोध घेण्यातला त्यांचा उत्साह
कणभरही कमी झालेला नाही.
या भागात त्यांनी अगदी पहिल्यांदा जीव कसे निर्माण झाले असावेत, याचा तपास केला आहे. उत्तम चित्रीकरण
आणि त्यांचे अप्रतिम निवेदन आहेच.
उत्तर आफ्रिकेत मोरोक्को, नावाचा देश आहे. तिथे अक्षरशः ढिगाने या जींवाचे अवशेष सापडले आहेत.
असे अवशेष शोधणे आणि ते साफ करणे, हा त्या देशातला मोठा उद्योग झाला आहे. याचे सुंदर चित्रण आहे त्यात.
सुप्रभात. मानुषी ती
सुप्रभात.

मानुषी ती घोसाळ्याचीच फुले आहेत. आमच्याइथे जंगली घोसाळीही असतात. नवरात्रात मग त्या फुलांच्या देवीसाठी माळा करतात.
जागु,
जागु, हाय्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य कशी आहेस?
पिवळं फुल कित्ती गोड आहे खरंच.
जागू..... नवरात्रात मग त्या
जागू..... नवरात्रात मग त्या फुलांच्या देवीसाठी माळा करतात.>>>>>>>>>> इंटरेस्टिन्ग!
गांधीलमाश्या या त्यांच्यातल्या आदीमानव. ज्या गांधीलमाश्यांनी जमिनीवर अन्न शोधले त्यांच्या झाल्या मुंग्या आणि ज्यांनी झाडावर अन्न शोधले, त्यांच्या झाल्या मधमाश्या.
मुंग्या आणि मधमाश्यांनी समुहाची ताकद ओळखली आणि एक वेगळीच संस्कृती निर्माण केली. गांधीलमाश्या
आजही एकाकी जीवन जगतात.>>>>>>>>>>>>>> इंटरेस्टिन्ग!
हं.......कढिलिंबाच्या अंगाखांद्यावर हे वेल खेळताहेत! संपूर्ण एन्क्रोचमेन्टच!
<<मुंग्या आणि मधमाश्यांनी
<<मुंग्या आणि मधमाश्यांनी समुहाची ताकद ओळखली आणि एक वेगळीच संस्कृती निर्माण केली. गांधीलमाश्या आजही एकाकी जीवन जगतात.>>>>>>>>>>>>>> इंटरेस्टिन्ग!<<
जागु +१००००
मागे म्हण्जे २ महिन्यापुर्वी संध्या. घरी गेल्यावर काय गुंगुंगुं आवाज येतोय म्हणुन शोध घेतला. तर आमच्या घरातल्या लाकडी फर्निचरवर दोन कुंभारणी मडकी/ घरटी बांधत होत्या. बरचसं उभट रांजणासारखी ३ घरं बांधली त्यांनी... १ तासात. आणि वरुन पुन्हा मातीने पॅक करुन ठेवलीत. पण नंतर त्या काही तिकडे फिरकल्या नाहीत. काय झालं असेल त्यातल्या अंड्यांचं? फोडुन बघु का?
आर्ये अशीच का? १. २. ३.
आर्ये अशीच का?
१.
२.
३.
. काय झालं असेल त्यातल्या
. काय झालं असेल त्यातल्या अंड्यांचं? फोडुन बघु का? अ ओ, आता काय करायचं>>>>>>>>>>>नको बघु. योग्य वेळी त्यातले प्राणी बाहेर येतील.
माझ्याकडची मोठी आहेत गं...उभट
माझ्याकडची मोठी आहेत गं...उभट लांबुळकी! इवलुसा रांजणाचाच आकार समज ना! फोटो काढुन इथे देते उद्या जमलं तर!
हे तुझ्या ऑफीसातले दिसतायत फोटो.
फ़ोटो दाखव.
फ़ोटो दाखव.
हे तुझ्या ऑफीसातले दिसतायत
हे तुझ्या ऑफीसातले दिसतायत फोटो. डोळा मारा>>>>>>>>.हो. अग त्यातला शेवटचा मोघा पूर्ण होण्याआधीच ती माशी येईनाशी झाली. पण साधारण १ महिन्यानंतर त्यातले पूर्ण झालेले दोन मोघे मला फ़ुटलेले दिसले.

हे बघ असे. :
हम्म! मोघा म्हणतात त्याला?
हम्म! मोघा म्हणतात त्याला?
चला, मलाही लक्ष ठेवावं लागेल आताच. कोण फोडत असेल ते? ती माशी स्वतःच??
कोण फोडत असेल ते? ती माशी
कोण फोडत असेल ते? ती माशी स्वतःच??>>>>>>>>>.इथेच काही वाचलेले आठवतेय.त्यात तयार झालेले प्राणीच
तो फ़ोडून बाहेर येतात.
अग काय सुंदर बांधते ती हे घर. येवढ्याशा तोंडातून ओली माती आणून गुळ्गुळीत लिंपते . माझ्याकडे त्याचा व्हिडीओ पण आहे.
ती माशी, काही सुरवंटाना
ती माशी, काही सुरवंटाना बेशुद्ध करुन त्या मडक्यात ठेवते. त्या किड्यांवर ती आपली अंडी घालते. त्यातून
बाहेर येणारे सुरवंट त्या किड्यांवर पोसतात. आणि मग यथावकाश त्यातून माशी बाहेर येते.
आधी फोडल्यास त्यातून गुंगीत असलेले किडे निघतील.
वापरात नसलेल्या इलेक्ट्रिकल सॉकेट्मधे पण असे गुंगीत असलेले कोळी सापडतात. वरुन पांढरा लेप दिलेला असतो.
लहान मुलांना अशी निरिक्षणे करायला शिकवायला हवीत.
<<अग काय सुंदर बांधते ती हे
<<अग काय सुंदर बांधते ती हे घर. येवढ्याशा तोंडातून ओली माती आणून गुळ्गुळीत लिं<<
हो अगं!! तिच्या इवल्याश्या पंखांनी घासुन घासुन ती त्याचा आतला सरफेस गुळगुळीत करते.
आई इथुन तिथुन सारखीच नाही ? कित्ती ती पिल्लांची काळजी!
व्वा दिनेशदा! छान
व्वा दिनेशदा! छान माहिती!
कसली भारी आयडीया लढवते ही कुंभारीण!
माझ्याकडे कारल्याला खुप फुल
माझ्याकडे कारल्याला खुप फुल आली आहेत्..पण सगळी पुरुष फुल
खत घातल पाहिजे
ही मातीची घरं करणार्या
ही मातीची घरं करणार्या माशांवर एक फिल्म पाहीली होती. त्या असे गुंगीतले किडे खाद्य म्हणून ठेवतातच पण काही वेळा त्या मातीच्या घरातलं टेंपरेचरही तपासतात आणि कमी/जास्त असेल तर भोकं पाडून किंवा बुजवून पाहिजे तेवढ मेनटेन करतात.
त्या असे गुंगीतले किडे खाद्य
त्या असे गुंगीतले किडे खाद्य म्हणून ठेवतातच पण काही वेळा त्या मातीच्या घरातलं टेंपरेचरही तपासतात आणि कमी/जास्त असेल तर भोकं पाडून किंवा बुजवून पाहिजे तेवढ मेनटेन करतात.>>>>>>>>>.काय नियोजन आहे ना?
दक्षे मजेत ग मी. वा
दक्षे मजेत ग मी.
वा माश्यां-मुंग्यांबद्दल खुप इंटरेस्टींग गप्पा चालू आहेत.
वर्षू ताई कुठे गायब झाली आहे?
महाबळेश्वरला ही वेगळी फळे दिसली.

ही झाडाची पाने.

जागू, कशा आहात? अंजिरासारखी
जागू, कशा आहात?

अंजिरासारखी दिसतायत ना ही फ़ळे. कसली आहेत ते तूला माहित नाही. मग मी तर ओळखण्याच्या जवळपास सुद्धा जाउ शकत नाही
जागू, हिरडे आहेत ते. खरं तर
जागू, हिरडे आहेत ते. खरं तर बाळहिरडे.
मग ते मोठे झाले कि त्यांना सुरवारी हिरडे म्हणतात.
त्रिफळा चूर्ण, गंधर्व हरीतकी, हवाबाड हरडे अशा अनेक औषधात वापरतात. कातडी कमावताना पण लागतात.
औषधी उपयोग तर इतके कि ज्या घरात आई नाही, त्या घरातल्या बाळांची काळजी हे झाड घेते ( धात्री ) असे
म्हणतात.
जरा मोठे झाले कि खाता येतात. खुप तूरट लागतात पण त्यानंतर पाणी प्यायल्यावर ते गोड लागते.
( हिरडा असलेली औषधे, खास करुन स्त्रियांनी, वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. )
कोकणातील घाटात तसेच राधानगरी,
कोकणातील घाटात तसेच राधानगरी, आंबाघाट भागात हिरड्यांची खुप झाडे आहेत. खेड्यातील लोकांचे ते एक उत्पन्नाचे साधन आहे.
जागू, फुलाचा फोटो सुंदर!
जागू, फुलाचा फोटो सुंदर!
शोभे, तूला अंजीर म्हणून हिरडा
शोभे, तूला अंजीर म्हणून हिरडा खाऊ घातल्यावर तोंड कसे होईल, त्याची कल्पना केली
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=3o5QlNrUBGw
http://www.youtube.com/watch?v=21zgkg5pCaE
मी वर उल्लेख केलाय त्या सर अटेंबरोंच्या क्लिप्स च्या लिंक्स. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य बघा.
जागू, तेच पिवळे फूल का माहीत
जागू, तेच पिवळे फूल का माहीत नाही, पण असे एक फुल चक्क सलाड मधे घालून खातात. मला मायबोलीकर भाग्यश्रीने बिया पाठवल्या होत्या आणि माझ्या गोव्याच्या घरी फुले पण येत असत.
भोपळ्याचे फूल का?
भोपळ्याचे फूल का?
जिप्सी बहाव्याचे आणि बकूळीचे
जिप्सी बहाव्याचे आणि बकूळीचे फोटो अप्रतिम आले आहेत. खुप दिवसस झाले ही फुल प्रत्यक्ष पहायला नाही मिळाली. इतक मस्त वाटलं ना. धन्यवाद.
आणि हो तुमचे अभिनंदन. आता फुलांचे फोटो जरा कमीच येतील. पण ठिक आहे.
नमस्कार नि. ग. कर ! खूप
नमस्कार नि. ग. कर !
खूप दिवसांनी प्रतिसाद देतेय - पण या गप्पा वाचते मात्र बर्याच वेळा. गप्पा वाचून ताजं झाल्यासारखं वाटत छान - आणि बरोबरीने माहिती नवी नवी किती मस्तं !
जागू ने वरती टाकलेलं फुल माझ्या वळखिचं निघालं बगा
माझ्या बागेत लावलं होतं मी पूर्वी - त्याचं माझ्या माहितीतलं नाव Nasturtium.
ही लिन्क बघा -
http://www.herbalgardens.com/archives/articles-archive/nasturtiums.html
लिन्क वर मस्त रेसिप्या पण दिल्या आहेत. मागे सॅलेड मधे घालून खाल्ली फुलं, तेव्हा केशराचा स्वाद आल्यासारखा वाटला या फुलाच्या पुंकेसराला !
आता फुलं घावली की नवीन रेशिप्या करून पहाणार नक्की
Pages