एका भुताची खरी गोष्ट...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 14 May, 2013 - 04:47

ह्ही...ह्ही...हा...हा....हा.... भू.....................तर अता अपल्याला भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणार....

स्थळ-कोकणातलं १ घर(अश्या गोष्टींना तीकडचीच घर हवीत,गूढ वातावरणाची कीक माळरानापेक्षा कोकण प्रांती अधिक येते)

काळ-झडप घालायला आलेला भूतं-काळ

वेळ- रात्री नीजानीज झाल्यानंतरची.... ह्ही:ह्हा...

चला........सगळी पूर्व तयारी तर ठीक झाली अता आपण शरीराची त्वचा,....त्वचाच म्हणतात ना तीला? स्वारी... त्याला?...अं...अं...हं....तर त्वचा थरथरे पर्यंत त्या वातावरणात राहू.चला तर मग त्या ऐतीहासीक पडवीत,,पडवीच्या मागे १ 'आड' आहे,त्यामागे वाडी...आज कुणाचं तरी वर्षश्राद्ध झालेलं आहे आणी वाडीचा नैवेद्य कुत्र्यानी वगैरे खाल्लेला नसून तो आपोआप गायब झाल्याची वदंता आहे,,,या पार्श्व-भूमीवर काही स्त्रीया गुप्त खलबंतं केल्याप्रमाणे पडल्या/पडल्या सुरू होतात...

स्त्री १-काय गं झोप लागत्ये?
स्त्री २- नाय बा,,,लागेल कशी?तुला कळ्ळ नाय?
स्त्री१- (दबक्या आवाजात) का$$$$य? ते पान ना? त्यात काय कळायचय मेलं? अत्रुप्ती हो...दुसरं काही नाय
स्त्री२-मला वाट्टं,पलीकडचे मामा
स्त्री१- कोण? गेल्या आषाढात गेले ते?
स्त्री२-नाय तं काय? इतका अत्रुप्त दुसरा होता का तरी कोणी गावात?
स्त्री१-हो बाई,ती पलीकडची कुमुद आहे ना,ती म्हणत होती दुपारी शेणकीत शेण टाकायला आली तेंव्हा तीला हे आपण वाडीला ठेवलेलं पान हलताना दिसलं म्हणे...
स्त्री२-होय की काय? आणी गं म ?
स्त्री१- तिचं तेच म्हणण हो,,,मामांचं त्यांच्या पोरांनी काही मंजे का...ही केलन नाई ना,त्याचा परिणाम
स्त्री२-जळो मेलं,तरीच मी म्हण्ट्ये...स्वतःचा चहा ढोसल्यावर सुधा,दुसय्राच्या कपावर मेल्याची भारी नजर असायची,,,माणसं जगतात ती जगतात आणी मेल्यावर सुद्धा स्वभाव जरा देखिल बदलत नाही हो...

एवढ्यात स्त्री क्रमांक-१ चा दिवटा (वय-साधारण-८/९) ''आई पोटात मळमळतय...'' म्हणुन रडत उठतो..
स्त्री१- जरा मेलं निजल्ये नाई त आली ही ब्याद ...पोराला - काय रे मेल्या,काय झाल?वावडींग घातलवतं ना संध्याकाळी तूला?
पोरगा-आई,,उलटी होत्ये...वळचणीचा लाइट लाव ना..आणी तू पण ये...हो... मला भीती वाट्टे एकट्याला...स्त्री१ पोराच्या पाठीत धपाटा घालत...'चल हो पुढे'....बाहेर जाऊन पोर बकाबका ओकतं....आणी स्त्री१ला धक्का बसतो....
स्त्री१-(मोठ्यांदी ओरडते)काय कार्ट आहे मेलं
स्त्री२-(लगबगीनं बाहेर येउन)- काय गं आता उलटी झाली त पोरावर चिडत्येस कसली?
स्त्री१-अगो...काल पासून पोट दुखत होत म्हणून लंघन करायला भाग पाडल ना याला,,,आणी उलटी मधे हे भरड्याच्या वड्याचे भरा भरा खाताना अर्धे चावलेले तुकडे पडलेत...अगो ते पान दुसय्रा कुणी खाल्लन नाइ...हाच आमचा मेला भस्म्या...अता गोठ्यात डांबते...आणी चांगलं २/४ दिवस ठेवते हो उपाशी.....वगैरे वगैरे.....

देन चिंटू, ट्येल मी,,,व्हाट इज दी मॉराल आफ श्टोरी...?---
खय्रा गोष्टी जो पर्यंत उजेडात येत नाहीत तोपर्यंत खोट्या गोष्टीच खय्रा असतात Wink

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users