मित्रहो,
कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची
लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का??
मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात.
मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर. मला स्वत:ला खिद्रापुरचे मन्दीर परत पहायच आहे. कारण आता त्याची स्मृती माझ्या मेन्दुतुन जास्तच पुसली गेली आहे. असे अनेक ठिकाण आहेत जे जावीच अशी आहेत.
कालच साप्ताहिक सकाळमधील एक लेख वाचला आणि जाणवल की अरे ह्यात मला माहित असलेल्या अनेक ठिकाणांची माहिती आहे की.
उदाहरणार्थ मसाई पठार. मी पैज लावु शकतो की ह्या विषयी कोणीच फारस ऐकलं नसेल.
हे पठार आणि त्यावर असलेली पांडव लेणी ही काहि वर्षापुर्वी (म्हणजे मी हाफ पॅन्ट घालुन शाळेत जात असताना) वादाच केंद्र झाल होत. त्यावेळीच काय त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ते प्रकरण थंड झाल.
मी ती लेणी पाहिली आहे. माझ्या मावशीच्या गावापासुन फारतर ५-६ किमी चालत गेल की मसाई पठार लागत.
मी कित्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे गेलो आहे.
तर अशा अनेक ठिकाणांची माहिती देणारा हा लेख वाचाच. आणि ह्या ठिकाणाना देखील भेट द्या.
http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html
(ह्या लिन्क वर गेलात की तीर्थक्षेत्र आणि कलानगरी - कोल्हापुर ह्यावर क्लिक करा.)
ह्या लेखात तरी एका किल्ल्याचा उल्लेख राहिला आहे. रांगणा किल्ला. इतिहासाच्या पुस्तकात नकाशात हे नाव पाहिल होत आणी त्यानंतर विसरुनच गेलो होतो ह्या किल्ल्याविषयी. हा फारसा प्रसिद्ध नसलेला किल्ला. ह्याची माहिती लोकसत्ता मध्ये भटकंती सदरात आली होती. गगनगडाच्या आसपास आहे हा.
तसच वरच्या लेखात << कोल्हापुरातून बाहेर पडून जुन्या पुणे-बंगळूरु मार्गावरुन कागलच्या दिशेने निघालं की लगेचच उजव्या हाताला कणेरी हे ठिकाण आहे. या ठिकाणी शिवमंदिर आणि अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांचा मठ आहे. शिवरात्रीला कणेरी मठावर मोठी यात्रा भरते. अलीकडे ग्रामसंस्कृती, ग्रामीण जीवनशैली यांची पुढच्या पिढ्यांना ओळख व्हावी म्हणून कणेरी मठातर्फे एक वेगळा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जुन्या शैलीतील घरं व ग्रामीण शैलीचं दर्शन घडवणारं एक वेगळं गावच वसवण्यात आलं आहे>> ही माहिती आहे.
कन्हेरी मठ बघणे हे मस्ट मस्ट आणि मस्टच आहे अस माझ मत झालय.
त्यानी तेथे वसवलेल गाव पाहुन मी अचंबीत झालो. खुप कष्ट घेतल आहे त्यासाठी त्या लोकानी. हे गाव बघण्यासाठी २५ रु तिकिट आहे पण ते खुपच कमी आहे असच वाटेल तुम्हाला. तिथे फोटो काढण्यास बन्दी आहे. पण त्यानी तिथेच एक बाग केली आहे त्याचे मी फोटो काढले आहेत.
त्यातील हे काही.
हे राशी उद्यान आहे. प्रत्येक राशीची माहिती आणि त्याच चिन्ह त्यानी बनवलेल आहे. हे चिन्ह बनवताना तीच पद्धत वापरली आहे जी त्या गावातले पुतळे बनवताना वापरली आहे. खालील फोटोत मेष रास दिसत आहे.
ही त्याच बागेतील बसण्याची व्यवस्था.
अजुन काहि फोटो पहायचे असतील तर ते खालील लिन्क वर आहेत.
http://picasaweb.google.com/zakasrao/KanheriMath?authkey=ZQsGxI7GWbU#
मग येणार ना कोल्हापुरला?? आणि हे सगळ पाहणार ना??
ह्यातील एखाद्या ठिकाणाची माहिती हवी असेल तर बिन्धास्त विचारा मी देइनच.
नक्की या
निवांत
निवांत सुंदर आहे पोवाडा...
हो, मि असे
हो, मि असे इकले आहे कि, रन्काळातिल सगले पानि नदिला सोडनार आहेत आनि सगळा गाळ बाहेर काढनार आहेत म्हनून...
होय मी पण
होय मी पण असेच ऐकले आहे....या वीकेंडला घरी जायचा प्लॅन आहे (बहुतेक :-))....प्रत्यक्ष पहाणी करुन खबर कळवतो..:-)
निवांत, पोवाडा मस्तच आहे..
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
कोल्हापुर
कोल्हापुरात चांगलं वाचनालय कोणतं आहे?
मराठी आणि इंग्रजी ललित, कादंबर्या इ इ वाचनाची प्रचंड आवड आहे
पण नक्की कुठे चांगली लायब्ररी आहे हेच माहीती नाहीये..
कुणी सांगेल का हे मला???
झक्कास, तां
झक्कास,
तांबडा रस्सा चार-पाच वाट्या प्यायल्याचं समाधान मिळालं....
>>पण नक्की
>>पण नक्की कुठे चांगली लायब्ररी आहे हेच माहीती नाहीये..
करवीर नगर वाचन मंदीर - भवानी मंडपात कुणालाबी ईच्चारा
>>पानि नदिला सोडनार आहेत आनि सगळा गाळ बाहेर काढनार आहेत म्हनून...
आणि मग परत कुठून भरणार पाणी
>>आणि मग परत
>>आणि मग परत कुठून भरणार पाणी
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
मनकवडा
मनकवडा
आभार करवीर नगर वाचन मंदिर सुचवल्याबद्दल !
सुनील राव,
सुनील राव,
नगर वाचन मंदीर खुप जुने आहे आणि पुस्तके ही बरीच आहेत, पण चांगली आणि प्रसिद्ध पुस्तके पटकन मिळत नाहीत.
तिथला स्टाफ पण चांगला नाही... कुठल्याही प्रसिद्ध लेखकाचे पुस्तक पहिल्या request मधे देत नाहीत... (हे एक ठिकाण मला कोल्हापुरात 'पुणेरी' वाटले :फिदी:)
तरी पण मला दुसरे कुठले अजुन चांगले वाचनालय मिळाले नाही... म्हणुन नक्की जाउन बघा...आता कदाचित सुधारणा झाली असेल..
भास्करराव
भास्करराव जाधव वाचनालय मध्ये पण खुप पुस्तके अाहेत. पूर्वी कपिलतीर्थ मध्ये होतं, अाता नक्की कुठे अाहे विसरलो...
भास्करराव
भास्करराव जाधव वाचनालय..अर्धा शिवाजी पुतळ्यापासुन महाराष्ट्र हायस्कुल कडे जाताना उजव्या बाजुला लागते.. गांधी मैदानाच्या मागच्या गेटच्या अगदी जवळ आहे..वाचनालयाच्या समोर कोनीकाचे शोरूम आहे..तिथेही चौकशी करण्यास हरकत नाही
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
नमस्कार कव
नमस्कार
कवड्या,सुनिल्,मोकाट्,केदार्,गिरिष
काय विशेश??
केद्या,
केद्या, अनुमोदन!!!
आणि तिथे १ बालविभाग पण आहे, तिथला माणूस तर लय मंद होता...
भास्करराव जाधव कपिलतिर्थ ला पण आहे
हाय कैरे, इकडे कशी काय?
कार कवड्या
कार कवड्या कैरीन कोल्लापुरात येउ न्हाइ कि काय
अरे केदार
अरे केदार मी तुला १ खरड टाकलि होति उत्तर दिल नाहिस का रे??
आयला,
आयला, झक्कास्...एकदम कोलापुरी श्टाईल न बोल्ली की
ये ये स्वागत आहे तुझं!!!
@gauri
@gauri balkawade-tupe
नमस्कार.
हल्ली कोल्हापूरचे स्पेशल शब्द या विभागातच जास्त चर्चा चालू अाहेत. तिकडे भेट द्या अवश्य...
अरे..रंकाळा
अरे..रंकाळा स्वच्छ करण्याचे काम पुढे ढकलले आहे..(आता बहुतेक पुढ्च्या वर्षीच चालु होणार
)
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
मोकाट
मोकाट राव्..काय म्हणता..लै दिसानी दिसलासा..सम्द थिक हाय नव्ह का ?
०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/
हाय कार
हाय कार कुणी,का गेले हाता तोडांची मारामारी खेळायला??
काय वो
काय वो गौरी ताई...कशा काय वाट चुकलासा हिकड..
०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/
केदार..सगळे
केदार..सगळे निवांत रे...मित्राचे लगीन होते बाबा..परवा....आजच आलो परत
गौरी ताई आम्ही हाय ईकडे..पण लवकरच मायबोलीचा access जाणार आहे माझ्या संगणकावरुन त्यामुळे फकस्त संध्याकाळीच वेळ मिळणार मायबोलीसाठी..:-(
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
पण इतक्या
पण इतक्या वर्षात -
.१ रंकाळ्याच पाणी इतकं खाली गेल्याच बघीतलं.
.२ ल्हान-ल्हान नागडी पोरं उड्या मा-मारुन पवताना बघितली.
.३ २-४ बदकं पण पाण्यात होती.
एकूण काय...रंकाळा बराच स्वच्छ केलाय.
मोकाट तुझा
मोकाट तुझा माबो अॅक्सेस गेला कि तु कुठ मोकाट सुटणार??
वाट चुकले नाही रे,वाकडी करुन आले,आज काय विषेश??
होय रंकाळा
होय रंकाळा आधीच्या तुलनेत स्वच्छ केलाय्..पण फक्त केंदाळ काढलय्..(केंदाळ परत थोड्या दिवसांनी डोके काढते)..मागे कसले किडे सोडले होते केंदाळ खायला..ते किडेच गायब झाले..केंदाळ जायच्या ऐवजी!!
मी कधी कधी खणीत पोहायला जातो..:-) तिथे पाणी स्वच्छ असते. पुर्वी नदीत पोहायला जायचो पण अलिकडे नदीचे पाणी फारच खराब झाले आहे..:-(
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
नमस्कार
नमस्कार मंडळी. मी कोल्हापूरची नाहिये. पण एक माहिती मला हवी आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्हाड, बेळगांव वगैरे ठिकाणची चांगली वधूवर सूचक मंडळं कुणाला माहिती असतील तर मला प्लीज सांगाल का?
advance मधे thanx!.
गौरी..माबोच
गौरी..माबोचा अअॅक्सेस गेला की अभ्यासाच्या (Oracle) मागे मोकाट सुटणार..दुसरा काहीही पर्याय नाही
asmaani, तुम्हाला चौकशी करुन माहिती कळवतो.
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
मोकाट
मोकाट कट्ट्यावर नहि येत तु??
नाही..कट्ट्
नाही..कट्ट्यावर यायला जमत नाही..सारखे काही ना काही काम असते..(अर्थात ऑफिसमध्ये असल्याने :डोमा:) त्यामुळे सलग पोस्ट टाकायला जमत नाही..:-(..असेच कधीतरी अधे-मधे..
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
हो का,अरे
हो का,अरे रे
Pages