चिवळ भजी

Submitted by मंजूताई on 6 May, 2013 - 05:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो चिवळ भाजी, दीड वाटी बेसन, लसूण दहा बारा पाकळ्या, हळद, तिखट, मीठ चवीनुसार व तेल

क्रमवार पाककृती: 

चिवळ किंवा चिऊची भाजी दोन तीनदा पाण्यातून काढून निवडून घ्यावी. भाजीची फक्त मूळं काढावीत व चिरुन घ्यावी त्यात बेसन, वाटलेला लसूण,हळद,, तिखट, मीठ, चमचा भर तेल घालून चांगलं कालवून घ्यावे. पाणी आवश्यकता वाटल्यास घालावे. भज्यांच्या पीठापेक्षा घट्ट हवे. गरम तेलात भजी तळून घ्यावी.

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

चिवळ किंवा चिऊची भाजी पीठ पेरुन केली जाते आज माझ्या भावजयीने हा प्रकार केला अप्रतिम झाला. नेहमीच्या हराभरा कबाब, मंचुरीयनला सारख्या स्टार्टरला एक उत्तम पर्याय

माहितीचा स्रोत: 
गीता
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयंत किशोर दिनेशदा धन्यवाद! दिनेशदा - हो ह्याच दिवसात मिळते आणि चिरल्यावर चिकट होत नाही चवीला आंबूस असते. ही भाजी घोळच्या जातकुळीतली.

हीलाच 'घोळ्'ची भाजी म्हणतात ना?

पीठ पेरुन मस्त लागते ही भाजी. पण ही भाजी निवडायला फार वेळ लागतो.

भजी करुन बघणेत येइल.

मंजू, मागे बी ने सविस्तर लिहिले होते या भाजीबद्दल. लहान मुलाना उन्हाचा त्रास होत असेल तर या भाजीच्या पोत्यावर झोपवतात असे पण लिहिले होते त्याने.
मुंबईत घोळच मिळते आणि त्यात पण साधी घोळ आणि राजघोळ असे दोन प्रकार दिसतात.

मंजूडी............अगं मला वाटतं की मुळं तेवढी काढून टाकावी. बाकी फार काही निवडून फेकू नका.(फक्त मुळंच फेका) असं म्हटलंय मंजूने!(हसणारी बाहुली!!!!)

मस्त Happy
याला गावच्या भाषेत चिव्वय असे म्हणतात, बागेतही पेरतात काही जण.
मुंबईत सुद्धा हि मिळते पार्ल्यात, पण फार नाशीवंत असते.

हीलाच 'घोळ्'ची भाजी म्हणतात ना? >>> आर्याताई घोळ वेगळी गं, घोळीचा देठ जाड असतो, पानही मोठी असतात साधारण मेथीच्या पाना सारखी. चिऊ ची पान चिमणी म्हणजे छोट्या टिकलीच्या आकाराची असतात. दोन्ही भाज्या आवडीच्या पण पुण्यात घोळ दिसली नाही कधी Sad

मानुषी - अगदी बरोब्बर Happy
दिनेशदा - ही भाजी थंड असते हे माहीत होते पण उपचार माहीत नव्हता
बागुलबुवा - केली - खाल्ली मगच पाकृ टाकली म्हणजेच ट्राईड अन टेस्टेड रेसिपी Happy
आशु२९ - मी पण मागच्या आठवड्यात पार्ल्यात बघितली होती ही काल औरंगाबादेत खाल्ली
स्निग्धा - ही भाजी घोळ भाजीचं मिनिच्युअर !
नक्की करुन पहा अगदी सोप्पी अन टेस्टी, हेल्थी रेसिपी! अगदी कमी तेलात तळली जातात....

Pages