फोडणीचा भात -किती किती/कसे कसे प्रकार

Submitted by वर्षू. on 20 April, 2013 - 21:33

आदल्या रात्री पाहुणे येऊन गेले की दुसर्‍या दिवशी भात हमखास उरलेला असतो. जागरणाने आलेला थकवा अजून कायम असतो,अश्यावेळी वन मील डिश म्हणून ,' फोडणीचा भात' हा एकच पर्याय मला सुचतो Wink
काल ही असंच झालं.. पण नेहमी ची रेसिपी करण्याचा कंटाळा आला म्हणून काहीतरी वेरिएशन करावसं वाटलं
म्हणून भाता मधे मीठ,धन्याची पावडर्,तिखट नीट मिक्स करून घेतलं. जिरे,मोहरी,हिंग्,हळदी ची फोडणी करून शेंगदाणे घातले ते कुरकुरीत झाल्यावर,कढीपत्ता,कांदा अ‍ॅड केला. मग भात अ‍ॅड करून सर्व मसाला नीट मिक्स केला. गॅस बंद करून थोडा लिंबाचा रस आणी कोथिंबीर घातली..
खायला देताना वरून कुरकुरीत तळलेले पोहे स्प्रिंकल केले.. दह्यातल्या कोशिंबीरी बरोबर सर्व केले..
(पोहे तळल्यावर ते अगदी कोरडे व्हावे म्हणून लहान गाळणीत थोडे थोडे घेऊन तळले)

तुमच्याही जवळ फोडणी च्या भाताच्या रेसिपीज इथे जरूर शेअर करा.. मग मिक्स अ‍ॅण्ड मॅच करून त्यांमधून अजून ही कितीतरी हटके रेसिपीज तयार होतील..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ एम जी... अविश्वसनीय!!!!!!!!!!!!
किती वेरिएशन्स येताहेत.. अमेझिंग!! स्लर्पी!!
पकौडे,वडे,सांडगे,शिवाय निरनिराळ्या पद्धती... सगळ्यांच्या प्रिंट आऊट्स काढून ठेवणारे..
इतक्या टेंप्टिंग रेसिपीज येताहेत सर्वांच्या कि आता मुद्दामून रोज रोज एक्स्ट्रा भात करावासा वाटतोय.. Happy

सगळ्याच आयडियाज मस्त Happy

१. भात आणि भाजी दोन्ही उरले असेल तर - पसरट पॅन मधे फोडणीत जिरे, कांदा, आलं लसुण पेस्ट घालुन परतायचे. त्यात भाजी/आमटी जे काहि उरले असेल ते घालायचे. वरतुन गरम मसाला / पाभा मसाला घालुन परतायचे. यावर उरलेल्या भातात थोडे पाण्यात कालवलेले निठ घालुन मोकळा करुन घ्यायचा आणि वरच्या भाजीच्या मिश्रणावर पसरायचा. मधे मधे भोके करुन त्यात थोडे क्रिम सोडायचे. पॅन ला झाकण लावुन मंद आचेवर ५-१० मिनिटे ठेवायचं. वरतुन तळलेला कांदा / काजु / कोथिंबीर घालुन 'तवा बिर्याणी' म्हणुन सर्व करायच Wink सोबत रायता ....

२. मी वरण शिजवले की आमटी करायच्या आधी वाटीभर वरण नेहमी काढुन ठेवते पराठ्यात धिरड्यात वगैरे घालायला. परवा भात आणि हे वरण दोन्ही उरले होते. फोडणीत मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद आणि टोमेटोज घालुन परतले. त्यात मटार आणि गाजराचे तुकडे घालुन शिजवले. त्यावर सांबार मसाला घातला आणि उरलेले वरण घातले. त्यातच उरलेला भात घालुन परतले. वरतुन थोडे तूप घातले. मस्त इंस्टंट बिशेबिळे अन्ना तय्यार Happy सोबत दही आणि लोणचे....

३. भातात ताक, मिठ, कांदा लसुण चटणी, कोथिंबीर घालुन मळुन मुटके वळायचे आणि वाफवायचे. वाफवलेल्या मुटक्यांचे तुकडे करुन कढीपत्ता, मोहरी, हिंगाच्या फोडणीत परतायचे. वरुन कोथिंबीर पेरुन गट्टमायचे Happy

अजुन थोड्यावेळाने लिहिते Happy

आली आली लाजोबेन आली... Happy
लाजो तिन्ही टिप्स सुपर दिसताहेत... रेस्पी वाचतानाच तोंडाला चव आली कि ती रेस्पी हिट झालीच म्हणायची..

प्रतिसादातले सगळे प्रकार वाचलेले नाहियेत, त्यामुळे हा प्रकार कुणी लिहीला असेल तर माहित नाही.. पण कडक उन असेल अन भात लगेच संपवायचा नसेल तर ताटात भात मोकळा पसरवुन उन्हात कडकडीत वाळवावा.. अगदी कुरडया वाळवुन साठ्वतो तसा.. नंतर सवडीने वाळलेला भात तळुन, त्यात तिखट मीठ पिठीसाखर, तळलेले शेंगदाणे, कढीपत्ता, लसुन इ, घालुन मस्त चिवडा करावा

चिमुरी मस्त प्रकार सांगितलास.. वैवकु ने सजेस्ट केलाय वरती आहे थोडा मिळता जुळता..

१भातावर कांदा कोथिंबीर बारीक चिरुन आणि थोडस तेल, कांदालसणीचे तिखट, मिठ घालुन कालवायचा मस्त लागतो.
२ नेहमी प्रमाणे फो. चा भात करताना त्यावर थाय्/थाई स्वीट रेड चिली सॉस घालुन परतायचा तो पण मस्त लागतो.

हाँ, छान थाय टेस्ट येईल अनु..
असाच इंडोनेशिअन नासी गोरेंग (फ्राईड राईस) ही खूप छान लागतो..
माझ्याकडे ऑफन होणारा प्रकार

वोक मधे थोड्या तेलात लहान कांद्याच्या पातळ स्लाईसेस , आलं लसूण बारीक चिरून हाय फ्लेम वर थोड.न परतायचे. त्यावर श्रेडेड बोनलेस चिकन घालून स्टर फ्राय करून वरून श्रिंप्स अ‍ॅड करावे.. शिजले कि भात अ‍ॅड करून नीट मिक्स करा. वरून चिली बीन सॉस किंवा आपला लाल ठेचा, ऑईस्टर सॉस ,डार्क सोया सॉस चवीनुसार घालावे.
नीट परतावे.
स्प्रिंग ओनियन ची चिरलेली पाती ,एका अंड्याचे ऑम्लेट (बिना कांदा/कोथ्मीर) करून त्याच्या स्ट्रिप्स ने सजवावे. सलाद म्हणून कोवळ्या चवळीच्या शेंगा, पानकोबी ची पानं,सॅलड लीव्ज, काकडी -गाजर च्या चकत्या, चेरी टोमॅटोज सर्व करावे..

नासी गोरेंग छान मोकळा व्हायला भात आदल्या दिवशीचाच हवा..

फोटो नेट वरून साभार...

भाता मधे मीठ,धन्याची पावडर्,तिखट नीट मिक्स करून घेतलं. जिरे,मोहरी,हिंग्,हळदी ची फोडणी करून>>+++ बीट ,गाजर किसुन , कांदा, गरम मसाला . मस्त दिसतो भात आणी बीट ,गाजर हि पोटात जाते. चविला पन मस्त ...केला कि फोटो टाकेन..

रावण भात मी अश्यापध्दतीने करते..

भात मोकळा करुन घ्यावा.

मोहरी, हिंग, लाल मिरच्या(खड्या), कढीपत्ता,हळद, हरभरा डाळ(भिजवलेली), शेंगदाणे याची फोडणी करावी. मोकळा केलेला भात या मधे मिसळावा. भाजलेल्या तिळाचा कुट, भाजलेल्या उडद डाळीचा कुट, आमचुर पावडर, मीठ, साखर चवी नुसार टाकावी. भातात सगळं मिक्स करावे. कोथिंबीर टाकुन गरम सर्व्ह करावे.

काय मस्त प्रकार सुचवलेत.
माझा आवडता प्रकार म्हणजे दहुबुत्तीच. त्यासाठी मुद्दाम भात वगळतो.
कैरीचा किस किंवा चिंचेचा शिजवलेला कोळ घालूनही प्रकार करता येतो.

बंगाली, पांता भात म्हणूनही एक प्रकार असतो ना ?

नमिता ...तुला सा न ......

बिसीबिळी अन्नम ......

अदल्या दिवशीचा किवा ताजा कोणता ही भात चालतो ... तुर डाळिचे वरण शिजवुन घ्यावे .... साबार करावे..त्यात फोडणीला काजु, बेदाणे , बदाम हे टाकावेत. साबार मधे आपण टाकत नाही म्ह्णुन इथे मुद्दाम नमुद केले.. Happy साबार जरा पातळ करावे... त्यात शिजलेला भात मोकळा करुन टाकावा व उ़कळी येउ द्यावी . मस्त गरम गरम सर्व करावा ... हे वन डिश मील आहे ....

bisi-bele-bhaat-1736.jpg

फोटो नेट वरुन साभार ...

ज्यांच्या कडे गोड आवडते त्यांनी नारळ-गुळ घालुन नारळीभात केला तरी शिळाभात लगेच संपतो.
मी तसेच करते.

शिळ्या भाताचं गोड व्हर्जनः
थोड्याश्या तुपाची फोडणी करायची. एक दोन लवंगा फोडणीत टाकायच्या. चिमटीभर हळद टाकून वरून भरपूरओलें खोबरं टाकून परतून घ्यायचं. शिळा भात टाकून परता. मग बारीक चिरलेला गूळ घालून एक वाफ काढा. ढवळत रहा. नारळीभात रेडी!

मस्त धागा. मेतकूट आणि चपाती +१. ओले बोंबील - अहाहा
त्या इंडोनेशियन राईसची डिश पळवून न्यावीशी वाटतेय. Happy

हि आमच्या थोरल्या बंधुराजांची रेस्पी Happy

आम्हाला चायनीज वाटतात अशा भाज्या ( कोबी हवाच, मग पातीचा नाहीतर साधा कांदा, गाजर, फरसबी ) अशा भाज्या, आम्हाला जमतात अशा चिनी प्रकारे कापायच्या.
आम्हाला आवडतो म्हणून भरपूर लसूण, आले, मिरच्या आणि आमच्या घरी असतेच म्हणून कोथिंबीर कापून घ्यायची.
फोडणीच्या डब्यात असतेच म्हणून हिंग / जिर्‍याची फोडणी करुन त्यात आले लसूण परतायचे मग भाज्या भरभर परतायच्या. कढईचा आवाज येणे माह्त्वाचे, भाज्या किती शिजतात याला महत्व नाही. मग हाताशी लागतील ते सॉस ( म्हणजे साधारणपणे केचपच, नाहीतर मॅगीचा चिली गार्लिक, इमली सॉस जो असेल तो. सापडली आणि सुकून तिचे तोंड बंद झाले नसेल तर सोया सॉसची बाटली जरा हलवून त्यातले काही थेंब) टाकायचे.
मग हाताशी असला तर चायनीज ग्रेव्ही मसाला मिक्स शिवरायचे. मग त्यावर भात फोर्कने मोकळा करुन टाकायचा.

आणि मग मी खाऊ नये म्हणून त्यावर अंडे फोडून टाकायचे.

आणि बंधुराजांच्या मते अस्ला अप्रतिम चायनीज फ्राईड राईस तर चायनामधे पण मिळत नाही.

कढईचा आवाज येणे माह्त्वाचे
सुकून तिचे तोंड बंद झाले नसेल तर सोया सॉसची बाटली जरा हलवून त्यातले काही थेंब) टाकायचे. Rofl Rofl
अशक्य हसतेय..
शेवट कळस.. माझ्या घरी जेवायला बोलावलं तर करकोचा, कोल्ह्याकडे गेल्या सार्खं वाटेल नै तुम्हाला दिनेश दा.. हीही!!!!

अमेय तेरा वर्जन किधर है???

भाताचे आणखी काही प्रकार --
१] बेसन भात-- भाताला फोडणी घालायची. आवडत असल्यास मिरची ,कांदा घालू शकतो त्यात थोड दही घालुन थोड बेसन लावायच. [झुनका करतो तसा.] वाफ आली चांगली . कि कोथिंबीर घालायची. डीश तयार.
२ ] चकली-- भाताला पाणी घालून गरम करायचा. नंतर त्यात मिठ, तीळ घालून चकल्या [पांढर्याच] करायच्या. कडक उन्हात वाळवायच्या. केव्हाही तळून खाता येतात.लागतात व दिसतातही छान.मी तर या दिवसात मुद्दाम जास्त भात बनवुन करुन ठेवते. मुलांना खुप आवडतो हा प्रकार.
३] भाताची खीर-- दूध घालून भात नरम झाला कि अजुन दूध घालु न पाहिजे तेवढ पातळ कराव. आवडीप्रमाणे ड्राय-फ्रूट ,साखर केशर विलायची, जायफळ घालाव. मस्त खीर तयार. छानच लागते चव.

कढईचा आवाज येणे माह्त्वाचे, >>>> Biggrin कढईचा आवाज = चायनीज भात म्हणजे बरोबरच आहे की!

वर्षुताई, त्या प्रचितला भात मला हवाय!

भाताचे आणखी काही प्रकार --
१] बेसन भात-- भाताला फोडणी घालायची. आवडत असल्यास मिरची ,कांदा घालू शकतो त्यात थोड दही घालुन थोड बेसन लावायच. [झुनका करतो तसा.] वाफ आली चांगली . कि कोथिंबीर घालायची. डीश तयार.
२ ] चकली-- भाताला पाणी घालून गरम करायचा. नंतर त्यात मिठ, तीळ घालून चकल्या [पांढर्याच] करायच्या. कडक उन्हात वाळवायच्या. केव्हाही तळून खाता येतात.लागतात व दिसतातही छान.मी तर या दिवसात मुद्दाम जास्त भात बनवुन करुन ठेवते. मुलांना खुप आवडतो हा प्रकार.
३] भाताची खीर-- दूध घालून भात नरम झाला कि अजुन दूध घालु न पाहिजे तेवढ पातळ कराव. आवडीप्रमाणे ड्राय-फ्रूट ,साखर केशर विलायची, जायफळ घालाव. मस्त खीर तयार. छानच लागते चव.

खूपच छान धागा. केव्हडे प्रकार कळलेत. भाताचे .रोज १-१ बनवता येइल. धन्यवाद.

भाताचे आणखी काही प्रकार --
१] बेसन भात-- भाताला फोडणी घालायची. आवडत असल्यास मिरची ,कांदा घालू शकतो त्यात थोड दही घालुन थोड बेसन लावायच. [झुनका करतो तसा.] वाफ आली चांगली . कि कोथिंबीर घालायची. डीश तयार.
२ ] चकली-- भाताला पाणी घालून गरम करायचा. नंतर त्यात मिठ, तीळ घालून चकल्या [पांढर्याच] करायच्या. कडक उन्हात वाळवायच्या. केव्हाही तळून खाता येतात.लागतात व दिसतातही छान.मी तर या दिवसात मुद्दाम जास्त भात बनवुन करुन ठेवते. मुलांना खुप आवडतो हा प्रकार.
३] भाताची खीर-- दूध घालून भात नरम झाला कि अजुन दूध घालु न पाहिजे तेवढ पातळ कराव. आवडीप्रमाणे ड्राय-फ्रूट ,साखर केशर विलायची, जायफळ घालाव. मस्त खीर तयार. छानच लागते चव.

खूपच छान धागा. केव्हडे प्रकार कळलेत. भाताचे .रोज १-१ बनवता येइल. धन्यवाद.

लय भारी बाफ.
फोडणीच्या भातात मेतकूट घालून मी पण करते. छान वेगळी चव येते.
अजुन एक प्रकार म्हणजे, फोडणीत बाकीच्या गोष्टींबरोबर साल्सा टाकायचा. मस्त चव येते (इती मावसभाऊ). वेगवेगळ्या साल्स्यांप्रमाणे वेगवेगळ्या चवीचा भात होतो.

इथे कोणितरी इटालीयन हर्ब्स आणि मेतकुट घालून भाताची रेसिपी दिली होती ( नक्कि कोणि ते आठवत नाही Sad ) .सध्या तो एक्दम हिट ... ऑफिसमध्ये सुद्धा .

डब्यात पोळीभाजी आणायचा कन्टाळा आला आणी शिळा भात असेल .. तर बटरवर भात परतते त्यात भाजी घालून एक वाफ आणायची.
साधार्ण पणे कुठलीही भाजी .. कोबी , पालेभाजी, फ्लोवर्-बटाटा , मटकीची उसळ ...

भात उरल्यास तो प्रथम मोकळा करावा व त्यात कांदा , दही , सांबर मसाला , कैरी बारीक चिरुन , शेँगदाणे , तिखटमीठ घालुन गॅसवर ठेऊन मंद आचेवर खोबरे किसुन परतुन घ्यावे खुप चविष्ट लागते. एकटा असल्यास मी नेहमी करतो .

Pages