फोडणीचा भात -किती किती/कसे कसे प्रकार

Submitted by वर्षू. on 20 April, 2013 - 21:33

आदल्या रात्री पाहुणे येऊन गेले की दुसर्‍या दिवशी भात हमखास उरलेला असतो. जागरणाने आलेला थकवा अजून कायम असतो,अश्यावेळी वन मील डिश म्हणून ,' फोडणीचा भात' हा एकच पर्याय मला सुचतो Wink
काल ही असंच झालं.. पण नेहमी ची रेसिपी करण्याचा कंटाळा आला म्हणून काहीतरी वेरिएशन करावसं वाटलं
म्हणून भाता मधे मीठ,धन्याची पावडर्,तिखट नीट मिक्स करून घेतलं. जिरे,मोहरी,हिंग्,हळदी ची फोडणी करून शेंगदाणे घातले ते कुरकुरीत झाल्यावर,कढीपत्ता,कांदा अ‍ॅड केला. मग भात अ‍ॅड करून सर्व मसाला नीट मिक्स केला. गॅस बंद करून थोडा लिंबाचा रस आणी कोथिंबीर घातली..
खायला देताना वरून कुरकुरीत तळलेले पोहे स्प्रिंकल केले.. दह्यातल्या कोशिंबीरी बरोबर सर्व केले..
(पोहे तळल्यावर ते अगदी कोरडे व्हावे म्हणून लहान गाळणीत थोडे थोडे घेऊन तळले)

तुमच्याही जवळ फोडणी च्या भाताच्या रेसिपीज इथे जरूर शेअर करा.. मग मिक्स अ‍ॅण्ड मॅच करून त्यांमधून अजून ही कितीतरी हटके रेसिपीज तयार होतील..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उरलेल्या भाताला मिक्सर मधून होईल तेवढे बारीक करून घ्यावे (भात नरम असेल तर हाताने मळला तरी चालेल) नंतर त्यात तिखट, मीठ, जीर धने पूड, कोथिंबीर घालून मळावे थोडे थोडे पीठ घालत राहावे…. निट मळून झाले कि मध्ये तेल लाऊन त्रिकोणी पराठा करतात तसे पराठे लाटावे ….दोन्हि बाजूने तेल घालून खरपूस भाजून घ्यावे…. हा पराठा दही सोबत खूप चविष्ट लागतो

२ . चिवडा करतात अगदी तसाच फोडणी घालायचा... डाळ्या, शेंगदाणे, कडीपत्ता सगळं तसच वाप्रुन .... वाढतान्ना वरून कुरमुरे आणि शेव पेरावी ….

३. चिंचेचा कोळ किंवा लिंबू घालून कडीपत्ताची फोडणी करतात …हा आंबट भात पण मस्त लागतो ……
४. भात मोकळा करून घ्यावा …. एका कढइत तेल घेऊन त्यात जीर मोहरी हिंगाची फोडणी करावी हिरव्या मिरच्या घालाव्यात आणि कढीपत्ता टाकावा … हि फोडणी भातावर ओतून थोडी साखर मीठ आणि वरून लिंबू पिळावे …… साधा पण चविष्ट प्रकार

ओह्हो.. घावन ही.. वॉव किती ऑप्शन्स मिळत आहेत..
धनंजय.. कांदा वगैरे कच्चाच घालायचाय का?? छान आहे ही रेस्पी ही.. Happy

वर्षू, हा फोटो आणि कृती देतोय खरा, पण असला चक्रमपणा कुणी करेल असे वाटत नाही ( माझ्याशिवाय ! )

उरलेला भात, स्वीट कॉर्न, टोमॅटो ज्यूस, लाल तिखट, सोया सॉस असे सगळे एकत्र शिजवलेय, त्यात थोडी साखर घातली. आणि तिरंगी पास्ता शिजवून व्हाईट सॉसमधे टाकलाय. हे सगळे पातळ कापलेल्या कोबीच्या वर पसरले.

भारी आहेत सगळ्याच रेसिप्या.
आता एवढ्या सगळ्या करुन बघण्यासाठी किती दिवस जास्तीचा भात शिजवावा लागेल याचा विचार करतेय. Lol

दिनेश दा.. फारच टेंप्टिंग दिस्तंय परकरण... इंडोवेस्टर्न... पास्त्या इन व्हाईट सॉस असल्याने हे काँबी छानच लागलं असेल..

सावली.. अगदी!!अगदी!!! Lol

सावली Lol

दिनेशदा, छान दिसतोय भात - पण भातात सॉयासॉस आणि पास्त्यावर व्हाईट सॉस... दोन्ही Uhoh

अजुन प्रकार

४. भात मोकळा करुन घ्या. लाल, पिवळ्या आणि हिरव्या कॅप्सिकमचे बारीक चौकोनी तुकडे करुन घ्या. थोड्या तेलात हे तुकडे परता. त्यावर चवीला मिठ आणि मीरेपूड टाका आणि चमचाभर गार्लिक बटर घाला. लगेचच भात त्यावर घालुन एकत्र करा. झाकण घालुन एक वाफ येऊ द्या. वरून हवे तर थोडी चिरलेली पार्स्ली घाला. गरमा गरम खा Happy

४(अ). गार्लिक बटर नसेल तर कॅप्सिकमच्या तुकड्यांसोबत बारिक चिरलेली लसूण घाला. भात गरम झाल्यावर थोडे बटर सोडा आणि कोथिंबीर घालुन खा Happy

५. पातीचा कांदा थोड्या तेलात परता. गॅस मंद आंचेवर ठेऊन परतलेल्या कांद्यावर चमचा/दोन चमचे पिनट बटर घाला, थोडा सोया सॉस आणि स्वीट चिली सॉस घाला. पीनट बटर वितळायला लगले की लगेच आंच बंद करा. थोडे नारळाचे दूध असेल तर घाला नाही घातले तरी चालेल. भात मायक्रोवेव्ह मधे गरम करुन घ्या. गरम भातावर हा इन्स्टंट साटे सॉस घालुन काट्याने(फोर्क) हलकेच कालवा. वरतुन हवे तर चिली फ्लेक्स, वाळलेला कांदा घाला आणि खा. हा भात गरम गरम छान लागतो.

५(अ). पीनट बटर नसेल किंवा घालायचे नसेल तर भात तयार झाल्यावर वरतुन भाजलले शेंगदाणे भरड कुटुन घाला Happy

वॉव.. मस्त वेरिएशन लाजो..
साते सॉस ..गोडसर असतो ना??? इन्डोनेशिअन चव येत असेल या प्रकाराला..

मेरा एक और वेरीएशन

उरलेला भात (अर्थातच...हाच तर मेन इन्ग्रेडिअँट आहे Wink ) मोकळा करून घ्यायचा.
कढईत थोडं तूप गरम करून ,तेजपान, दालचिनी+लवंग पूड , थोडीशी मिरपूड घालायची. घमघमाट आला कि बारीक चिरलेला कांदा आणी हिरव्या मिर्चीचे तुकडे घालायचे.
कांदा पारदर्शी झाल्यावर हिरवे मटर अ‍ॅड करायचे. मीठे मिसळून ,झाकण ठेवून मटर शिजल्यावर ,भात घालूनन्सर्व नीट मिक्स करायचे..

गरमागरम खूप छान लागतो. आत कधी कधी अंडं ही फोडून घालते.. मस्तपैकी एग फ्राय राईस तयार होतो.

अगा.. लाजो.. आजकाल या मस्त मस्त रेस्प्या ट्राय करण्याकरता मुद्दाम रोज जास्त भात बनतोय घरी.. Wink

आहेस कुठं!!!!!!!!!!!!!!! Proud

भात+तेल +स्वीट कोर्न+साल्सा एकत्र करायचं. नंतर ते ढोबळी मिरची मध्ये भरायचं. थोड्या पाण्यात झाकण ठेवून वाफवायचं. (मूळ रेसिपीत रेचल रे ढोबळी मिरची आधी भाजून घेते आणि ताजा भात भरल्यानंतर बेक करते. माझे आपले शिळ्या भातासाठी व्हेरीयेशन)

शिळ्या कढीला उत आणू नये...वर्षू नील शिळ्या भातासाठी धागा काढू नये... Wink Happy

या धाग्याच नांव फोडणीचा भात ऐवजी 'उरलेला भात खपवायच्या १ से १ कल्पना' असं कर >>> Happy +१

सिमन्तिनी.. रेचल रे शो करत असेल तर कोण लक्ष देणारे भाताकडे.. शिळा का ताजा तो Wink

लाजो की बात पे गौर फरमाएंगे!! Happy

तुपावर ३ लवंगा व एक वेलदोडा घालून परतणे, वर मोकळा केलेला भात थोडासा परतणे व नंतर त्यात ओला नारळ, गूळ व वेलची पूड व जायफळ घालून एक वाफ आणणे. शिळ्या भाताचा नारळीभात तयार. तळलेले काजू व खसखस वाटून घातली तरही छान लागेल. पण ज्याला घालावीशी वाटेल त्याने घालावी. Happy

'पण शिळ्या भातासाठी ज्याला घालावीशी वाटेल त्याने घालावी.''.. Lol
अगा जरूर घालावी.. ऐ शिळा म्हणून त्याला का गं सावत्र वागणूक द्यायची?? आँ??
म्हणून उरलेला म्हणायचं Wink

बरोबर आहे वर्षुताई...चुक कबूल. भातासारख्या श्रेष्ठ पदार्थाला शिळा म्हणणे पाप आहे. उरलेला भात म्हणणे बरोबर आहे.

लाजो, तु सांगितलेले मुटके ( व्हेरिएशन्स - कांदा लसुण मसाला ऐवजी हि. मि. , ताकाऐवजी दही , भात मोकळा असल्याने अगदी थोडे बेसन , अगदी थोडे नाचणी पिठ घातले. ) करुन पाहिले. एकदम मस्त लागतात.

भाता मधे मीठ,धन्याची पावडर्,तिखट नीट मिक्स करून घेतलं. जिरे,मोहरी,हिंग्,हळदी ची फोडणी करून>>+++ बीट ,गाजर किसुन , कांदा, गरम मसाला . मस्त दिसतो भात आणी बीट ,गाजर हि पोटात जाते. चविला पन मस्त ...केला कि फोटो टाकेन......आज केला ड ब्या मध्ये तोच आणला आहे

4.jpg

!!!

उगीच वाचला धागा Sad

आता भुक लागली.
अजुन जेवायला जायला पाउण तास.
त्यात कॅन्टीनात सोडा मारलेला भात म्हणुन मी खात नाही.

पाप लागेल लोको.... Wink

भाताची पेज कशी करतात ?

तांदूळ वेगळा असतो का?

मी एकदा केली होती पेज म्हणून , पण तो भातच झाला होता

भाताची पेज म्हणजे पातळ भात की तांदूळ खाली ठेवून नुसते वरचे पाणी ? हे कन्फ्युजन आहे

युट्युबवरपण भरपूर भिन्न भिन्न प्रकार आहेत

कधीकधी असे प्रकार करायला हवेत

Pages