शब्दांचा गम्मत खेळ

Submitted by कविन on 19 April, 2013 - 07:50

ध ध धम्माल
म म मस्ती
मराठीतल्या
गम्मत गोष्टी

पक्षी म्हणजे खग
नभ म्हणजे ढग
चल जरा फिरुन
येऊ शब्दांचे जग

तुझे नाव काय?
आणि नावेत बसुन जाय
दोन्ही मधे "नाव"
त्यांचा अर्थ सांग काय?

दिवस म्हणजे दिन
गरीब म्हणजे दीन
फरक सांग पटकन
मी मोजण्या आधी तीन

मधेच थोडी
सोडवुया कोडी
थोडी नी कोडी
यमकांची जोडी

दुध पिते गटगट
खेळ आवरते चटचट
गटगट नी चटचट
यमक जुळले झटपट

चल थोडा खेळू
आपण शब्दांचा खेळ
गमतीच्या ह्या खेळात
मजेत जाईल वेळ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

मस्त !!!

वा!

मराठी शब्दा वरुन आठवल. आम्ही वडपोर्णिमेला मंदिरात गेलो. तेथे खुप मोठ वडाच झाड होत. आम्ही पुजा करत असतांना आमची नात- सिया- म्हणाली. आजी हे कशाच झाड आहे?
मी म्हटल-- वडाच.
त्यावर ती म्हणाली,'' एवढ मोठ वडाच झाड, पण त्याला तर एकही वडा नाही. कस काय/
तसेच ती शाळेतुन आल्यावर तिला विचारल ,''काही खाते का ?
ती म्हणाली- नाही.
मी म्हटल- डबा खाल्ला का?
म्हणाली -- नाही..
मी -- मग खा काहीतरी.
त्यावर ती-- -- आजी मी डब्यातला पराटा खाल्ला.[ डबा नाही ]
अशी मजा मराठी शब्दाची.