Submitted by कविन on 19 April, 2013 - 07:50
ध ध धम्माल
म म मस्ती
मराठीतल्या
गम्मत गोष्टी
पक्षी म्हणजे खग
नभ म्हणजे ढग
चल जरा फिरुन
येऊ शब्दांचे जग
तुझे नाव काय?
आणि नावेत बसुन जाय
दोन्ही मधे "नाव"
त्यांचा अर्थ सांग काय?
दिवस म्हणजे दिन
गरीब म्हणजे दीन
फरक सांग पटकन
मी मोजण्या आधी तीन
मधेच थोडी
सोडवुया कोडी
थोडी नी कोडी
यमकांची जोडी
दुध पिते गटगट
खेळ आवरते चटचट
गटगट नी चटचट
यमक जुळले झटपट
चल थोडा खेळू
आपण शब्दांचा खेळ
गमतीच्या ह्या खेळात
मजेत जाईल वेळ
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी !!!
भारी !!!
गोड आहे.
गोड आहे.
आईच्या शाळेत लहान वर्गातील
आईच्या शाळेत लहान वर्गातील मुलांसाठी शिकवायला देऊ का?
मला खुपच आवडली....
रिया चालेल की माझेही हे
रिया चालेल की माझेही हे लेकीसाठीचेच प्रयोग आहेत हे
ओके! धन्स! जर चार्टपेपरवर
ओके! धन्स!
जर चार्टपेपरवर वगैरे लिहुन वर्गात लावणार असतील तर त्याखली तुझं नाव लिहिलं जाईलच
सरळ, साधी, सोप्पी आणि
सरळ, साधी, सोप्पी आणि त्यामुळेच --- खूप खूप सुंदर ....
लै भारी!
लै भारी!
(No subject)
वा ! मस्तच ग
वा ! मस्तच ग
मस्त !!!
मस्त !!!
(No subject)
पहीली कविता जी मला कळली...आणि
पहीली कविता जी मला कळली...आणि आवडली.. :)...
वा!
वा!
शशांक यांना अनुमोदन.
शशांक यांना अनुमोदन.
मराठी शब्दा वरुन आठवल.
मराठी शब्दा वरुन आठवल. आम्ही वडपोर्णिमेला मंदिरात गेलो. तेथे खुप मोठ वडाच झाड होत. आम्ही पुजा करत असतांना आमची नात- सिया- म्हणाली. आजी हे कशाच झाड आहे?
मी म्हटल-- वडाच.
त्यावर ती म्हणाली,'' एवढ मोठ वडाच झाड, पण त्याला तर एकही वडा नाही. कस काय/
तसेच ती शाळेतुन आल्यावर तिला विचारल ,''काही खाते का ?
ती म्हणाली- नाही.
मी म्हटल- डबा खाल्ला का?
म्हणाली -- नाही..
मी -- मग खा काहीतरी.
त्यावर ती-- -- आजी मी डब्यातला पराटा खाल्ला.[ डबा नाही ]
अशी मजा मराठी शब्दाची.
आताच वाचली कवे मस्त बालकविता
आताच वाचली
कवे मस्त बालकविता आहे
आवडली एकदम
कवे, ही पाहिलीच नव्हती! मस्त
कवे, ही पाहिलीच नव्हती! मस्त आहे