बाथरूम सिंगर

Submitted by उद्दाम हसेन on 15 April, 2013 - 15:33

बाथरूम मधे गाणं म्हणण्याची सवय असलेल्यांचं हितगुज. बाथरूम सिंगिंगचे फायदे, तोटे, अनुभव यांची चर्चा इथे करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बाथरूम सिंगर आहे हे अभिमानाने सांगू शकतो. प्यार किया तो डरना क्या हे मुगल ए आझम मधलं गीत लतादीदींनी बाथरूममधेच गायलेलं आहे. बाथरूममधे सगळीकडून आपलं गाणं आपल्यालाच ऐकू येतं. गाणं गात असताना थंडी वाजत नाही. तसंच थंड पाणी असेल तेव्हां शास्त्रीय गाणी चांगली गाता येतात. मन प्रसन्न राहतं. असे बरेच फायदे आहेत.

मी काय म्हणते, असे धागे काढण्याआधी थोडा विचार करायला हवा ना. अशा लोकांना राहू कसं दिलं जातं मायबोलीवर ?

न्हाणी घराणं म्हणा...आम्ही त्या घराण्याचे मानांकित की नामांकित की असंच काहीसं म्हणतात..तसे गायक आहोत...बाथरूम सिंगर? ह्या! Wink
आमचे अनुभव इथे वाचा.

प्यार किया तो डरना क्या हे मुगल ए आझम मधलं गीत लतादीदींनी बाथरूममधेच गायलेलं आहे. >>>>>>>> इस्कटून सांगणार का???

बाथरुम डांसर Lol
उदयन सिनेमाचं टायटल वाटतंय रे. रजिस्टर करून टाक. पाच दहा लाख आरामात मिळतील Lol पण आता मिठूनची गादी चालवेल असा नवा, तरणाबांड गडी आहे का कुणी नजरेत ? Wink

@ आबासाहेब, खाली लिंक दिलीये बघा. त्यावर इस्कटून सांगितल्यालं हाय.
http://www.maayboli.com/node/16746

मला एकच गाणं येतं.

मैत्रिणींनो थांबा थोडं

पुढचं आठवत नाही.

हेच गाणं म्हणते मी बाथरुमात

सिनेमाचं टायटल Happy

प्रेक्षक मिळतील का ?

उनसे मिली नजर, भाईबत्तूर भाईबत्तूर ( दोन्ही सायरा बानो ), कोई चुपकेसे आके ( तनुजा ) ओ घटा बावरी ( हेमामालिनी ) सजना है मुझे ( पद्मा खन्ना ) मेरे ख्वाबोंमे जो आये ( काजोल ) अशी बरीच गाणी आहेत बाथरुमातली.. सुहाग मधला अक्षय कुमारचा एंट्रीचा डान्स पण बाथरुमातच आहे.

मैत्रिणींनो Lol

मला ही गाणी आवडतात
रम्य ही स्वर्गाहुनी लंका
ऋणानुबंधाच्या, चुकून पडल्या गाठी
लागा चुनरी में दाग
स्वरगंगेच्या काठावरती

हिवाळ्यात ही गानी बेस्ट

वैभ्या ...................घंतारडा ................

पूर्वीच्या सिनेमात रमेश देव, सीमा देव, देव आनंद अशी देवमंडळी असत.

हा धागा गप्पांचं पान झाल्याने आता इथे ४० प्रतिसाद कधीच येणार नाहीत Sad
अशी पोस्ट (बहुतेक) मीच लिहीली असावी कुठेतरी (दुसरं कोण?). इथे अदृश्य लोक असतात आणि ते विनोदाला सिरीयसली घेतात आणि सिरीयस पोस्टला विनोदाने घेतात.

आम्ही पण बाथरूममधे तेच सुख घेतो. अदृश्य राहून गाणं म्हणण्याचं Lol