शेव

Submitted by क्ष... on 24 October, 2008 - 02:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप पाणी
१/२ लिंबाचा रस
१ टेबलस्पून आल्याचा रस
२ टेबलस्पून कच्चे तेल
लाल तिखट
हळद
मिठ
वस्त्रगाळ बारीक बेसन लागेल तसे (साधारण १ १/४ कप)
---------------------------
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

लिंबाचा रस आणि आल्याचा रस वस्त्रगाळ करावा म्हणजे त्यात लिंबाचा चोथा, आल्याची सुते असले रहात नाही. हे दोन्ही रस, लाल तिखट, हळद, मीठ, तेल एका परातीत एकत्र करावे. हाताच्या तळव्याने ३-४ मिनिटे फेसावे. त्यात एक कप पाणी घालून साधारण २-३ मिनीटे अजुन फेसावे. आता त्यात हळूहळू बेसन घालावे. मळताना पण फेसल्यासारखे करत पीठ भिजवावे. पीठ भाकरी/पोळीच्या पिठाइतके घट्ट असु नये साधारण हाताला चिकटेल असे पातळच ठेवावे. पसरट कढईत तळण्यासाठी तेल तापवत ठेवावे. तेल कडकडीत तापले पाहीजे.

शेवेचा सो-याला आतुन पाणी लावुन घ्यावे. त्यात शेवेचे पीठ भरुन गरम तेलात शेव पाडावी. गॅस बारीक न करता दोन्ही बाजुने नीट गुलबट रंगावर तळावी. प्रत्येकवेळी सो-यात पीठ भरताना आतुन हलका पाण्याचा हात फिरवावा आणि जेवढे पीठ सो-यात घालायचे तेवढे पीठ एकदा-दोनदा फेसुन मग भरायचे. असे केल्याने शेव एकदम हलकी होते. १ कप पिठाची साधारण ४ मध्यम आकाराची कडी होतात.

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे ;)
माहितीचा स्रोत: 
आज्जी, मम्मी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवेचे पीठ भरुन गरम पिठात शेव पाडावी.>> गरम पिठात मी गरम तेलात.

कृती मस्त आहे. आंबट गोड चवं येईल हे नक्की..

ती मटकी शेव करतात त्यासाठी मटकीची डाळ वापरतात की आपली नेहमीची मटकी? त्याचं प्रमाण माहित असेल तर टाकशील का?

---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy