गाभोळी/गाबोळी फ्राय

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 April, 2013 - 04:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

माश्यातील गाभोळी
१ चमचा मसाला
पाव चमचा हळद
मिठ चवी नुसार
अर्धा चमचा आल-लसुण पेस्ट
अर्धा चमचा लिंबाचा रस
तेल तळण्या पुरते.

क्रमवार पाककृती: 

सर्व वाचकांस विनंती आहे की त्यांनी ह्या पाककृतीचा आस्वाद घ्यावा. गाभोळी खाण्याने माशांची पैदास कमी होते वगैरे वर आधी भरपूर चर्चा झाली आहे. पण हे सगळे निसर्ग नियम आहेत. मांसाहारींसाठी गाभोळी म्हणजे पर्वणी असते. लहान मुले तर अगदी आवडीने ही खातात. गाभोळी करण्याच्या काही प्रकारातील हा एक प्रकार.

गाभोळी स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला वरील जिन्नसा मधील तेल सोडीन सगळे एकत्र करुन लावावे.

तवा चांगला तापवावा व त्यात तेल सोडून मध्यम आचेवर गॅस ठेवून गाभोळी तळायला ठेवावी.

नंतर तव्यापासून जरा लांबच सरकावे कारण कधी कधी ही गाभोळी तड तड करुन ह्यातील काही कण उडतात. ६-७ मिनिटे चांगली शिजवून मग पलटी करावी आणि पुन्हा ५-६ मिनिटे शिजू द्यावी.

ही आहे तयार गाभोळी/गाबोळी फ्राय.

अधिक टिपा: 

गाभोळी म्हणजे माशाच्या पोटातील अंड्यांचा संच. छोटे बोईट, खरबी ह्या माश्यांतील छोटीशी गाभोळी चवदार असते. चिवणी तर खास गाभोळीसाठीच पावसाळ्यात घेतात. ह्या छोट्या माशांतील गाभोळ्यांचा आकार खजुराच्या बी एवढा असतो. एका माशात दोन गाभोळ्यांचे संच जुळीप्रमाणे असतात. मोठ्या माशांतील गाभोळी म्हणजे पिळसा, रावस ह्यांची जास्त फेमस असते. गाभोळी आतून रव्याप्रमाणे असते. शिंगाळ्यात तर गोट्यांप्रमाणे अंड्यांचा संच असतो. माझ्या माशांच्या सिरिजमध्ये आहे तो प्रकार. तशी बारा महिने गाभोळी असते पण पहिल्या पावसानंतर ह्यांचा हंगाम जास्त असतो.

गाबोळी जर अगदीच जाडी असेल तर ती गोल गोल कापून घ्यावी. व मग तळावी. किन्वा एका स्वच्छ फ़डक्यात बाधून आधी वाफेवर शिजवावी मग कापून तळावी किंवा तशीच कुस्करून त्याचे सुकेही करता येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर उड्या पडणार, खवैयांच्या !
कुठल्या कुठल्या माश्यांच्या गाभोळ्या खातात ते पण लिही. आमच्या घरी कधी तरी पापलेटीणच्या पोटात निघत असे.

जागू, बरेच दिवसांनी नविन प्रकार टाकलास Happy मैत्रिणीकडून हा शब्द ऐकला होता पण डोळ्यासमोर काहीतरी वेगळंच चित्र उभं राहिलं होतं.

लोक काय काय खतील याचा नेम नाही

आता ही गाभोळी काय असते ते सांगाल का ?? मला नॉन् व्हेजचं जास्त कै कळत नै

माझ्या ऑफिस्मधे एक कोळि नावाचे काका होते, वसई कडचे, ते नेहमी म्हणायचे कि ज्या महिन्यात र किंवा R नाहि त्या महिन्यात (मे, जुन, जुलै, ओगस्ट) मासे खावु नये. असे का तर ते म्हणायचे त्या र चा काहि संबध नाहि, पण लक्षात राहिले सोप्प म्हणुन, पण ह्या महिन्यात अंड्याची पैदास होते म्हणे.

सगळ्यांचे धन्यवाद

दिनेशदा, वैभवजी, गमभन तुमच्या सुचना संपादीत केल्या आहेत.

अश्वे :स्मितः

अन्जली Lol

ओव्हरीज असतात त्या ! >>> +१. अंडी म्हणजे मध्यंतरी जागूने ते गोल चमकदार द्राक्षांसारखं टाकलं होतं ना रेसिपींमध्ये ते असावं.

अश्वे Uhoh
खुपच अभ्यास झाला दिसतोय Proud

जागु मासेच २-४ वेळेस खाल्लेत त्यामुळे हे असले प्रकार पहायला बराच वेळ लागेल Happy

जागु आणी माझा नवरा या दोघांकरता मी इथे डोकावते. आम्हा शाकाहारींकरता वरील मसाले कुठे कुठे वापरता येतील एवढाच फकस्त मनात इचार असतो.:फिदी:

बाकी मासेखाऊंच्या तावडीत जागु खरच एकटी सापडली तर मग मात्र तिचे काही खरे नाही.:फिदी:

फोटो बघुनच तोंपासु Happy
'पाला' नावाच्या माशाची गाबोळी अतिशय चवदार असते असं एका कोळिणीने सांगितल्याचं आठवतय. खरंखोटं ती कोळीणच जाणे.

गाबोळी .... माश्यांची अंडी असतात असं ऐकलं होत. काहीतरी वेगळंच होतं डोळ्यासमोर.
हे वेगळंच आहे. कॅव्हियर म्हणजेच(caviar) माशाची अंडी ना?
द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी .......या पुस्तकात उल्लेख होता.
कोणत्या तरी दारूबरोबर कॅव्हियर .............म्हणजे अगदी मेजवानीची परिसीमा असंही ऐकलंय!

गाभोळीचा प्रकार माझ्यासाठी नवीन आहे. माझी आई गाभोळी भुर्जी प्रमाणे करते. पण त्याला बरीच वर्ष झाली. आता पुण्यात मिळते का बघावी लागेल. खुप वर्षाँपूर्वी नदितले मासे 'मळीये' तील गाभोळी खाल्ल्याचे आठवतेय.

अंशा नक्की टाकेन.

आशुतोष हो पाल्याची गाबोळी खुपच टेस्टी असते.

नुतन, सस्मित वरची गाबोळी पिळसा माश्याची आहे.

टुनटुन Lol धन्स.

सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

एकदा इकडे एका पापलेटच्या पोटातून गाभोळी निघाली होती....वाट्याला पण आली नाही Wink
कुठे शोधायची आता...जागू तू हे कु.फे.हे.पा. असं वाचलंस तरी चालेल...मस्त फोटोज/रेस्पि Happy

Pages