Submitted by पुरंदरे शशांक on 7 April, 2013 - 23:59
गाणीच गाणी...
छान छान गाणी गोड गोड गाणी
म्हणू या राणी दोघी जणी
वेलीची गाणी फुलांची वेणी
झाडांची गाणी फळांची गोणी
पर्यांची गाणी जादू कहाणी
राजा-राणीची मजेची गाणी
पावसाची गाणी झुळझुळ पाणी
गडगड ढगांची लखलख गाणी
बागेची गाणी झोपाळ्यावाणी
झूऽम झूऽप अवखळ गाणी
पापी तुझी साखरेवाणी
हसते कशी राधाराणी....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमच्या शैलित एकदम आवडली
तुमच्या शैलित एकदम
आवडली
क्लासच !!! फार अवघड काम
क्लासच !!!
फार अवघड काम बालगीते लिहिणे म्हणजे
असे एखादेतरी बालगीत लिहावे आयुष्यात असे मला वाटते तुमची बालगीते वाचून
धन्यवाद शशांकजी अशा गाण्यांसाठी