कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकूण सगळया बायकांचे हळदीकुंकू आहे, वैद्यबुवा बिचारे डायवर म्हणून जाणार! मला बुवा लाज (भीतीच) वाटते इतक्या सगळया बायकांमध्ये मिसळण्यात. जरा दोन तीन जरी पुरुष असते तरी guy talk करता आला असता.

कुणाचे (गरीब बिचारे) नवरे येणार असते तर समदु:खी लोकांत काही दु:खे वाटून घेता आली असती.

जाऊ दे. करा बायका बायकांची भिशी. आम्ही पुरुष घरचा स्वैपाक, धुणीभांडी, कपडे धुणे वगैरे कामे झाल्यावर वेळ झाला तर पाच दहा मिनिटे आपले Skype वरून एकमेकांची खुशाली विचारू.

लोला, नीतींना तू भेटली नाहीयेस. गेल्या दोन एवेएठिंना होत्या. उत्कृष्ट गातात.

झक्की, काय लेम कारणं देताय! गुपचुप धोपटी भरा आणि यायचं बघा.

विकुंना कोणी कॉन्टॅक्ट केला की नाही? त्यांना सांगा एम्टी ड्राइव्ह करणार नाहीये. Proud

>>एकूण सगळया बायकांचे हळदीकुंकू आहे, वैद्यबुवा बिचारे डायवर म्हणून जाणार! मला बुवा लाज (भीतीच) वाटते इतक्या सगळया बायकांमध्ये मिसळण्यात. जरा दोन तीन जरी पुरुष असते तरी guy talk करता आला असता. Lol
भाई, वाचताय का? Proud

कोणाला कुठली पुस्तकं, झाडं, मसाले, कडवे वाल काही हवं असेल त्या विशलिस्टा इथे टाकून ठेवा. जमेल ते आणलं जाईल.

माझा आत्ताच गाय टॉक झाला. Happy
झक्कीचा कॉम्पुटर चालत नाही. ईमेल पण चालत नाही. तेव्हा सायो,स्वाती,बुवा त्याना कॉण्टक करा व ठरवा कस भेटायच कुठे भेटायच ते. Happy

अहो जरा सबूर. अजून मी येण्याचे नक्की कुठे केले आहे? कारण मला अजून कळत नाही कि मी तिथे येऊन करणार काय, बोलणार काय? उगीच काहीतरी बोलून कुणाच्या तरी भावना दुखवायच्या, कुणाला राग यायचा. सगळ्या बायका बायका आहेत म्हणून म्हणतो. काही बोलायची चोरी - केंव्हा कुणाला राग येईल, वाईट वाटेल!
शिवाय माझे येणे म्हणजे दहा लोकांना ताप. नेणे, आणणे. घरात गर्दी. शिवाय कामाच्या बाबतीत मी शून्य.

या सगळ्या अडचणींचा विचार केला पाहिजे.

तुम्हांला बोलायची गरजच काय आम्ही असताना? आणि बोललात तरी ऐकतंय कोण? (पूर्वानुभव असून असं लिहिता म्हणजे कमालच आहे तुमची)

उनके बापू Proud वरच्या त्यातल्या त्यात वयाने मोठ्या जबाबदार व्यक्तीला विचारुन झालंय. मागे अद्वयला तुझ्याकडे आणल्यावर पुन्हा कधी त्याला विचारायच्या फंदात पडलेले नाही. Proud

बुवा, मी एक आकडा टाकला आपला. सगळ्यांना काय सोयीचं होतंय बघा. दक्षिणेतही एक हॉल्ट आहे (आणि तिथे एम्टी यायची आहे :P) हे लक्षात असू द्या.

बाई Happy
तिला लवकर निघता आलं तर कदाचित जमेल ६ ला यायला पण नवीन नोकरी असल्यामुळे लवकर लवकर निघणे जमेल की नाही माहित नाही. सांगतो थोड्यावेळात.

गाडीत खाऊ काय? इथे इन्ग्रोत तिखटामिठाच्या छोट्या पुर्‍या मस्त मिळाल्या होत्या मधे. त्या पुन्हा मिळाल्या तर आणेन. ज्यू. वैद्य आणि ज्यू. आंबोळ्यांसाठी चिप्स, ज्यूस असलं काहीतरी चालावं. वृंदाताई गोड वड्या आणणार म्हणाल्या आहेत.

फार लवकर निघालो तर सगळेच कुठेतरी मधे थांबून क्विक बाइट खाऊ शकतो.
किंवा साउथ जर्सीत कोणाच्या घरापास भेटण्यापेक्षा खाऊ स्टॉपच घेऊ शकतो.

सायो, मार्गरिटाज आणणार ना या वेळी(तरी)? Proud

खाऊ स्टॉप आयड्या भारी आहे. आवडली. मार्गारिटा आणते. पण बुवांची शिकवणी आणि मै चं रॅगिंग तर्र होऊन करण्यात काय मजा?
गुळाच्या पोळ्या, उकडीचे मोदक, त्यावर तूप पुपो वगैरे मिस होणार यंदा Wink

मला वाटत मेरीलँड मधे ९५ वर एक्जीट १०९ च्या आधी की नंतर एक सर्वीस एरीया आहे. तेथे एक ब्रेक घेवुया. त्यानंतर एकही सर्वीस एरीया नाही. आम्ही नेहमी तोच घेतो. Happy
बुवा, मला फोना वेळ मिळाला की. Happy

Pages