MBBS नंतर पुढील उच्च शिक्षणाबद्दल माहिती आणि सल्ला हवा आहे.

Submitted by दक्षिणा on 13 June, 2019 - 04:51

माझ्या एका मित्राची मुलगी सध्या इयत्ता बारावीत आहे, पुढे तिला एम बी बी एस करायचे आहे. post graduation करून न्युरो सर्जन व्हायचे आहे. त्यांचा सध्याचा प्लान असा आहे की तीने एम बी बी एस जर्मनी/ इंग्लंड युरोपीय देश मध्ये करावे, आणि पी जी अमेरिका/कॅनडा इथे करावे. त्यासाठी पुण्यात अशा कोणत्या संस्था आहेत ज्या अशा मुलांना बाहेर जायला सर्व मार्गदर्शन करतात? मला त्यांचे संपर्क हवे आहेत किंवा त्या कशा शोधू ते मला कुणी सांगू शकेल का? शिवाय मला खालील माहिती हवी आहे.

* एम बी बी एस करण्यासाठी जर्मनी/ इंग्लंड युरोपीय देश यातील कोणता पर्याय उत्तम आहे?
* डिग्री चा एकूण कालावधी किती असेल?
* त्या संपूर्ण कालावधी साठी आर्थिक तजवीज किती असावी?
* अशा प्रकारे दुसऱ्या देशात उच्च शिक्षणासाठी जायला पुण्यात कोणत्या संस्था मार्गदर्शन करत असतील तर त्यांचा संपर्क.
* कोणत्याही संस्थेतर्फे न जाता वैयक्तिकरीत्या आपल्याला अर्ज किंवा प्रवेश घेणे सोपे आहे का? असेल तर तो कसा घेऊ शकतो?

वरील सेम माहिती पी जी साठी पण हवी आहे.

कृपया जाणकार लोकांनी मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एमबीबीएसशी संबंधित माहिती नाही, पण.......

>> अशा प्रकारे दुसऱ्या देशात उच्च शिक्षणासाठी जायला पुण्यात कोणत्या संस्था मार्गदर्शन करत असतील तर त्यांचा संपर्क.

मागच्या वर्षी नात्यातल्या एका मुलाला याच विषयावर (इंजिनियरिंगच्या डिग्रीनंतर परदेशी शिक्षण) माहिती हवी होती. म्हणून बराच काथ्याकुट करून माहिती काढली तेंव्हा पुण्यातील काही संस्थांची नावे मिळाली. ती इथे शेअर करत आहे. अर्थात, मी स्वत: या ठिकाणी गेलो नाही किंवा अन्य कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे या संस्थांशी मी संबंधित नाही. पण यांचे गुगलवर रीव्युज आणि रेप्युटेशन चांगले दिसत आहे इतकेच. मला वाटते यांना फोन करायला वा जाऊन यायला काहीच हरकत नाही. I hope, at least it will serve as starting point if nothing else:

1. Global Education Center
1206/B/19A, Cifco Centre, 2nd Floor, J M Road, Deccan Gymkhana, (Next to Shiv Sagar Restaurant) Pune - 411004.

2. The Chopras Pune
1206/B/19A, Cifco Centre, 2nd Floor, J M Road, Deccan Gymkhana, Next to Shiv Sagar Restaurant, Shivajinagar, Pune, Maharashtra 411004
Phone: 088007 32400
Location: https://goo.gl/maps/t5xkHzseJV62

3. Edwise International
2nd Floor, Mayur Centre, Opp. Hotel Roopali F. C. Road,, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
Phone: 020 4902 2222
Location: https://goo.gl/maps/Sr9ZWG9Radv

4. IDP Education Pune - International Education Specialists
Ground Dnyanesh Complex CTS No. 1179, 3, Modern Engineering College Rd, Revenue Colony, Shivajinagar, Pune, Maharashtra 411005
Phone: 020 4411 8888
Location: https://goo.gl/maps/fJvfhNFntyA2

>> * एम बी बी एस करण्यासाठी जर्मनी/ इंग्लंड युरोपीय देश यातील कोणता पर्याय उत्तम आहे?

यासाठी तुमच्या ओळखीचे कोणी आधीच या प्रक्रियेतून गेले असेल तर उत्तमच. अन्यथा नेटवर वेळ खर्च करावा लागेल. आजकाल ते हि फार अवघड नाही राहिले. काही फोरम्सवर हि सगळी माहिती उपलब्ध असते. किंवा विचारता येते. या सर्वविध मार्गांनी माहिती काढण्यासाठी दोन (किंवा तीन) दिवस खर्च करा असे मला वाटते. असो. अनेकविध मार्गांनी व संपूर्ण विचारांती देशांचा/विद्यापीठांचा प्राधान्यक्रम एकदा नक्की करावा. (जसे कि माझ्या नात्यातल्या मुलाबाबत, सर्व काथ्याकुट करून शेवटी: सिगांपोर मिळाले तर उत्तम अन्यथा ऑस्ट्रेलिया वा जर्मनी असे ठरले होते)

>> * कोणत्याही संस्थेतर्फे न जाता वैयक्तिकरीत्या आपल्याला अर्ज किंवा प्रवेश घेणे सोपे आहे का? असेल तर तो कसा घेऊ शकतो?

आजकाल परदेशातील सगळी विद्यापीठे इंटरनेटवर आलेली आहेत. प्रवेशप्रक्रिया पासून सगळी माहिती उपलब्ध आहे. तेंव्हा मला वाटते तुमचा देशांचा/विद्यापीठांचा प्राधान्यक्रम एकदा नक्की झाला कि त्या त्या विद्यापीठांच्या वेबसाईटवर प्रवेशप्रक्रिया फी हि सगळी इत्यंभूत माहिती दिलेली असते.

वरील संस्थांकडून मिळणारी माहिती आणि थेट प्रवेश संबंधी मिळालेली माहिती या दोन्हींचा विचार करून तारतम्याने निर्णय घ्यावा लागेल.

भावी शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा!

रशिया मधे पण एम बी बी एस साठी उत्तम संधी आहेत. बरेच लोक जातात.
नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन यू एस मधून करता येईल.

neet counceler आहेत ते देतील चांगली माहिती
प्रत्येक पुणे येथील क्लास्सेस मध्ये विचारा सांगतील चांगले neet counceler
मला एक नांदेड चा माहिती आहे त्याचा रेफेरेन्चे देवू का

Universities in Australia and New Zealand are as good as any in the world. Also the fees would be less than those on American or German universities. Weather in both countries is better than in the US or Germany. There are around 6 lakh Indians living in Australia's six capital cities. I have lived in Australia since 1966 and I am not at all sorry that I did not consider the US, UK or Canada as my home country.

Universities in Australia and New Zealand are as good as any in the world. Also the fees would be less than those on American or German universities. Weather in both countries is better than in the US or Germany. There are around 6 lakh Indians living in Australia's six capital cities. I have lived in Australia since 1966 and I am not at all sorry that I did not consider the US, UK or Canada as my home country.

रशीयन डोक्टर्स ना कोणीही विचारत नाही. तो एक सापळा आहे. रशीया ची इकॉनॉमी पुर्ण डाउन आहे. त्यान्ना स्टुडंट्स हवे आहेत.
वरच्या लिस्ट मधले चोप्रास आणि एडवाईस दोन्ही चान्गले आहे. ब्रिटन मध्ये शिक्षण खुप महाग आहे. परत ते तिकडे नोकरी देत नाहीत. तिकडे अमेरिकेसारखं नाहिये. फक्त स्टुडंट विसा देतात. वर्क विसा देत नाहीत. त्यामुळे तिकडे शिकुन सेट्ल व्हायचं असेल तर मग अमेरिपर, कॅनडा, ऑस्ट्रेलिय हेच पर्याय रहातात. अनेक विद्यापिठान्ची कँपस सिन्गापुर ला ही आहेत.

रशियाचा विचार जरा संभाळूनच. फारसं चांगलं ऐकिवात नाहीये, त्यात सध्याची पॉलिटिकल टेंशन्स बघता रशियातुन इंग्लंड अमेरिका जरा कठीण वाटत.

<<< एम बी बी एस जर्मनी/ इंग्लंड युरोपीय देश मध्ये करावे, आणि पी जी अमेरिका/कॅनडा इथे करावे. >>>
भारतात एम.बी.बी.एस. करता येत नाही का?

सहज कुतूहल म्हणून:
सध्या भारतात MBBS एक वर्षाची फी किती आहे?
आणि इतर देशात किती?

गुणवत्ता ही गौण झाली पैस्या पुढे त्या मुळे भारतीय डॉक्टर md जरी असतील तरी त्यांची लायकी 40 वर्षा पूर्वीच्या compounder एवढी सुद्धा नाही

@राजेश
काहीही बरं का. पूर्वीचे कंपौंडर डॉक्टरचे आणि नर्सेस सर्जनचे काम करायचे काय?
पैसा किंवा आरक्षण असेल तर डॉक्टरकीला प्रवेश घेणे भारतात सोपे झाले आहे, याच्याशी मात्र सहमत आहे.

Cancer ,heart chya सर्व रोगाशी संबंधित , किडनी,लिव्हर विषयी आजारात उपचार घ्या किंवा घेवू नका माणूस martoch.फक्त5/6, महिन्याचा फरक पडतो .
दुसरे मी प्रयोग केले डॉक्टर 40 chya आत असतील तर डॉक्टर ताप जरी आला तरी त्याचा संबंध टीबी शी जोडतील आणि 5000, रुपये बिल टेस्ट मध्ये करतील आणि तेच 70, वर्षाचे खरे डॉक्टर 10 रुपयात तुम्हाला बरे करतील .
कडू आहे पण सत्य आहे

सहज कुतूहल म्हणून:
सध्या भारतात MBBS एक वर्षाची फी किती आहे?
आणि इतर देशात किती?>>
भारतात सरकारी संस्थामध्ये प्रगत आणि प्रगतीशील देशापेक्षा खुप कमी फी आहे. त्यामुळे खर्च खुप कमी येतो

जर स्कॉलरशीप नाही मिळाली तर खाजगी कॉलेज मध्ये येण्यारा एकुण खर्चापेक्षा ( यात फक्त फी , लॉजिंग, बोर्डीग मिळुन २५ लाख धरले आहेत) , अमेरिकेत ५ पटी पेक्षा जास्त, सिंगापुर मध्ये ३-४ पट , ऑस्ट्रेलिया-न्युझिलंड मध्ये जवळपास दुप्पट , मलेशियात दिड पट. तर चायना आणि रशिया मध्ये तेवढाच येतो. बाकी देशाबद्दल माहित नाही.

हा खर्च exchange rate प्रमाणे बदलत असतो. उदा ऑस्ट्रेलियाचा दर गेल्या तीन चार वर्षात खुप कमी झाल्याने तिथला खर्च कमी झाला आहे.
काही देशात स्कॉलरशीप मिळते तर सिंगापुरसारख्या देशात जर ६ वर्ष सिंगापुर मध्ये काम करण्याचा बॉड लिहल्यास खर्च कमी होऊ शकतो.
सिंगापुर सोडल्यास बाकी देशात अ‍ॅडमिशन मिळायला भारतापेक्षा कमी त्रास असतो. उदा अमेरिकेत जवळपास ४०% मुलाना MCAT दिल्यावर अ‍ॅडमिशन मिळते. भारतात हे प्रमाण खुप कमी आहे. सिंगापुर मध्ये पण मेडिकल मध्ये भारतासारखी स्पर्धा आहे.