रव्याचे अप्पे - टेस्ट भी हेल्थ भी असा पर्याय स्पेशली बच्चे कंपनी साठी

Submitted by कविन on 18 March, 2013 - 07:43
ravyache appe

काही पाकृ हया वाचताना बघताना एकदम वॉव अशा वाटतात. आयत्या कोणी दिल्या तर अहाहा! असा विचार आधी मनात येतो (जश्या लाजोच्या बर्‍याचश्या रेसिप्या)

काही पाकृ करुन बघण्या करता बराच धीर एकवटावा लागतो/ बर्‍याच बेसिक संत्र्यांना कोणीतरी सोलून द्या रे आधी असं करायला घेतल्यावर वाटतं (जश्या लाजो + जागुच्या रेसिप्या. स्पे. जागुच्या सामिष रेसिप्या. मुळात त्यातले मुख्य घटक कोणी ओळखून पारखून आणून दिले साफही करुन दिले तर ज्या बात है असं वाचताना वाटतं)

तर काही पाकृ असतात तशा सोप्या (सोप्पं कॅरेमल पुडींग सारख्या किंवा केक इन कॉफी कप सारख्या :फिदी;) ज्या वाचनाता यु यु चुटकी मे जमतील वाटतं पण नेमक्या फसतात Proud

तर काही फसत नाहीत पण वारंवार करुन बघुयात ही लिटमस टेस्ट पास करत नाहीत

तर ह्या सगळ्या निरनिराळ्या कसोट्यांवर माझ्या वारंवारतेची लिटमस टेस्ट्+माझ्या लेखी सोप्पी पाकृ बनवण्याचं श्रेय ज्या रेसिपिंना जाईल त्यातली ही एक रेसिपी आता तुमच्या लिटमस टेस्ट आणि कसोट्यांवर उतरायला सज्ज Proud

सध्या पाकृ लिहिण्याआधी अमेय ह्यांनी सुंदर ट्रेन्ड सेट केलाय, पाकृ विषयी छान छान असं लिहायचा. पण ते काही आपल्याला जमण्यातलं नाही तरी पण त्यांचा ऑर्किडचा गुलदस्ता आवडला हे सांगण्यासाठी आमच पण हे पाकृच्या आधीचं अस्टरचं फुल

--------
साहित्य:

१) रवा २ वाट्या (बारिक/ जाडा कोणताही चालेल फक्त न भाजलेला हवा)

२) ताक - २ वाट्या (खुप जास्त आंबट ताक असेल तर त्यात पाणी घालून थोडं त्याला मवाळ करा)

३)आलं लसूण पेस्ट - १ चमचा

४) हिरवी मिरची १ - आलं लसणी बरोबरच मिरची देखील वाटली तरी चालेल. तस न करता चिरुन घातली तरी चालेल. नाही घातली तरीही चालेल किंवा पक्के तिखटे असाल तर एका पेक्षा अधिक घातल्यात तरिही चालतील

५) मीठ चवी प्रमाणे

६) साखर - १ चिमुट

७) भाज्या - कोबी, कांदा, सिमला मिरची बारिक चिरुन, गाजर किसून. (भाज्या घातल्या नाहीत तर साधे प्लेन अप्पे होतील. भाज्या घातल्यात तर तेव्हढच हेल्दी ऑप्शन निवडल्याचही समाधान मिळवाल)

८) खाण्याचा सोडा चिमुटभर (ह्याला ऑप्शन म्हणून इनो चालेल असं वाटतय. करुन बघा. माझ्या घरी खाण्याचा सोडा होता, इनो नव्हता म्हणून मी त्या वाटेला गेले नाही)

९) पाणी जरुरी प्रमाणे लागेल तसे (मिश्रण इडलीच्या पीठा सारखे होण्या इतपत लागेल इतकेच)

कृती:

रवा ताकात भिजवावा. हे ४-५ तास तसेच झाकून ठेवावे. (रात्रभर राहिले तरी चालते. मी रात्री भिजवून सकाळी केले होते अप्पे.)

अप्पे करायच्या वेळी त्यात मीठ, साखर (ही घातली नाही घातली तरी चालेल. रात्रभर पीठ ठेवल्याने थोडं आंबट होतं म्हणून मी चिमुटभर घातली होती) आलं लसुण/ आलं लसुण मिरची चे वाटण घालावे.

ह्यात लागेल तसे पाणी घालून मिश्रण इडलीचं मिश्रण असतं तितपत पातळ करुन घ्या. त्यात चिमुटभर खायचा सोडा घालून चांगलं ढवळून घ्या.

थोडे अप्पे साधे आणि थोडे भाज्या घातलेले असं करणार असाल तर आधी साधे अप्पे करुन घ्या मग त्या मिश्रणात भाज्या मिसळा म्हणजे दोन भांडी होणार नाहीत.

अप्पे पात्राला तेलाचा हात लावून चमच्याने हे मिश्रण त्यात घाला. मध्यम आचेवर वर झाकण ठेवून अप्पे होऊद्या. साधारण ६-७ मिनिटांमधे एक बाजू होईल. सुरीने अप्पे उलटा. दुसरी बाजू पण जरा सोनेरी होऊ द्या. मग अप्पे पात्र सरळ ज्या पातेल्यात/ भांड्यात/ताटात काढायचेत त्यात उलटं करा. अप्पे अलगद पणे त्यात पडतील. सुरी फिरवा/ उलथण्याच्या मागच्या बाजुने जरा त्या अप्प्यांच्या साईडला टोका असले प्रकार करावे लागत नाहीत.

हे अप्पे हिरवी चटणी/खोबऱ्याची चटणी/सॉस/ भाजीवाले असतील तर नुसते सुद्धा चांगले लागतात

टिप: ह्यात व्हेरिएशन म्हणून अजून काही भाज्या वाफ़वून/पालक चा पल्प/ कोथिंबिर/ खोबऱ्याचे काप इ. घालू शकता. मी पुढच्यावेळी ह्यातलं काही तरी घालून एक घाणा तरी करुन बघणार आहेच. हि टिप हेल्थ कॉन्शस मंडळी/ मुलां करता टेस्टी भी आणि आयांसाठी हेल्दी भी वाले पर्याय शोधणाऱ्या आयांसाठी आहे.

माहितीचा स्त्रोत:

हि कमी कटकटीची आणि टेस्टी+हेल्दी पाकॄ माझ्या पोतडीत टाकण्याचं श्रेय - माबोवरच्या फाटक भगिनींना

मोठ्या फाटक भगिनी काही ह्यात गाजर घालत नाहीत ही ऍडिशन धाकट्या बाईसाहेबांची ह्याच कारण माझ्यातल्या चतूर आईने लग्गेच ओळखलं. ह्यात पुढच्यावेळी कोथिंबीर पण घालून बघुयात गं, खोबऱ्याचे काप पण चालतील इ. इ. आईमोड वाल्या इमेली पण झडल्या.

ह्या निमित्ताने दोन वर्षांपुर्वी भेट मिळालेलं अप्पे पात्र धन्य झालं आणि कायमचं माळ्यावरुन वापरातल्या भांड्यांमधे आलं ह्यातच ह्या रेसिपीचं खरं यश आहे.

Resize of IMG_20130317_085653.jpg हे मिश्रण असं दिसेल

Resize of IMG_20130317_085628.jpg हे तयार अप्पे. ह्यातला मध्यभागी असलेला एक अप्पा (:फिदी:) बसलेला रुसलेला फसलेला नसुन तो उलटलेला नाहीये. त्याआधी फोटो काढलाय ते उलटलेली आणि न उलटलेली अशा दोन्ही बाजू दाखवण्यासाठी - हे स्प. खास धाकल्या फाटक भगिनीसाठी आहे. Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिहिण्याची स्टाईल आवडलीच Lol

मस्त होतात हे आप्पे. सध्या आप्पेपात्र नसल्यामुळे केले गेले नाहीयेत. पण ह्याच प्रकाराने रवा इडली, रवा डोसा असे सगळे करते. इनो घालून अगदी हलके होतात ( सोडा कधीच वापरला नाहीये ह्यात. इनोच. ) रवा आधी तुपावर भाजून घेते आणि फक्त आलं किसून, कढीपत्ता, मिरीदाणे आणि काजू घालून करते.

फाटक भगिनी कोण ? ( सांबार मसाला घालून वांगी आणि भेंडी करणार्‍या का ? त्या धाग्यावर हिंट आहे एक Wink त्यांना फाटक का म्हटलंय ते नाही कळलं. हा गेस अगदीच चुकीचा निघाला तर हा प्रतिसाद संपादित करण्यात येईल Proud )

भारी दिसताहेत आप्पे. नुसत्या रव्याचे कधी केले नाहीत.
<<७ मिनिटांमधे एक बाजू होईल. सुरीने अप्पे उलटा. दुसरी बाजू पण जरा सोनेरी होऊ द्या. मग अप्पे पात्र सरळ ज्या पातेल्यात/ भांड्यात/ताटात काढायचेत त्यात उलटं करा. अप्पे अलगद पणे त्यात पडतील. सुरी फिरवा/ उलथण्याच्या मागच्या बाजुने जरा त्या अप्प्यांच्या साईडला टोका असले प्रकार करावे लागत नाहीत.>>

सुरी फिरवा.इ.इ प्रकार पहिल्यांदा उलटताना करावा लागतोच की. दुसर्‍या वेळी करणे अजिबात कठीण नाही. आजकाल नॉन्-स्टिक आप्पेपात्राबरोबर लाकडाचे के टोचण मिळते. जुन्या पुस्तकांमध्ये यासाठी विणाकामाची सुई वापरा असे लिहिलेले असायचे. :D. पहिली बाजू व्हायला घाई केली नाही तर साध्या चमच्याने छान उलटतात.

मी आप्प्याच्या पिठात नाचणीचे पीठ ढकलून पोषणमूल्य वाढवलेले आहे.

भारी दिसताएत आप्पे. मी गिट्सच्या ईडली रव्याचेच करते आप्पे. ह्या पद्धतीने करुन बघेन नक्की.

मस्त!
... फाटक ताई - करा तुम्ही आता यात वेरीएशन अन डकवा रेस्पी! (सांबार मसाला घालून आप्पे करतात का?)

तयार आप्पे मस्त दिसत आहेत..यात अजुन एक व्हेरीएशन करता येईल्-भोपळा किसुन रवा मिश्रण भिजवताना घालायचा..आप्पे पात्रात वरुन भाजलेले तीळ घालायचे. बाकी लिहीण्याची खुमासदार शैली आवडली.

मस्त दिसतायत, आवडीचा प्रकार. आणि प्रस्तावनाही सुरेख (माझा उल्लेख केल्यामुळे बायकोसमोर कॉलर ताठ ..वगैरे! त्याबद्दल धन्यवाद)
हे आप्पे खोबर्‍याची चटणी + हॉट अँड स्वीट सॉस मिक्स करून खातो आहे अशी कल्पना केली. Happy

छानच दिसतहेत आप्पे ... मि नविनच माय्बोलिवर आले आहे.. आतापर्त्य्न फक्त वाचत होते .. आता प्रतिसाद द्यावसा वाततो आहे ...

अरे वा! Happy
या रेसिपीच्या माहितीचा स्त्रोत खर्‍या माझ्या सा.बा. आहेत. त्यांना दाखवेन कधीतरी हे...

(कवे, काल हे सांगायलाच फोन केला होतास का? मी खूप उशीरा पाहिला मिस्ड कॉल.)

लले, रविवारी विथ फोटू समस केल्ता अप्पे जमले सांगायला त्याला नो रिप्लाय Sad मग सोमवारी इमेल धाडलं म्हंटल आता तरी ताई कवतिकाचे बोल बोलतील पण छ्या तिथेही निराशा Proud

शेवटी कवतीक करुन घेण्यासाठी मीच फोनवा लावत होते Proud

धन्यवाद लोक्स Happy

भरत मयेकर, नाचणी पीठाची आयड्या छान आहे पण ते घालून हलके होतील का अशी शंका आहे मला. किंवा मग इनोचं प्रमाण वाढवावं लागेल थोडं असा अंदाज. तुम्ही कौर्न बघितलेत नाचणी पीठ घालून तर नक्की लिहा त्या बद्दल Happy

अगो, अप्पे बिघडले असते पहिल्या घाण्यात तर मी डोसेच घालून बघणार होते Wink फुकट कोण घालवेल रवा ताक सगळच Proud

जागु, सामिष म्हणजे तुझ्या मत्स्याहारी, चिकन मटन वाल्या पाकृ गो.

कवे, तुझी ही रेसिपी वाचून आपण हे सगळं असं करतो? असा प्रश्न पडला. इतकं मस्त, अप्प्यांसारखंच टेस्टी लिहिलं आहेस. Happy
मी मोठ्या भगिनींकडून पहिल्यांदा ही रेसिपी ऐकली आणि अप्प्यांचा घाट घातला तेव्हा मारे अगदी नुसतं ऐकून आपल्याला सगळं लक्षात राहिल असा टेंभा मिरवला होता स्वतःस्वतःच.. आणि रवा बिवा भिजवून त्यात आयत्या वेळी आलं लसूण पेस्ट घालायची विसरले, बाकी सगळे नटवले ग अप्पे पण बेसिकमधेच राडा झाल्यामुळे त्याला ना चव ना ढव असा नुसताच शिजवलेला रवा भाज्यांच्या उग्र वासासकट, पहिला घाणा घरच्या गिनिपिगच्या तोंडात पडला आणि तोंडं वाकडी झाल्यावर त्याच क्षणी ताईबाईंना मेसेज केला आणि तिने मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन मनसोक्त माझी इज्जत काढली Proud
आता तर मी त्यात मुक्ता खात नसलेल्या बर्‍याच भाज्या लोटते Lol अगदी दुधी सुद्धा Wink

अरेवा फाटक भगीनी जोर्रात आहेत.... लली ने फारच मनावर घेतलेलं दिसतय....

कविन... मस्त रेसेपी... ते अप्पे एकदम तोंपासू......

आई कडिल अप्पे तवा पडुन आहे... तो ह्या रविवारी आणण्यात येइल....

मस्त रेसिपी कवे,
अप्पे पात्र आणणे करावे लागेल आता
आप्पे पात्राशिवाय आप्पे करायची रेसीपी पण टाका फाटक भगिनी किंवा नवरे ताई- Proud

सही लिहिलंय Happy
माझंही अप्पे पात्र दुर्लक्षित आहे कित्येक वर्षांपासून...... बाहेर काढायची:हीच ती वेळ आणि हाच तो क्षण Wink

लले, रविवारी विथ फोटू समस केल्ता अप्पे जमले सांगायला त्याला नो रिप्लाय मग सोमवारी इमेल धाडलं म्हंटल आता तरी ताई कवतिकाचे बोल बोलतील पण छ्या तिथेही निराशा

>>> ओ ताई, आमच्या मोबाईलावर फोटोसकट समस येत न्हाईत आणि ई-मेलीला रिप्लाय दिला होता की Sad

Pages