अननसाचा व्हि नेक/ बोट नेक पोंचू

Submitted by अवल on 18 March, 2013 - 00:08

वंदनाने, माझ्या ऑन लाईन विद्यार्थिनीने छान विणकाम केले. आणि मग तिने www.anniescatalog.com या साईट वरचा हा फोटो दाखवला

1363165008292.jpg

आणि विचारले असे करता येईल का? आता तिला काहीतरी बक्षिस तर द्यायचं होतं. मग म्हटलं चला, हा पॅटर्न जमतोय का बघूयात आणि हा पॅटर्नच तिला बक्षिस देऊयात Happy
नेट वर असलेले डिझाईन खूपच फिके आणि ब्लर होते.

1363165008444.jpg

मग जरा स्वतःचेच डोके चालवले. थोडे प्रयोग केले, थोडी उसवाउसव झाली पण प्रयत्न सोडला नाही. जमलेले डिझाईन मग वंदनाला बक्षिस म्हणुन पाठवले.

मला त्या फोटोतल्या प्रमाणे मॉडेल मिळाले नाही. मग मी आपले ते सोफ्यावरच चढवले.

DSC_0925.jpg

या डिझाईनची गंमत अशी की हे दोन पद्धतीने घालता येते. वर दाखवलेय तसे व्हि नेक चे किंवा खाली दाखवलेय तसे बोट नेक चे

DSC_0927.jpg

पूर्ण उलगडले की पोंचू असा दिसतो

DSC_0928.jpg

बघा बरं तुम्हीच सांगा जमलेय का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल खुप छान झाला आहे ग. माझी आई पुर्वी क्रोशे कामातून बरेच रुमाल करायची. त्यात गुलाबाची फुल पण असायची. मी लोकरीपासून क्रोशाची रुमाल करते पण क्वचीत. तू खुप छान करतेस हे विणकाम.

माझ्याकडे एक क्रोशाचे पुस्तक आहे. त्यातल्या डिझाइन्स देऊ का मी तुला. मी मागे त्यातील एक फुलपाखरू च्या आकाराचा रुमाल केला होता. तो मी एकीला रुखवतीत दिला.

अवल हे मॉल मधे पाहिले. तुझ्यासाठि हे फोटो! दुसरा फोटो काढनाता मुलाने घरि चल म्हणुन ओढायला सुरुवात केलि म्हणुन पटकन काढला. म्हणुन नीट नाहि आलाय.सध्या बर्‍याच शॉपमधे या स्टाईल चे टॉप दिसतायत.
photo2.jpgPhoto1.jpg

अरे, प्रिया, कित्ती छान आहे हा पॅटर्न . धन्यवाद. इथे खुप दिवसांनी आले त्यामुळे आता बघतला. धन्यवाद ग Happy
हा नवीन अर्चनाने करायला सांगितला म्हणून. धन्यवाद ग Happy
पूर्ण उलगडून
IMG-20130604-WA0003.jpg

बोट नेक घातला तर
IMG-20130604-WA0002.jpg

व्हि नेक घातला तर
IMG-20130604-WA0001.jpg

अप्रतिम,
अवलजी,
माझि आई तुमच्या क्रोशा work चि खुप मोथि पन्खि आहे, आणि तिला हा अननसाचा patern शिकायचा आहे, तर आपण pls आपल्या शिकाशिकवा blog वर सभसद कसे होता येइल ते कळवाल का?
तिने इथे बघुन माझ्यासाथि एक crochet ponchu and crocket stoll बनवला आहे, पण मला फोटो upload करता येत नाहि आहेत.
pls reply.

Pages