ऊन्नीअप्पम

Submitted by रश्मी. on 15 March, 2013 - 06:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी वाटी किसलेला गुळ,

१ वाटी पाणी,

१ वाटी तांदळाची पिठी,

अर्धी वाटी ओले खोबरे/ चव,

अर्धी वाटी पिकलेले केळे कुस्करुन,

२ चमचे साखर,

चिमुटभर खायचा सोडा.

क्रमवार पाककृती: 

क्रमवार पाककृती:

१) चिरलेला गुळ जाड बुडाच्या भांड्यात घालुन त्यात पाणी घालावे. जाडसर पाक करावा.

२) खोबरे तुपावर परतुन घ्यावे.

३) तांदळाची पिठी, केळे, साखर्,खोबरे, चिमुटभर सोडा हे सर्व एकत्र करुन भज्याप्रमाणे सैलसर भिजवा.

४) हे तळुन गुळाच्या पाकात टा़का आणी नंतर बाहेर काढा, किंवा अप्पेपात्रात तेल लावुन अप्प्यांप्रमाणे करता येतात.

५) गुळाचा पाक नाही वापरला तरी चालेल.

ह्याला उन्नीअप्पम म्हणतात.

वाढणी/प्रमाण: 
वाढणी प्रमाण साधारण १० ते १२
अधिक टिपा: 

कृतीत पदार्थ बनवायला किती वेळ लागेल ते लिहीलेले नाही, त्यामुळे मी साधारण २० मिनिटे गृहित धरले आहेत.

माहितीचा स्रोत: 
ह्या पदार्थाची कृती मी श्री आणी सौ मासिकातुन घेतली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिलीच पाककृती ना ? अभिनंदन.
हा प्रकार आमच्या शेजार्‍यांकडून प्रसाद म्हणून येतो. गुळाचा पाक करायची गरज नसते. ( इथे पाक लिहिले कि सगळे घाबरतात ) सगळे एकत्र करुन घेतले कि झाले. तांदूळ भिजवून वाटून घेतले तर जरा रवाळ होतात.

धन्यवाद दिनेशजी. इथे जरा घाबरतच लिहीले. सृष्टी चे ही धन्यवाद तिच्या निमित्ताने इथे पाकृ कशी लिहायची ते तरी बघता आले.:स्मितः

इब्लिस, नाही, उन्नि म्हणजे लहान. उन्नीकृष्ण म्हणजे बाळ कृष्ण.

मंगलोरमधे हे दर मंगळवारी-शुक्रवारी गणपतीच्या देवळातून प्रसाद म्हणून वाटले जायचे. मला वर लिहिलेली पाकृ समजली नाही. एकदा लिहिलंय गुळाचा पाक करून त्यात तळून सोडा मग लिहिलंय की गुळाचा पाक नाही केला तरी चालेल. आप्पे तळून करत नाहीत. आप्पेपात्रामधे करतात. Sad

मंगलोरच्या आंटीनी मला दिलेल्या रेसिपीप्रमाणे मी एकदोनदाच केले आहेत. त्याची कृती अशी:

तांदूळ दोन तास भिजत घालायचे, नंतर ग्राईंडरला वाटून घ्यायचे. नंतर त्यामधे मैदा (अगदी थोडा), पातळ गूळ, वेलची पावडर, थोडे मीठ घालून चांगले मिक्स करायचे, मग एक पिकलेले केळं घालून (प्रसादासाठी नसल्यास सोडा घालायचा) मिक्स करून त्याचे आप्पेपात्रामधे तूप घालून दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होइपर्यंत भाजून घ्यायचे.

नंदिनी कृती वाचुन माझा पण आधी हाच गोंधळ झाला होता, पण हे आप्पे गोड असल्याने ते भज्यांप्रमाणे तळुन गुळाच्या दाटसर ( घट्ट कडक नव्हे) पाकात टाकावेत असे लिहीलेय. आपण जशा पाकातल्या पुर्‍या करतो किंवा मालपुवे तसे हे असावेत.

पण गुळ वापरायचा नसल्यास चवीपुरती साखर घालुन ते करावेत असे लिहीलेय. सॉरी हे सर्व मी आधी लिहायचे विसरले. मूळात दाक्षिणात्य पदार्थात मला इडली, लेमन राईस, डोसे एवढेच प्रकार चांगले जमतात्.:अरेरे:

अर्थात श्री व सौ मध्ये ज्यांनी ही केरळी कृती लिहीलीय, त्या डॉ. मीरा सुंदरराज म्हणून आहेत.

सृष्टी चे ही धन्यवाद >> माझे कसले धन्यवाद .? ...मी आप्पेपात्र आनले आहे नविन ( त्यामुळे उत्साह आहे नविन काय तरि करायचा)... तिखट आप्पे केले ...पण गोड कसे करतात ते समजत नव्हते ...दिनेशदा आणी तुम्हि रेसिपि दिलि आहे आता करेन .. आज करनार होते पन उशिर झाला..... केले कि फोटो डकवेन..

टूनटून , बरोबर आहे तुमचे,केरळी लोकांची खासियत आहे ही. ते तळूनच काढतात.

टुनटुन मस्तच. अप्पम आवडतात.
नक्कि करुन बघेन. पहिल्याच पाककृती बद्दल अभिनंदन.

पण गुळ वापरायचा नसल्यास चवीपुरती साखर घालुन ते करावेत असे लिहीलेय. >> हां! तरी मी विचार करत होते पाच नंबरची स्टेप वाचून. गूळ नाही तर गोडाचे आप्पे कसे होणार म्हणून Happy

हे आप्पे गोड असल्याने ते भज्यांप्रमाणे तळुन गुळाच्या दाटसर ( घट्ट कडक नव्हे) पाकात टाकावेत असे लिहीलेय. आपण जशा पाकातल्या पुर्‍या करतो किंवा मालपुवे तसे हे असावेत. >> ही एखादी वेगळी कृती असेल तर माहित नाही. पण त्यापेक्षा आप्पेपात्रात करणे अतिसोपे. सगळं पीठ एकत्र करून पटापटा बनवता येतात. शिवाय पाक बिघडायची भिती नाही. Happy मंगलोरला गोकुळाष्टमी आणि गणेश चतुर्थीला आणि अजून पण त्यांच्या काही सणांना बिल्डिंगमधल्या मल्याळी आंटी नेहमी आणून द्यायच्या. त्यांच्याकडेच मला हा प्रकार माहित झाला.

हे आप्पे करताना पात्रामधे साजूक तूपच (तेपण भरपूर) वापरायचे तरच तो गोल्डन ब्राऊन कलर आणि एक मस्त गोडसर वास येतो. तेल बिल वापरने का नै!!

रिया, जरा एक्स्पर्ट कमेंट्स दे बघू तुझ्या!!

धन्यवाद सगळ्यांना.:स्मितः

नंदिनी तुझी मजा आहे, नवीन ठिकाणी रहायला पण मिळतयं आणी निरनिराळ्या चवींचा आस्वाद पण घ्यायला मिळतोय्.:स्मितः

याला केरळात नै-अप्पम म्हणतात. मला नाही आवडत विशेष..
http://www.sharmispassions.com/2011/12/nei-appam-recipe-neyyappam-karthi...

केरळातले अप्पम आणि आपण करतो ते आप्पे वेगळे असतात.. केरळातले अप्पम फुगीर दोस्यासारखे असतात. अच्चपम, नीर-अप्पम, इडिअप्पम वगैरे वेगवेगळे प्रकार असतात.
मी असे अप्पम खाल्ले आहेतः
http://www.padhuskitchen.com/2013/01/appam-recipe-appam-without-yeast.html

नीर अप्पम:
नीर अप्पम म्हणजे अप्पमच पण नारळाचं पाणी वापरुन केलेले.

आणि इडिअप्पम:
http://www.padhuskitchen.com/2010/08/idiyappam-sevai-string-hopper-recip...

आणि हे अचप्पम पण:
http://www.kothiyavunu.com/2011/03/achappam-kerala-style-rosette-cookies...

असो. आता केरला कुझीन चं ज्ञान-प्रदर्शन करणं थांबवते..;)