१९९३ ते २०१३

Submitted by अनुराधा म्हापणकर on 12 March, 2013 - 04:48

१९९३ ते २०१३
===========

वीस वर्ष झाली सिरियल ब्लास्टला
त्यानंतर ही हल्ल्यांची सिरियल थांबली नाही.
कधी ट्रेन, कधी बस, स्कूटर, कधी टॆक्सी
अगदी पंचतारांकित वास्तूही त्यांनी सोडली नाही

तुटत मोडत विस्कळत राहिली मुंबई
रक्ताने माखलेली जळत राहिली मुंबई
पुन्हा जखमांनी भळभळत राहिली मुंबई 
तरी पुन्हा उभी राहून पळत राहिली मुंबई 

मुंबईला ओरबाडताना 
तिच्या दु:खाला गाडताना 
तिच्या जनतेला नाडताना 
तिची वसने फाडताना 
कुणा नेत्याचे हात नाही कचरले
फुंकर घालत तिला कुणी नाही विचारले 
की कुणा नेत्याच्या अंगी नाही संचारले 

मुंबई पोसत राहिली
थंड गोठलेल्या रक्तांचे मावळे
मुंबई सोसत राहिली
रेड अलर्ट, संचारबंदीचे सापळे

मुंबई बिचारी देतच राहिली 
शहर - राज्याला, देशालाही.. 
आणि सो कॊल्ड पांढ-या वेषालाही

या मुंबईसाठी आतातरी कोणी लढेल काय
या मुंबईचे पांग आतातरी कोणी फेडेल काय

वीस वर्ष धुमसणारी ही मुंबईची धग
विझवेल का कुणी
अतिरेकी अन त्यांच्या पोशिंद्याची रग 
जिरवेल का कुणी

कुणाच्या मनगटात सापडेल ते धैर्य 
दिसेल का मुंबईला भीती मुक्त सूर्य 

.. अनुराधा म्हापणकर
.. शांत सुरक्षित मुंबईच्या प्रतिक्षेत !
.. १२ मार्च, २०१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

<कुणाच्या मनगटात सापडेल ते धैर्य
दिसेल का मुंबईला भीती मुक्त सूर्य >

हे जे कोणाला जमेल तो सुदिन.