बागकाम (अमेरिका) सीझन २०१३

Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50

अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.

गेल्यावर्षीचा (२०१२ चा)धागा

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती

अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती

भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/

तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा

http://sproutrobot.com/

वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोडके कोल्हापुरच्या बीयांचे आहेत. कडु लागणार नाहीत. हा. Wink आणि एकदा हे दोडके लागायला लागले कि १५० पर्यंत सुद्धा लागतात. माझ्याकडे लागलेत तेवढे एका वर्षी. Happy
शुम्पी, कित्ती तक्रारी करतेस गं. इतके दिवस भाज्या लागत नव्हत्या म्हणुन कुर्कुर. आत्ता लागल्यात तरी कुरकुर. गप्प खा. Happy ~D

सॉरी सीमा. तक्रार करायचा हेतू नव्हता पण मी तसं करतेय असं वाटतय हे खरं.
मी चटणी, भाजी आणि भरीत करणार. आधिक माहितीसाठी माझी विपू बघा.

आणि मला ते आवडणार!

मला कुणीतरी या सफेद कारल्याच्या बिया द्या गं नक्की किंवा कुठून ऑर्डर केल्या ते सांगा. Happy

माझ्या बागेतली(!?) फुलं! यांचे फोटो टाकताना मला 'तीन केस उरलेत? तीन पेडांची वेणी. दोन उरलेत? दुपेडी. एकच? मग मोकळे सोडा' जोक आठवतोय. का ते माहिती नाही. Proud

गंधधुंद...

mogaraa-maayboli.jpg

मी बाई अबोली...

aboli-maayboli.jpg

लाडिक कॅप्शन्सचा पेशन्स संपला.

boganavel-maayboli.jpg

अगम्य फुलांचं झाड..

pivaLya-fulancha-zaad-maayboli.jpg

फुले नाही वेचलीस तरी कळियांसी बहरू आलाय ही एकदम नाइन्साफी हय Happy

आदित्यने दिलेल्या मोगर्‍याला ऑगस्टात असाच बहर होता. आता डॉर्मण्ट झालाय तो . ( मोगरा )
तुळशीच्या बिया इतस्ततः पडून २५-३० तरी पिल्लू रोपं उगवलीत मोगरा, रातराणी अन अळुच्या कुंड्यांमधून

मस्त आहेत फुलझाडं!
आमचाही मदनबाण डॉर्मन्ट झाला.

मला अबोलीच्या बिया हव्या आहेत मृण. पुढच्या स्प्रिंगमधे चालतील.

शूम्पे, हवेत का? बरेच पेवर्स पडलेत. Proud

सशल, अबोलीचा फोटो पहाटे सहाला काढलाय. तेव्हा अंधारात(पण) फुलत असावी.

अबोलीच्या बियांचे गुच्छ कापून ठेवलेत. हवे असल्यास कळवा.

अबोलीचा फोटो पहाटे सहाला काढलाय>> आता म्हणू का मी सकाळी सहाला नीट डोळे उघडवत नाहीत तर फुलांचा फोटो काढणे किंवा भ. मे. कसकाय करता बुवा लोक? Proud

मसाले पाठवणं एकवेळ ठीके पण पेव्हर्स नको. Happy

मृ मलापण.
लालूने डीसी गटागला रातराणीच्या झाडाची छोटीशी फांदी दिली होती. ती चक्क लागली आणि तिला तुरा पण आलाय.

केवढ्या कळ्या आल्यात मोगर्‍याला खरंच!
मी उगाचच पुन्हापुन्हा बघते आहे फोटो!

पण तू अबोलीचाच फोटो इतक्या पहाटे का काढलास?

(ह्या सर्व फुलझाडांसाठी मातीत हात घालावे लागतात का? खूप रिसर्च करावा लागतो का चांगलं पालन पोषण करण्यासाठी? कुंडीत स्नेल्स् , स्लग्ज् असले ही कुणी कुणी वस्तीला राहतात का?)

यू आर मिसिंग द पॉइंट मृ.
तुझ्या सकाळच्या पोस्टीवरुन म्हटलं मी ते. तुला टक्क डोळे उघडे ठेउअन ६ ला फोटो काढवतो तसा भ. मे ही काहीजणींना जमत असणारच की अशा अर्थाने होतं गं ते.

मोगरा खरच जबरी फुअलला आहे.

अबोली पाहून आठवलं की आईला दोनपैकी एकीचं नाव तरी अबोली ठेवायचं होतं. वाचवलं बाबांनी व्हिटो वापरुन!

>>पण तू अबोलीचाच फोटो इतक्या पहाटे का काढलास?
बाकीचेही काढले असते. पण तोवर पॅसेंजरांनी घाई केली.

अय्या शूम्पे, एक क्लिक vs भ. मे? Proud

>> ह्या सर्व फुलझाडांसाठी मातीत हात घालावे लागतात का? खूप रिसर्च करावा लागतो का चांगलं पालन पोषण करण्यासाठी? कुंडीत स्नेल्स् , स्लग्ज् असले ही कुणी कुणी वस्तीला राहतात का?

हो. Proud

सिंडे, आमच्याकडचं एखादं बाळ इन्डिपेन्डन्ट होतं का बघते.

पिवळ्या फुलांचं झाड कसलं आहे माहिती आहे का? ब्लँकेटं पांघरली तरी हिवाळ्यात पूर्णं करपतं. साधारण फेब्रूवारीपासून खोडातून फांद्या फुटतात आणि एप्रिल-मेपर्यंत ८-१० फूट उंच होऊन फुलं लागतात.

>>>> ह्या सर्व फुलझाडांसाठी मातीत हात घालावे लागतात का? खूप रिसर्च करावा लागतो का चांगलं पालन पोषण करण्यासाठी? कुंडीत स्नेल्स् , स्लग्ज् असले ही कुणी कुणी वस्तीला राहतात का?
नाही. Proud इतकी मेहेनत असती तर मी ही २-४ रोपंपण लावली नस्ती.

इकडे स्नेल्स, स्लग्ज नाहीत. पण खूप सरडे आहेत. (निळावंतीवर बसलाय त्या प्रकारचे.) झाडांमधे रोज हात घालून बसत नाही. त्यामुळे त्यांना बसू देतो.

अबोलीच्या बिया मलापण हव्यात.

झाडांमधे काहीही वस्तीला येत असलं तरी ग्लव्ह्ज घालून मॅनिक्यूअर अजिबात बिघडू न देता बागकाम करता येतं सशल Happy

कढीपत्ता पुढच्या स्प्रिंगपर्यत आमच्याकडेही मिळू शकेल कदाचित. बरीच छोटी पिल्लं आहेत सध्यातरी.

Pages