गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास

Submitted by अविनाश१ on 8 March, 2013 - 04:42

गावांच्या नावाची व्युत्पत्ती व इतिहास
प्रत्येक छोट्यामोठ्या गावाला ज्ञात-अज्ञात इतिहास असतो. एखाद्या गावाचे नाव हे का पडले याचा शोध घेण्यासाठी इतिहासात डोकावल्यास कित्येक अनाकलनीय गोष्टींची उकल होते. अगदी डोंगरातील एखाद्या लहानात लहान वाडीलादेखील काही ना काही इतिहास असतोच. कित्येक गावांची नावे तर खूपच मजेशीर असतात. त्यांचा सकृत्‌दर्शनी काहीच संदर्भ लागत नाही. सध्या मी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गावांच्या नावातील व्युत्पत्ती शोधत आहे. आपणदेखील आपल्या भागातील गावांच्या नावामागील व्युत्पत्तीची उकल झाली किंवा त्यासंदर्भात काही धागा सापडला तर तो ह्या धाग्यावर गुंफावा अशी सर्वांना विनंती आहे. जर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर जिल्हावार स्वतंत्र धागे काढावेत अशी ऍडमिनला मी विनंती करतो. धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users