Submitted by हर्ट on 1 March, 2013 - 04:47
मटकी, मुग, चवळी, हिरवे चणे, पिवळे चणे, छोले, रेड बीन्स इत्यादी धान्य मी नियमित मोड आणून वाफवतो. एक वा दोन शिट्या मोड आलेल्या धान्याच्या आत पाणी न घालता होऊ देतो. पण ते बोटचेपे होत नाहीत. जर कुकर मधेच फोडणी घालून मग पाणी ओतून शिजवले तर एक गच्च होऊन नक्की कुठले धान्य मोड आलेले होते हे कळणार नाही इतके शिजतात!!!
थोड्या टिप्स मिळतील का? धन्स.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कढण कढईत तळण बिळण केले की
कढण कढईत तळण बिळण केले की त्यालाही कढण म्हणतात.
आता कळले सासवा जावा नन्दा
आता कळले सासवा जावा नन्दा कशाला लागतात. हे असले पदार्थ त्यान्च्याकडून शिकायला मिळतात. >>>
सॉरी हां बी. पण हे वाचून हसू आवरले नाही.
मघाशी सांगायचं राहिलं, छोले / राजमा, हरभरे आणि शिजायला कठीण असणारी कडधान्यं मी ही कुकरमध्येच शिजवते. मूग, मटकी, मसूर, लाल चवळी बाहेर.
कळण मी कधी केले नाहीये पण नणंदेच्या सासूबाईंच्या हातचं प्यायले आहे. कुळथाचंच होतं ते. फारच चविष्ट. बाय द वे, भारताबाहेर कुळीथ काय नावाने मिळतात. मिळतात हे नक्की. हॉर्स ग्रॅम वगैरे का ? बरीच धान्यं असतात इं ग्रो त पण ओळखू न आल्याने आणली जात नाहीत.
मी अमेरिकेत कुळीथ आणि काळे
मी अमेरिकेत कुळीथ आणि काळे वाटाणे पाहिलेले नाहीत.
कुळीथाला ईन्ग्रजीत हॉर्स
कुळीथाला ईन्ग्रजीत हॉर्स ग्राम म्हणतात.
कुळीथ म्हणजेच हॉर्स ग्राम असं
कुळीथ म्हणजेच हॉर्स ग्राम असं मी इथेच माबोवर वाचून इंग्रो मधून आणून उसळ केली होती. (आता फाटे फुटतच आहेत तर परत एकदा खात्रीसाठी विचारते कुळीथ म्हणजेच हुलगे ना?)
हो माझी आई हुलगे हाच शब्द
हो माझी आई हुलगे हाच शब्द वापरते.
http://enjoyindianfood.blogsp
http://enjoyindianfood.blogspot.com/2008/12/kulithhorsegram-flour.html
कुळीथ म्हटल्यावर हा फोटो मिळाला नेटवर पण आमच्याकडे वापरले जाणारे कुळीथ एकदम डार्क मरुन कलरचे असतात. हे मला ओळखीचे वाटत नाहीत.
कुळीथ / कुलित्थ (हुलगे)
कुळीथ / कुलित्थ (हुलगे)
हिवाळा आला की शेंगोळे किंवा कुळीथाच्या जिलब्या घरोघर केल्या जातात. कुळीथाचे पिठलेही फार प्रसिध्द आहे. नाशिक, धुळे जिल्ह्यात वरील पदार्थ फार फार प्रसिध्द आहेत. ताकाबरोबर केलेले कुळीथाचे कालवण खूपच चविष्ट लागते. कुळीथालाच हुलगे तर संस्कृतमध्ये कुलित्थ असे म्हणतात.
कुळीथ हे अतिशय उष्ण आहेत. म्हणून कुळीथ फक्त हिवाळ्यात खातात. इतर ऋतूत त्याचा वापर करू नये. तसेच पित्तप्रकृतीच्या माणसांनी याचे जपून सेवन करावे. कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्यानेही चरबी कमी होते. अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.
मूतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथाचा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना (रीनल कोलीक) कमी करण्यासाठी वापरतात.
पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर कुळीथाचा चांगला उपयोग होतो. पोटातील जंतांवरही याचा उपयोग होतो. खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करावा.
आयुर्वेदामध्ये कुळीथ डोळ्यांना हितकर सांगितलेले आहेत. पण डोळ्यांवर थेट याचा उपयोग करू नये, तर पोटातून घेण्यासाठी याचा उपयोग करावा.
कुळीथ हे वातघ्न, कफघ्न आहेत. कुळीथाचे सार रोगी माणसास पथ्यकर आहे. सुजेवरही त्याचा उपयोग होतो.
उन्हाळ्यात, शरद ऋतूत आणि पितप्रकृतीच्या माणसांनी याचे सेवन करू नये.
साभारः http://gopalsawkar.blogspot.sg/2011/02/blog-post.html
हुलग्याची उसळ आणि
हुलग्याची उसळ आणि सार:http://www.maayboli.com/taxonomy/term/5048
बापरे प्राचीची वरची पाककृती
बापरे प्राचीची वरची पाककृती वाचून जीव वेडा झाला. उद्या फ्रीज शोधावी लागेल. नक्की असेल कुळीथ दडून बसलेले.
मी कुकरातच करते. रात्री
मी कुकरातच करते. रात्री भिजवलेले कडधान्य सकाळी पाणी काढून निथळले की, मग तेलाची हिंग टाकून फोडणी करायची.
मग कांदा परतला की त्यात धान्य टाकायचे. मग काय त्या चटण्या, मसाले घालून ६-७ मिनिटे आधी परतायचे.
मग पाणी लागेल तेवढे टाकून कूकर लावून दोनच शिट्या काढायच्या. कूकर थंड झाला की काय तो गूळ, कोथींबीर मीठ टाकायचे, एक वाफ काढून बंफ गॅस. चांगली लागते उसळ.
बी, तुम्ही शिट्या ज्यास्त काढत असणार. दुसरे म्हणजे कॉइल गॅस आहे का? त्यावर आच थंड व्हायला वेळ लागतो. कूकर बाजूला काढून थंड करायचा. मग आणखी शिजत नाही बसणार.
स्वाती_आंबोळे, कळणाची रेसिपी
स्वाती_आंबोळे, कळणाची रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद. मी कधीच हे प्यायले नाहीये. आता नक्की करून बघेन.
कढण कढईत तळण बिळण केले की त्यालाही कढण म्हणतात. >>>> हे न-कळण.
बाकी चर्चा एकंदर मजेशीर चाललीये. चालू द्या, चालू द्या.
आता कळले सासवा जावा नन्दा
आता कळले सासवा जावा नन्दा कशाला लागतात. हे असले पदार्थ त्यान्च्याकडून शिकायला मिळतात.
मग आता तू ही मिळव सासवा, जावा, नन्दा.

>>
नंदिनी, तुझी हरकत नसेल तर
नंदिनी,
तुझी हरकत नसेल तर तुमच्या कडील कुळथाचा फोटो टाकशील का कृपया?
वरचा ब्लॉग वरचा फोटो मलाही ओळखीचा वाटत नाहीये आणि कुळीथ कसे दिसतात तेही आठवत नाहीये.
रैना, उसळ करके हो गयी
रैना, उसळ करके हो गयी
रैना, इथे
रैना, इथे बघः
https://www.google.com.sg/search?hl=en&sugexp=les%3B&gs_rn=5&gs_ri=psy-a...
आजारी पडल्यावर आमच्याक्डे
आजारी पडल्यावर आमच्याक्डे मुगाचं कढण (पण मी कळणच म्हणते!
) करतात. १ वाटी अख्खे मूग मंद आंचेवर भाजायचे. वेळ लागतो, पण खरपूस कोरडेच भाजायचे. मग ८ पट पाणी घालून मंदच आंचेवर मऊ शिजू द्यायचे. मग डावाने घोटायचे. मी पावभाजीचा स्मॅशर वापरते. जास्तीत जास्त घोटून मिश्रण दाट झालं की गाळायचं. मग मात्र त्या मुगात काहीही उरत नाही, त्यामुळे आजवर तरी मी ते फेकलेच आहेत 
मग त्या गाळलेल्या पाण्यात तूप, जिरेपूड, मीठ आणि अगदी किंचित चवीसाठी साखर घालून सूपसारखं प्यायचं. एका वेळी सगळं संपत नसेल तर फ्रिजमधे टिकतं १-२ दिवस.
सोपी पण वेळखाऊ रेस्पी. मी बाकीच स्वयंपाक करताना एका बाजूला हे प्रकरण शिजायला ठेवते. त्यामुळे वेगळा वेळ नाही द्यावा लागत.
कळण फार आवडते. मृण्मयीची
कळण फार आवडते. मृण्मयीची पद्धत आवडली. (बी, यादीतुन आया कुठे गेल्या?)
Pages