मोड आलेले धान्य बोटचेपे कसे शिजवावे?

Submitted by हर्ट on 1 March, 2013 - 04:47

मटकी, मुग, चवळी, हिरवे चणे, पिवळे चणे, छोले, रेड बीन्स इत्यादी धान्य मी नियमित मोड आणून वाफवतो. एक वा दोन शिट्या मोड आलेल्या धान्याच्या आत पाणी न घालता होऊ देतो. पण ते बोटचेपे होत नाहीत. जर कुकर मधेच फोडणी घालून मग पाणी ओतून शिजवले तर एक गच्च होऊन नक्की कुठले धान्य मोड आलेले होते हे कळणार नाही इतके शिजतात!!!

थोड्या टिप्स मिळतील का? धन्स.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कडधान्यांच्या उसळी पातेल्यात करते. कुकर वापरत नाही. नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात लसूण सोनेरी परतून घ्यायचा आणि मग मोड आलेले कडधान्य घालून ते थोडे बुडेल इतके पाणी घालायचे ( कोरडी उसळ आवडत असेल तर किंचित बुडेल इतकेच पाणी घ्यावे. ) आणि पाण्याला उकळी आली की मीठ, मसाला घालून झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजवायचे. पंधरा मिनिटात बोटचेपी शिजते.

सगळ्या उसळी लसूण, मिरची आणि गूळ घालून करते.

छान अगो.. पण मी असे करुन पाहिले तर तेलाचा तवन्ग येतो. तेल कितिही कमी घाला रस्सा असेल उसळीत तर तवन्ग येतो तेलाचा पाण्यावर.

बी, माझ्यामते कडधान्य दोन प्रकारे शिजवता येतील.
एक म्हणजे कुकरमध्ये एकच मोठी शिटी द्यायची, त्याने कडधान्य गिर्रर्र शिजत नाहीत. मग खाली उतरून फोडणी द्यायची, पण याने कधी कधी मसाला/मीठ आतपर्यंत पोहोचत नाही. Sad

दुसरीकडे कडधान्याची उसळ अगो म्हणतेय तशी करायची असेल (वर शिजवून) तर शक्यतो फोडणीत तेल घालू नकोस, त्याने तवंग येतो. तेल टाकल्यावर कांदा परतून घेऊन मग कडधान्य टाकले किंवा दोन्ही एकदम टाकून चांगलं तेलावर परतून अगदी हिंग हळद नंतर वरून घातले तरीही चालते. भाजी शिजत अली की मगच तिखट मसाला घालावा.. मीठामूळे पदार्थ पटकन शिजत नाही म्हणे.. खखोदेजा Uhoh

मी केलेल्या उसळीवर कधीच तवंग आलेला नाही. अर्थात आमच्याकडे उसळींना अंगासरशीच रस असतो, फार पाणी नसते.

दक्षिणा, मी ऐकले आहे की गूळ आधी घातल्यामुळे पदार्थ शिजत नाही म्हणून तो शेवटी घालायचा. मीठही नंतर घालावे सांगतात कारण पदार्थ थोडा अ‍ॅसिडिक होतो म्हणे. हे ही खखोदेजा Happy

अगो आणी दक्षिणा बरोबर आहे तुम्ही करताय ते. ( गुळ आणी मीठ कडधान्य शिजतांना टाकले तर ते दडस होतात असे माझ्या साबा म्हणतात. ) त्यामुळे मी मटकी, मुग आधी कढईत पाण्यावर झाकण ठेऊन शिजवते. मग कांदा मसाला वगैरे टाकुन करते.

बी प्रेस्टीज चा छोटा चपटा pan / cooker घे. तो फक्त भाज्या आणी बाकी उसळी करता मस्त आहे. अर्थात त्यात छोट्या भांड्यात भात वगैरे होतो. मात्र उसळी अगदी एका शिट्टीत मोकळ्या शिजतात असे माझ्या जावेकडेच बघीतले, मी घेतलेला नाहीये.

अगो, Happy मी आधी सगळं एकत्र घालून टाकायची :(... त्यामुळे कधीच छान गुरगुरित शिजला नाही पदार्थ माझा. आता शेवटी टाकते सगळं चविढविचं Happy

बी, माझे २ पैसे...

सर्वच कडधान्यांना समान वेळ नाही लागणार. मूग पटकन, अगदी एक मिनिटात शिजतात तर वाल/ चणे / राजमा यांना वेळ लागतो. माखी दाल करताना, मोड न काढलेले, न भिजवलेले उडीद शिजवायला किमान ५० मिनिटे ( प्रेशर कूकरमधे लागतात.)

तूला जर बोटचेपेच हवे असतील तर एकदा वेळ बघून नोंदवून ठेव. तेल फक्त फोडणीतलेच नव्हे तर इतर मसाल्यातलेही ( काळा मसाला, खोबरे, दाण्याचे कूट ) यातलेही असते. जर या वस्तू प्रमाणात घातल्या असतील,
तर तेलाच्या तवंगाला घाबरायचे कारण नाही.

मूग, मटकी, मसूर हे अगदी मऊगाळ शिजवूच नयेत पण चणे / राजमा वगैरे मऊ शिजवावेत. मूग तर शून्य मिनिटात शिजतात. म्हणजे कूकरची शिट्टी जरा फिरायला लागली, कि गॅस बंद करायचा व कूकर आपोआप थंड होऊ द्यायचा.
कूकरसोबत जे कुकबुक येते त्यात बहुतेक पदार्थांना शिजायला लागलेला वेळ दिलेला असतो.

मी ऐकले आहे की गूळ आधी घातल्यामुळे पदार्थ शिजत नाही म्हणून तो शेवटी घालायचा. मीठही नंतर घालावे...)
हो, माझी आईही हेच सांगते.

स्वाती, रात्रभर भिजवू का? दुसर्‍या दिवशी वाटप लावून उसळ करायची आहे. त्यासोबत कळणं नामक प्रकार नवरा करणार आहे म्हणे. कायतरी उसळीचा रस्सा ताकात घालून वगैरे.

हो, रात्रभर भिजवायचे. मग कुकरात १-२ शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे. ते पाणी काढून घेऊन त्याचं कळण करायचं. आणि शिजलेले कुळीथ फोडणी-मसाले घालून उसळ करायची.

कळण म्हणजे कुठलंही कडधान्य (सहसा शिजायला जड असली की आधी शिजवून मग फोडणीत घालतात अशी - उदा. हरभरे) शिजवलेलं पाणी काढून त्यात थोडंसं ताक, मीठ घालायचं. हिंगजिर्‍याच्या फोडणीत हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून ती फोडणी कळणाला द्यायची आणि थोडा चटका द्यायचा. (उकळायचं वगैरे नाही.)
वरून कोथिंबीर घालून प्यायचं. हेल्दी आणि टेस्टी!! एकदा प्यायलीस की प्रेमात पडशील. कळणाच्या. Happy

स्वाती, सायो धन्यवाद. आता कुळीथ भिजत घालते. (नशीब इथे विचारलं नाहीतर उद्या फजिती झाली असती. मी आपली मुगासारखे भाजून घेतले तरी चालतील अशा समजात होते Proud )

स्वाती, कळणाची रेसिपी पण दिल्याबद्दल खास आभार. (एकूणात करायला काही भारी प्रकरण नाहीये. पण मिस्टर केन (तमिळनाडूत मिळालेले नवीन नाव) "मी कळण करेन, बाकीच तू बनव" एवढ्यातच सुटू पाहत होते. आता उसळ पण त्यालाच करायला लावते. मी आधी कळण प्यायले होते ते बहुतेक मुगाचं होतं. अजिबात आवडलं नव्हतं (मेड बाय जाऊबाई :फिदी:) आता कुळीथ उसळ आणी कळण करून पाहेन.

मोड आलेले वाल, मूग, मटकी, मसूर आणि वाटाणे तेलात हिंग घालून डायरेक्ट तेलात घालायचे. कडध्यान्याचा हारवस वास जाइपर्यंत परतून घ्यायचे. अगदी खरपूस परतायचे. मग त्यात कांदा, आलं, लसूण, इतर वाटणं घालून परतायचं. कांदा गळल्यावर, वाटणांचा उग्र वास गेल्यावर आधणाचं पाणी घालून शिजवायचचे. शिजल्यावर गूळ, मीठ आणि जे काही आंबट घालणार असू ते घालायचं. मोडावलेलं कडधान्य आधी शिजवून मग फोडणीला घालण्यापेक्षा या प्रकारानं केल्यास जास्तं चवदार लागतं.

मृ ने लिहिलेल्या पद्धतीनेच मी सगळ्या उसळी करते. जास्त टेस्टी होतात असा स्वानुभव आहे Happy

लहानपणी काही नातेवाईकांनी केलेली फार विचित्र कळणं बरेचदा प्यायल्याने आता मी ते करत / पीत नाही. Sad

चवळीचे आणि मटकी-मूग यांचे कळण तुलनेत जास्त आवडते. कुळथाचे वाचून खायची प्रचंड इच्छा झालीय, पुढच्या सुट्टीत घरी जाईपर्यंत धीर काढावा लागेल. तोपर्यंत कुळीथ पिठले झिंदाबाद.

मुगाच्या उसळीला फक्त हिरवी मिरची+ आलं. मूग बुडतील इतपतच पाणी.
मोड आलेले मूग नुसते मीठ घालून वाफवून/न वाफवताही लिंबू पिळूनही खाणारे लोक असतात. हेल्थफुल फुड.
माझ्या लहानपणी माझ्यासाठी नुसते मूग उकडून त्यात गूळ+खोबरे घालून गोड उसळ केली जायची.
बाकीच्या कडधान्यांना कांदा+ आललसूण + संडे मसाला ( मिरचीपूड त्यातच आली). वेळ आणि हौस असेल तेव्हा कांदा खोबर्‍याचे वाटण. (काळ्या वाटाण्यांना हे मस्ट). जास्त पाणी.

मोड आलेले मूग अगदी मोजकं पाणी घालून कुकरमध्ये एक शिट्टी करुन शिजवून घ्यायचे. मग तेलावर हिंग, मोहरी, जिरं, हळद, लाल सुकी मिरची घालून फोडणी करायची. त्यावर शिजवलेले मूग घालून जरा परतायचं. वरुन खोबरं, कोथिंबीर वगैरे घालून सॅलड सारखे खायचे. मस्त लागतं.

शूम्पे, कळणाची नव्हे, कळण्याची भाकरी. ती निराळी. ज्वारी+उडदाचं पीठ असतं बहुतेक त्यात. इथे मिनोतीची रेसिपी होती मला वाटतं.

कळण आणि कळण्याची भाकरीची सहीच सरमिसळ केली इथे Happy धन्य!!!!

आता कळले सासवा जावा नन्दा कशाला लागतात. हे असले पदार्थ त्यान्च्याकडून शिकायला मिळतात.

इथे सिन्गापुरात कडधान्याला चान्गले बोटभर कोम्ब येतात. मी कुकरमधे वाफवले की सगळा लगदा होऊनच बाहेर येतो.

तुमच्या टिपा वापरुन बघेन. धन्यवाद.

कळणालाच कढण पण म्हणतात का?""मुगाचं कढण" हा शब्द ऐकल्यासारखा वाटतो.

कळण आणि कळण्याची भाकरीची सहीच सरमिसळ केली इथे धन्य!!!!>> बी तू मग आता कळण्याची भाकरी कडधान्यांच्या कळणाबरोबर खा. Happy Light 1

इतके बोलून मी माझे अज्ञान उघड करण्याची मोहिम आटोपती घेते.
धन्यवाद!

Pages