बोल बच्चन बोलः अगो

Submitted by संयोजक on 28 February, 2013 - 02:34
Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: अगो
पाल्याचे नावः अरूष
वयः पाच वर्ष ९ महिने

आभारः मीना खडीकर आणि सारेगामाविषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250

एकदम मस्त गोड गायलंय. ताला-सुरात अगदी. पावसाचा आवाज, बेडूकदादा भारीच. शाब्बास अरुष Happy

फारच मस्तं गायलास रे अरूष! साउंड इफेक्ट्स भारी आहेत.

तुझ्या गाण्यात 'आई' असते हे आवडलं. Happy तू म्हंटलेलं, 'बक्का बक्का नाच रे, तुझी पिल्लं पाच रे' गाणं अजून आठवतं. गाण्याच्या शेवटी एक मुलगा "मी माझ्या आईचाऽ" असं सांगून आईकडे{?) पळाल्याचं पण आठवलं बघ. Happy

अरुष, किती गोड गायलास तू.
मृण्मयी +१. मलाही ते बक्का बक्का आठवले !!
साऊंड इफेक्टस तर फार भारी.
आई आणि आज्जी- अरुषला असलेला सुरांचा लगाव जाणवतोय. तुमचा वारसा. Happy

मस्तच म्हटलंय अरुषने. बेडकाचा आवाज सगळ्यात जास्त आवडला.

>>बक्का बक्का नाच रे, तुझी पिल्लं पाच रे'>> ह्या गाण्यातला अरुष आठवतोय पण गाणंचं आठवत नव्हतं. थॅन्क्स मृ.

धन्यवाद सर्वांना. बक्का-बक्का अजून आठवतंय हे पाहून मस्त वाटलं. सूर आहे थोडाफार गळ्यात पण आवाज, बोलण्याची-गाण्याची स्टाईल अगदी डिट्टो बाबासारखी आहे Wink

हे गाणं सादर करायची परवानगी दिल्याबद्दल मीना खडीकर आणि सारेगामा ह्यांचे आभार. तसेच परवानगी घेण्याचे काम आमच्यावतीने चिनूक्स आणि संयोजकांनीच केले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.

चिंबऽऽ चिंबऽऽ, गडगडाटानंरतचा आवाजाचा इफेक्ट - वीज आहे का ती? :), बेडकाचा आवाज, आणि गाण्याचा समारोप केल्यावर खुदकन् फुटलेलं हसू! Happy एकदम भारी अरुष!

अरे वा! आजीचं नाव काढणार की काय अरुष? अगदीच तालासुरात गायलास! आणि ते साउंड इफेक्टस....भारीच!
हो हो मलाही आठवतेय ते बक्का बक्का!

अर्रे..बोल बच्चन, तू अगदी तालासुरांत गायलं आहेस हे गाणं. आणि अर्थ समजून साउंड इफेक्ट्स पण दिलेस हे खास तुझंच हं.
ऑडिओपेक्षा व्हिडिओ रुपात पाहायला अज्जून मज्जा आली असती. Happy
'' याच्या गळ्यात सूर असेल का?'' ही चिंता मिटली ना अग्गोबाई?

सुपर्ब! एकच नंबर. तालासुरात, साउंडइफेक्ट्स सहीत आणि गोड गोड आवाजात एकदम मस्त गाणं म्हटलंय हं अरुष! शेवटचं खुदकन हसणं तर अगदी अल्टिमेट होतं. शाब्बास अरुष. Happy

अरुष, एकदम सुपर डुपर!! खुप खुप आवडलं तुझं गाणं
गोड आवाज आहे तुझा.. आई आणि आज्जी चा वरदहस्त आहे तुझ्या वर ना!! मग काय!!! Happy

क्या बात है अरुष! किती खणखणीत आणि सुरात, तालात म्हटलयंस रे गाणं. साऊंड ईफेक्ट्सपण भारी होते. असाच गोड गात राहा हं.. तुला गोड गोड पापा !

किती गोड्ड्ड्ड Happy
पॉजेस सुद्धा तालात आहेत हो Happy
खणखणीत आणि सुरात गायलंस ...... !!
शेवटचं खुदकन हसू पण मस्त Happy

Pages