कविंचे काव्य...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 26 February, 2013 - 07:40

अपल्यातून जर कवि गेले,तर अपला काय असेल सूर?
आणी कवितून काव्य गेले,तर कसा असेल त्याचा नूर? ॥ धृ ॥

अपला उदासपणा जायला,काव्य असणार नाहीत.
कुणी हे संकट दूर करावं,तर कवीच असणार नाहीत.
जगणं सगळं हराम होऊन,आयुष्य होइल भेसूर...॥१॥

कुणीतरी मग कवि व्हायला,शब्दांना खेळवत बसेल.
कल्पना आणी शब्दांचे बंध,नुसतेच 'हवेत' चाळवत बसेल.
नंतर नदीत पाणीच नसतांना,नुसता कोरडाच येइल पूर...॥२॥

मग कविची शब्दांबरोबर,जोरदार लढाई होइल.
लढता लढता नकळत तो,खरा कवि होऊन जाइल.
पण रुपकाशिवाय काव्य म्हणजे,शस्त्रांशिवाय योद्धा शूर...!॥३॥

मग कवि मनात म्हणेल,असे ना का काव्य साधे?
नसल्या कल्पना नसली रूपकं,तर उरेल...तेवढेच काव्य माझे!
अर्थच कळला नाही तर,काय करायचा बाकिचा धूर?...॥४॥

कवि आणी सामान्यजनांचा,सूर साधत इथे आलो...
इतका वेळ तुमच्यात होतो,पण आता बोंबलायला कवि झालो... Wink
पण तरिही मला स्टेजवर ढकलून,तुमच्यातून करू नका दूर...!!! ॥५॥

कोणिही कित्तीही कवि झाला,तरी गर्दी त्याला हवी असते.
अगदी कॉन्सटेबलचा डी.वाय.एस.पी.झाला,तरी त्यालाही वर्दी हवीच असते.
कारण लेबलं कित्तीही पुसली,तरी मुखवटा कसा सारायचा दूर??? ॥६॥

चला मी खूप पुराण लावलं,आणी तुंम्हीही ते ऐकुन घेतलं.
आता तुंम्हाला सांगतो मी,जाता जाता गुपित आतलं.
गर्दी शिवाय कवि म्हणजे,शेकोटी शिवाय नुसताच धूर...!!! ॥७॥

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users