माझा एसटी प्रवास

Submitted by दुसरबीडकर on 24 February, 2013 - 05:54

नमस्कार मायबोलीकर...
मी गणेश शिंदे..ग्रामिण रुग्णालयात अौषधनिर्माण अधिकारी म्हणुन कार्यरत.. तर माझ्या गावापासुन जवळपास एक तासांच्या अंतरावर मला नोकरी साठी जावं लागतं..पूर्वि मोटरसायकलने अपडाऊन करायचो पण पेट्रोलचे भाव वाढले अन सर्वसामान्य म्हणुन मीही एसटीचा आधार घेतला..
रोजच्या पर्वासात तर्हेतर्हेच्या व्यकती आणी वल्ली भेटू लागल्या..अन खडखड करित धावणार्या माझ्या मनाला अन एसटीला एक नवा आयाम मिळाला..आता प्रवासात बोअर होवू नये म्हणुन साहजिकंच माझ्या मोबाईलचे हेडफोन सतत माझ्या कानात गोचिडासारखे चिकटलेले असायचे..एक दिवस,एक खेडूत आजोबा शेजारच्या सिटवर बसले..मी आपल्याच तालात..आजोबा माझ्याकडे पाहुन काहीतरी पुटपुटले खरे पण मला हेडफोनमुळे फारसं ऎकू आलं नाही..मी थोडं जोराने त्याना विचारलं,'काय म्हणताय बाबा?' ,अन त्यांची खात्री पक्की झाली..डोळे किलकिले करतं, मला म्हटले ,कवा झालं आपरेसन?? मला वाटलं (हेडफोनने अजुनही माझ्या कानाची जागा सोडली नाही..फक्त व्होल्युम थोडा.....) बहुतेक टाईम विचारला,मी वेळ सांगीतली अन हेडफोन काढले..तर मला बाबांचे शब्द कानी पडले..आपरेसन व्हउनपन लय फरक नाही पडला वाटतं कानामंदी....अन तेव्हा मला क्लिक झालं,बहुदा मी बहिरा असुन कानाला श्रवणयंञ लावलं असल्याचा गैरसमज बाबांचा झाला होता..मनातल्या मनात अनिवार हसत अन बाबांचा गैरसमज कायम ठेवत मी पुन्हा हेडफोनच्या विश्वात रममाण झालो......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users