पनीर फ्रॅन्की / काठी रोल्स

Submitted by डॅफोडिल्स on 22 February, 2013 - 20:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

paneer franky.jpgभाजी बनवण्यासाठी साहित्य
मध्यम आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो
लाल पिवळी हिरवी ढोबळी मिरची
गाजर, बिन्स मध्यम आकारात चिरून
फ्रोझन हिरवे मटार, मक्याचे दाणे प्रत्येकी साधारण वाटीभर
२०० ग्रॅम पनीर क्युब्ज्स कापून
भाज्या परतण्यासाठी तेल
आलं लसूण पेस्ट
मुठभर कोथिंबिर बारिक चिरून
हळद, हिंग, लाल तिखट, धणे जिरे पूड, मीरपूड, आमचूर पावडर, साखर
मोझेरेला चिझ बारिक किसलेले
बटर (ऐच्छीक)
रोल्स करिता
टॉर्टीयाज किंवा पोळ्या तयार वापरु शकता.
(माझ्या लेकाला आवडतात म्हणून मी टॉर्टीयाज घरी बनवते )

टॉर्टीयाज बनवण्यासाठी
२ कप ऑल पर्पज फ्लार (कणीक घेउ शकता)
१ १/२ टी स्पून बेकींग पावडर
१ टी स्पून मीठ
२टी स्पून तेल (व्हेजीटेबल ऑईल/ ऑलिव्ह ऑईल किंवा कुठलेही खाद्य तेल)
३/४ कप कोमट दुध

क्रमवार पाककृती: 

भाजी बनवण्या साठी

फ्राईंग पॅन मधे दोन टेबल्स्पून तेल टाकून तेल तापल्यावर त्यात बारिक चिरलेला कांदा, चिमुट्भर हळद हिंग घालून परतावे.

मग त्यावर रंगीत ढोबळ्यांचे तुकडे टाकावेत. (असे केल्याने कांद्या सोबत ढोबळी मिर्ची चे तुकडे चांगले परतून भाजले जातात. चव छान येते. नाहीतर नुसत्याच शिजल्या जातात. )

कांदा गुलाबीसर झाल्यावर गाजर आणि फरसबी चे तुकडे टाकून त्यावर बारिक चिरलेला टोमॅटो, एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकावी.

नंतर आवडी प्रमाणे कमी अधीक लाल तिखट, अंदाजाने जणे जिरे मिरी पावडर आणी चविप्रमाणे मीठ घालून मग परतून पॅनवर झाकन ठेउन भाजीला एक वाफ काढावी.

पनीर चे क्युब्ज टाकावेत. एक टि स्पून आमचूर पावडर आणि थोडीशी साखर घालून मिसळून पॅन ची आच बंद करावी. वरून मुठभर चिरलेली कोथिंबीर घालावी.

ही भाजी पटकन होते जास्त शिजवण्याची किंवा परतण्याची गरज नसते. थोडिशी क्रंची छान वाटते.

आता भाजी टॉर्टीया किंवा पोळी/ चपाती मध्ये भरून रोल्स बनवायचे.

टॉर्टीयाज बनवण्यासाठी

एका मोठ्या बोल मध्ये ऑल पर्पज फ्लार / कणीक घेउन त्यात मिठ बेकिंग पावडर, तेल टाकून चांगले मिक्स करा. मग त्यात हळूहळू लागेल तसे दुध टाकुन गोळा मळून घ्या. गोळा खूप कडक वाटत असेल तर आणखी थोडे दुध टाकुन पिठ चांगले मळून घ्या. मळलेले पिठ मउ असायला हवे. दहा मिनिटे झाकून ठेवा आणि मग हव्या त्या आकाराच्या गोल पोळ्या लाटून तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्या. त्यावर छान गोल्डन ब्राउन ठिपके आले की मस्त भाजल्या जातात. टॉर्टीयाज लाटताना शक्यतो पातळसर लाटाव्यात. कारण त्यात घातलेल्या बेकींग पावडर मुळे त्या दुप्पट फुगुन आणखी सॉफ्ट बनतात. ह्या टॉर्टीयाज ला तेल लावायला लागत नाही.
( नंतर फोटो टाकते)

आता रोल्स करण्यासाठी
टॉर्टीया ला बटर लाउन तव्यावर ठेवले त्यावर मध्यभागी भाजी घालून वर चिझ टाकले रोल करुन हलकेच गरम केले. रोल उघडू नये म्हणून टूथपिक टोचून देउ शकता. किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉईल मध्ये रॅप करून देउ शकता.

सॅलड/ सेलेरी आणि आवडत्या लाल हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करायला तयार Happy

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी पुरावेत. वरील प्रमाणात भाजी वापरून आठ रोल्स होतात.
अधिक टिपा: 

भाजी ला किंवा पनीर ला झणझणीत पणा हवा असेल तर एक टेबल्स्पून गरम मसाला किंवा ऑल पर्पज किचन किंग मसाला घालावा.
नॉनव्हेज आवडत असेल तर पनीर ऐवजी कोलंबी किंवा चिकन चे तुकडे वापरुन बनवता येईल.
मुंबईतली ही फ्रॅन्की कोलकात्यात ह्याच प्रकारे व्हेजी किंवा पनीर कबाब टाकून काठी रोल्स बनवतात.

माहितीचा स्रोत: 
स्ट्रीट फूड
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृती आणि फोटो मस्तच, थोड्या वेगळ्या भाज्या घालून आजच करुन बघितले, छान झालेत.
अर्थात टॉर्टीया घरी होतेच आणलेले त्यामुळे पटकन करुन बघता आले, आणि माझ्याकडे बॉम्बे मॅजिकचा फ्रॅन्की मसाला होता तो (हळद, हिंग, लाल तिखट, धणे जिरे पूड, मीरपूड, आमचूर पावडर, साखर) ह्या सगळ्या ऐवजी वापरला.
डॅफो, हे डब्यात द्यायला चांगले वाटत आहेत पण हे गार झाले तर चांगले लागतील का?

थॅन्क्स रैना. Happy

अनु३ मी शक्यतो गरमागरम देते खायला लेकाला. ड्ब्यात नाही दिले कधीच.
पण डब्यात द्यायचे असतिल तर भाजी रॅप केल्यावर टॉर्टीयाज गरम नको करुस पुन्हा तव्यावर. वातड होईल थंड खाताना.

मस्त रेसेपी,
hungry taz.jpg
मागील आठवड्यात मी चपाती आणि त्यात पिझ्झा टॉपिंग्ज (टॉमेटो, कांदा, चीझ, चिली सॉस) वापरून फ्रॅन्की बनवली होती, आता तुमची रेसेपी ट्राय करून बघेन Happy

संपदा भरपूर धन्यवाद लाजवाब कृतीबद्दल. फोटोतुन उचलुन तुकडा तोंडात टाकावा इतका सरस फोटो आलाय. बाय द वे, टॉर्टियासाठी कणिक आदल्या रात्रीच मळुन फ्रिझमध्ये ठेवली तर चालेल का? की वातड होईल? कारण लेकीला आणी नवर्‍याला सकाळी डब्यात देण्याचा विचार करतेय.

पाकृ आणि फोटो आवडल्याचे सांगितल्याबद्दल धन्यवाद लोकहो Happy
टुन्टुन चालेल की हवाबंद डब्यात ठेव.

अरेच्या.. कालच फूड्फूड चॅनल वर "संजीव कपूर'स किचन" मध्ये याची रेसेपी पाहिली. त्याने तुमची रेसेपी करुन पाहीलेली दिसतेय.

(यावरुन संजीव कपूर माबो वर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. Lol )

आज करून बघितले. मस्त झाले. केलेला फरक
पनीर न मिळाल्याने फर्म तोफू वापरले. गाजर आणि फरसबी वापरली नाही. साखर घातली नाही. आणि चीझ पण घातले नाही. पण चव मस्त. पुढच्या वेळी तोर्तिया पण घरी करून बघणार. मुलाने पण आवडीने २ रोल्स खाल्ले. धन्यवाद. Happy

photo-14.JPGphoto-15.JPG

एम्बी, दुसर्‍या फोटोमधील रोलमधे भरावयाचे सारण काय देखणे दिसत आहे Happy पाहूनच खायची इच्छा होतेय! Happy

Pages