बोल बच्चन बोल : जयंती

Submitted by संयोजक on 21 February, 2013 - 01:09

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी: जयंती
पाल्याचे नावः सानिका
वय: पावणे तीन वर्षे

सानिका अजुन बोबडकांदा असल्यामुळे बडबडगीताचे शब्दही इथे देत आहोत:

चिव चिव चिमणी, गाते गाणी
बांधले घरटे, झाले उलटे

पिल्लू लागले रडायला

आई समजूत घालायला

लाडू दिला खायला

पिल्लू लागले नाचायला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग्गबाई! कित्ती गोड बाहुली आहे, आणि छान छान तयार होऊन दिलाय परफॉर्मन्स! जयंती, सारेगम लिटल चॅम्प्स् मध्ये लेकीची एन्ट्री पक्की.

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. "मराठी भाषा दिवस" या निमित्ताने राबवलेले सगळेच उपक्रम फार छान आहेत. "बोल बच्चन बोल" उपक्रमात या लहानग्यांना बडबडगीतं सादर करायची संधी
दिल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार!
प्रशस्तिपत्रक मस्तच आहे. सानिकाचं हे पहिलंवहिलं प्रशस्तिपत्रक बरं का!

<<जयंती, सारेगम लिटल चॅम्प्स् मध्ये लेकीची एन्ट्री पक्की>> बाई गं, असं बोबडया बोलात सानिका गाणं म्हणायला लागली की सारेगम लिट्ल चॅम्प्सचं सारेगम लाफ्टर चॅम्प्स होईल Rofl

अरे वा! मस्त आहे हा बोबडकांदा. अगदी हातवारे करत वगैरे म्हणतेय एकदम गोडू!!

बाय द वे, गाण्याला सुरवात करण्यापूर्वी कपाळाला आठ्या घालून, डावा हात नाचवत काय विचारून झालंय? ते पण फार गोड आहे! Lol

Lol ते बहुतेक 'चिव चिव चिमणी ?' ( म्हणजे आता चिव चिव चिमणी म्हणायचं ! ) असं असावं.

सायो, फीचर्स बाबासारखे आहेत खरं तर ( ती कपाळाला आठ्या घालण्याची स्टाईल पण Wink ) पण पहिल्यांदा पटकन मातृमुखीच वाटते Happy

Pages