मी न उलगडली तुझ्या पहिल्याच पत्राची घडी!

Submitted by सतीश देवपूरकर on 20 February, 2013 - 08:39

गझल
मी न उलगडली तुझ्या पहिल्याच पत्राची घडी!
थांब! गिरवू दे मला प्रेमातली बाराखडी!!

मीच होतो बिनहिशोबी एकटा बहुधा तिथे.....
घेवुनी होता उभा जो तो स्वत:ची चोपडी!

थेंब अश्रूंचा नको सांडूस येथे एकही;
रोज नेमाने इथे भरते टग्यांची चावडी!

ठेव सांभाळून स्वप्नांच्या तरी ठिक-या तुझ्या;
बांधता येईल एखादी कुणाला झोपडी!

कोणत्या शब्दात वर्णावे तुझे लावण्य मी?
कल्पना सा-या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठेव सांभाळून स्वप्नांच्या तरी ठिक-या तुझ्या;
बांधता येईल एखादी कुणाला झोपडी!

कोणत्या शब्दात वर्णावे तुझे लावण्य मी?
कल्पना सा-या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडी!<<<

शेर आवडले. गझलही.

मीच होतो बिनहिशोबी एकटा बहुधा तिथे.....
घेवुनी होता उभा जो तो स्वत:ची चोपडी!

भटांच्या स्टाइलचा पण चांगला आलाय.

ठेव सांभाळून स्वप्नांच्या तरी ठिक-या तुझ्या;
बांधता येईल एखादी कुणाला झोपडी!

फार आवडला.

नाही.

समीर असे विचारले याला कारण आहे..............

हल्ली हल्ली मायबोलीवर भटांचे नाव देखिल शिवी हासडल्यासारखे घेतात लोक!

(विषण्ण मुद्रा)

प्रसाद १९७१,
प्राध्यापक - "खोपडी" काफिया वापरुन करा ना एक शेर<<<<<<<<<<<,,

हा घे 'खोपडी' काफियाचा शेर......तुला अर्पण.........सस्नेह भेट!

मायबोलीवर टवाळी एवढी सोसूनही,
ठेवतो जागी पहा आम्ही स्वत:ची खोपडी!............इति प्रोफेसर

टीप:
(ही खोपडी फिरते आहे पण आपल्या आपल्या जागी बरे!)

तुमची खोपडी फिरली आहे काय सर स्मायलीत तरी दिसते आहे
असो वरून शेरात जागी म्हण्नजे जागेवर असेच ना मग ती एकटीच इकडे काय करते आहे ......तुमचे धड धड आहे ना ??

माझा प्रतिसाद पाहून तुमचा खोपडीवाला प्रतिसाद संपादित केला आहात हे दिसले

धन्यवाद
टीप : तुम्ही प्रतिसादातली टीप अव्यक्त ठेवली होते असे आता कृपया म्हणू नका ही विनंती Proud

खोपडी धडधाकट आहे हे दाखविण्यासाठी ती स्वत:भोती प्रदक्षिणा घालून तुम्हाला दाखवीत आहे!
घुसले का तुझ्या खोपडीत काही?
असे विचारशील म्हणूनच खोपडीखाली तळटीप डकवली होती!

प्रत्येकाचीच खोपडी बिनतडकलेली नसणार हे ध्यानात आल्याबरोबर आम्ही तळटीप डकवली!
तोस्तोवर आम्ही कुणाचे प्रतिसाद बघितलेले नव्हते!

तुम्ही म्हणताय ते बरोबरच असते असे म्हणावेच लागते ..आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसोबत वाद टाळायचा हा सर्वोत्तम "पर्याय" असतो ...........सॉरी.. उपाय !!! उपाय !!! ..उपायच म्हणणार होतो मी ... Wink

प्रतिसादांचा वीट आलाय Sad <<<

Rofl

माझ्यापुढे एक वेगळेच प्रश्नचिन्ह 'आ' वासून उभे आहे. निवडक दहात घेणारा दुसर आय डी कोणाचा?

माझ्यापुढे एक वेगळेच प्रश्नचिन्ह 'आ' वासून उभे आहे. निवडक दहात घेणारा दुसर आय डी कोणाचा?>>> >>>>>>>>>>>>>ही खबर तुम्हाला कशी समजते बेफीजी लोकांचे आय्डी तपासत असता की काय ?

टीप : तो मी नाही कृ गै न

Pages