मी न उलगडली तुझ्या पहिल्याच पत्राची घडी!

Submitted by सतीश देवपूरकर on 20 February, 2013 - 08:39

गझल
मी न उलगडली तुझ्या पहिल्याच पत्राची घडी!
थांब! गिरवू दे मला प्रेमातली बाराखडी!!

मीच होतो बिनहिशोबी एकटा बहुधा तिथे.....
घेवुनी होता उभा जो तो स्वत:ची चोपडी!

थेंब अश्रूंचा नको सांडूस येथे एकही;
रोज नेमाने इथे भरते टग्यांची चावडी!

ठेव सांभाळून स्वप्नांच्या तरी ठिक-या तुझ्या;
बांधता येईल एखादी कुणाला झोपडी!

कोणत्या शब्दात वर्णावे तुझे लावण्य मी?
कल्पना सा-या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो तुमच्या प्रतिसादाखाली बघा की '२' असा मोठा निळा आकडा आहे तो? तो काय प्रतिसाद वाचून मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा नव्हे. निवडक दहात घेणार्‍यांचा आहे.

निवडक दहांचा फारच धसका घेतलेला दिसतोय!
कोण काय निवडेल हे काय कुणाच्या हातात असते थोडेच?
आपण काय निवडायचे हे आपण ठरवू शकतो!
दुस-यांच्या निवडीवर आपण आपली आवडनिवड थोडीच थोपवू शकतो?

अहो तुमच्या प्रतिसादाखाली बघा की '२' असा मोठा निळा आकडा आहे तो? तो काय प्रतिसाद वाचून मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा नव्हे. निवडक दहात घेणार्‍यांचा आहे.>>>>>

असे आहे का ते...... मला आजवर कधी समजलेच नव्हते

धन्स बेफीजी

रियाजी! ओळखा पाहू!
ही इथल्याच मायबोलीकरांची शिकवण!
आमचे जुने प्रतिसाद काढून पहा!
स्माइलींवर आम्ही टीकाच करायचो!
पण आता इथली परिस्थिती शब्दांच्यापलीकडे गेलेली असल्याने या भावमुद्रांचा वापर आम्ही सुरू केला!

>> अहो तुमच्या प्रतिसादाखाली बघा की '२' असा मोठा निळा आकडा आहे तो? तो काय प्रतिसाद वाचून मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा नव्हे. निवडक दहात घेणार्‍यांचा आहे.
Rofl
हा काय प्रकार आहे? तिथे तर "हे लेखन आवडलेले मायबोलीकर" असे लिहिले आहे.

अहो तुमच्या प्रतिसादाखाली बघा की '२' असा मोठा निळा आकडा आहे तो? तो काय प्रतिसाद वाचून मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा नव्हे. निवडक दहात घेणार्‍यांचा आहे.>>>>>>>>>>>>> बेफी __/\__ Rofl Rofl

रियाजी!

अरे बाप्रे! अरेरे
नको अरेरे
<<<<<<<<<<,

हे बरे आहे! आधी विचारायचे व मग उत्तर दिले की, पळ काढायचा! ही कोणती रीत झाली रियाजी?

अहो तुमच्या प्रतिसादाखाली बघा की '२' असा मोठा निळा आकडा आहे तो? तो काय प्रतिसाद वाचून मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा नव्हे.<<<<<<<<<<<<

तुम्ही काय मयतांचेच आकडे मोजता काय?

तुम्ही काय मयतांचेच आकडे मोजता काय?<<<

ते मोजावे लागत नाहीत. मयतांची व गझलेतील शेरांची संख्या नेहमी समान भरते.

हे बरे आहे! आधी विचारायचे व मग उत्तर दिले की, पळ काढायचा! ही कोणती रीत झाली रियाजी?
>>>
ओ मी फक्त नाव विचारलं तर तुम्ही पुर्ण गझलप्रतिसाद वाचायची शिक्षा देताय की Sad
अस कस ओ अस कस? अस नसत काय! Proud

मयतांची व गझलेतील शेरांची संख्या नेहमी समान भरते.<<<<<<<<<
संख्यात्मकतेकडून गुणात्मकतेकडे प्रवास करायला हवा.......

संख्यात्मकतेकडून गुणात्मकतेकडे प्रवास करायला हवा.......<<<

तुम्हाला आहात तिथेच सोडून पुढे जाववत नाही मला, म्हणून थांबतोय इथेच.

Pages