Submitted by सतीश देवपूरकर on 20 February, 2013 - 08:39
गझल
मी न उलगडली तुझ्या पहिल्याच पत्राची घडी!
थांब! गिरवू दे मला प्रेमातली बाराखडी!!
मीच होतो बिनहिशोबी एकटा बहुधा तिथे.....
घेवुनी होता उभा जो तो स्वत:ची चोपडी!
थेंब अश्रूंचा नको सांडूस येथे एकही;
रोज नेमाने इथे भरते टग्यांची चावडी!
ठेव सांभाळून स्वप्नांच्या तरी ठिक-या तुझ्या;
बांधता येईल एखादी कुणाला झोपडी!
कोणत्या शब्दात वर्णावे तुझे लावण्य मी?
कल्पना सा-या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडी!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिला आणि शेवटचा हे दोन
पहिला आणि शेवटचा हे दोन आवडले.
धन्यवाद राजीव!
धन्यवाद राजीव!
सर्व शेर नखशिखांत सुंदर
सर्व शेर नखशिखांत सुंदर वाटले
धन्यवाद वैभू! खरेच की,
धन्यवाद वैभू!
खरेच की, काय?
काय म्हणतोस?
सतीशजी - सगळेच शेर छान आहेत.
सतीशजी - सगळेच शेर छान आहेत. झोपडी विशेष आवडला
कोणत्या शब्दात वर्णावे तुझे
कोणत्या शब्दात वर्णावे तुझे लावण्य मी?
कल्पना सा-या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडी!..............
kya baat hai..... mastach.....
रोज नेमाने इथे भरते टग्यांची
रोज नेमाने इथे भरते टग्यांची चावडी!
हा हा हा,बाकी छान
ठेव सांभाळून स्वप्नांच्या तरी
ठेव सांभाळून स्वप्नांच्या तरी ठिक-या तुझ्या;
बांधता येईल एखादी कुणाला झोपडी!
कोणत्या शब्दात वर्णावे तुझे लावण्य मी?
कल्पना सा-या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडी!<<<
शेर आवडले. गझलही.
मीच होतो बिनहिशोबी एकटा बहुधा
मीच होतो बिनहिशोबी एकटा बहुधा तिथे.....
घेवुनी होता उभा जो तो स्वत:ची चोपडी!
भटांच्या स्टाइलचा पण चांगला आलाय.
ठेव सांभाळून स्वप्नांच्या तरी ठिक-या तुझ्या;
बांधता येईल एखादी कुणाला झोपडी!
फार आवडला.
ही आवडली प्रोफेसर. चोपडीचा
ही आवडली प्रोफेसर. चोपडीचा शेर मस्त.
(No subject)
सर्व रसिकांचा आभारी आहे! असाच
सर्व रसिकांचा आभारी आहे!
असाच लोभ असू द्या!
समीर! भटांच्या स्टाइलचा हा
समीर!
भटांच्या स्टाइलचा हा शालजोडीतला समजायचा का?
नाही.
नाही.
(No subject)
सुंदर गझल..... आवडली एकदम.
सुंदर गझल..... आवडली एकदम.
प्राध्यापक - "खोपडी" काफिया
प्राध्यापक - "खोपडी" काफिया वापरुन करा ना एक शेर
समीर असे विचारले याला कारण
समीर असे विचारले याला कारण आहे..............
हल्ली हल्ली मायबोलीवर भटांचे नाव देखिल शिवी हासडल्यासारखे घेतात लोक!
(विषण्ण मुद्रा)
धन्यवाद भुंगा!
धन्यवाद भुंगा!
प्रसाद १९७१, प्राध्यापक -
प्रसाद १९७१,
प्राध्यापक - "खोपडी" काफिया वापरुन करा ना एक शेर<<<<<<<<<<<,,
हा घे 'खोपडी' काफियाचा शेर......तुला अर्पण.........सस्नेह भेट!
मायबोलीवर टवाळी एवढी सोसूनही,
ठेवतो जागी पहा आम्ही स्वत:ची खोपडी!............इति प्रोफेसर
टीप:
(ही खोपडी फिरते आहे पण आपल्या आपल्या जागी बरे!)
तुमची खोपडी फिरली आहे काय सर
तुमची खोपडी फिरली आहे काय सर स्मायलीत तरी दिसते आहे
असो वरून शेरात जागी म्हण्नजे जागेवर असेच ना मग ती एकटीच इकडे काय करते आहे ......तुमचे धड धड आहे ना ??
माझा प्रतिसाद पाहून तुमचा
माझा प्रतिसाद पाहून तुमचा खोपडीवाला प्रतिसाद संपादित केला आहात हे दिसले
धन्यवाद
टीप : तुम्ही प्रतिसादातली टीप अव्यक्त ठेवली होते असे आता कृपया म्हणू नका ही विनंती
खोपडी धडधाकट आहे हे
खोपडी धडधाकट आहे हे दाखविण्यासाठी ती स्वत:भोती प्रदक्षिणा घालून तुम्हाला दाखवीत आहे!
घुसले का तुझ्या खोपडीत काही?
असे विचारशील म्हणूनच खोपडीखाली तळटीप डकवली होती!
...................आफ्टरथॉट
...................आफ्टरथॉट ...........!!!!!
प्रत्येकाचीच खोपडी बिनतडकलेली
प्रत्येकाचीच खोपडी बिनतडकलेली नसणार हे ध्यानात आल्याबरोबर आम्ही तळटीप डकवली!
तोस्तोवर आम्ही कुणाचे प्रतिसाद बघितलेले नव्हते!
आफ्टर असो वा बिफोर असो थॉट
आफ्टर असो वा बिफोर असो थॉट बरोबर आहे ना वैभू?
गझल आवडली प्रतिसादांचा वीट
गझल आवडली
प्रतिसादांचा वीट आलाय
तुम्ही म्हणताय ते बरोबरच असते
तुम्ही म्हणताय ते बरोबरच असते असे म्हणावेच लागते ..आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसोबत वाद टाळायचा हा सर्वोत्तम "पर्याय" असतो ...........सॉरी.. उपाय !!! उपाय !!! ..उपायच म्हणणार होतो मी ...
प्रतिसादांचा वीट आलाय
प्रतिसादांचा वीट आलाय <<<
माझ्यापुढे एक वेगळेच प्रश्नचिन्ह 'आ' वासून उभे आहे. निवडक दहात घेणारा दुसर आय डी कोणाचा?
माझ्यापुढे एक वेगळेच
माझ्यापुढे एक वेगळेच प्रश्नचिन्ह 'आ' वासून उभे आहे. निवडक दहात घेणारा दुसर आय डी कोणाचा?>>> >>>>>>>>>>>>>ही खबर तुम्हाला कशी समजते बेफीजी लोकांचे आय्डी तपासत असता की काय ?
टीप : तो मी नाही कृ गै न
Pages