यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा

Submitted by विक्रांत-पाटील on 17 February, 2013 - 04:16

यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा

अनेकदा आपली अडवणूक होते ती पुरेशी माहिती न ठेवल्यामुळे किंवा कर्णोपकर्णी ऐकलेल्या माहितीची खातरजमा न करता तिच्यावर सरसकट विश्वास ठेवल्यामुळे. सरकार अनेकदा आवाहन करते त्या जाहिराती आपण वाचतही नाही. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून हे लिहितोय. 'आधार' साठी कंत्राटी मुले असतात; ते फक्त नाव व पत्ता नोंदवून मोकळे होतात. इतर माहिती नोंदविण्याचा कंटाळा करतात. मात्र ई-मेल व मोबाईल क्रमांक जरूर नोंदवून घ्यावेत. एजन्सीच्या माणसाने केलेल्या नोंदी योग्य असल्याची खात्री करून मगच पोचपावती स्वीकारावी. त्याने ई-मेल व मोबाईल क्रमांक लिहिलेले नसल्यास ते त्याला नोंदविण्यास सांगणे. बँक अकाउंट क्रमांकही आधारला नोंदणीच्या वेळीच जोडून घ्यावा.

आधार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :
१. ओळखीचा पुरावा (पीओआय: प्रूफ ऑफ आयडेण्टिटी)
२. रहिवाशी पत्त्याचा पुरावा(पीओए: प्रूफ ऑफ एड्रेस)

आपल्याला फक्त खालील दोनपैकी प्रत्येकाची एकेक झेरॉक्स कागदपत्रे व खातरजमा/­पडताळणीसाठी मूळ (ओरिजिनल) डॉक्युमेंट आणायची आहेत. जर ओरिजिनल जवळ नसतील तर फक्त सक्षम राजपत्रित अधिकारी किंवा पब्लिक नोटरी यांच्याकडून एटेस्टेड असलेली कागदपत्रेही खातरजमा/­पडताळणीसाठी ग्राह्य धरली जातात; ती आणावी लागतील.

ओळखीचा पुरावा (पीओआय) व रहिवाशी पत्त्याचा पुरावा (पीओए) ही दोन कागदपत्रेच महत्त्वाची आहेत. इतर सर्व रकान्यात माहिती नोंदणी एजन्सी भरेल किंवा ती ऐच्छिक आहेत. तरीही रकाना ९ मधील जे बँक अकाउण्ट आधार कार्डशी जोडायचे आहे त्याची माहिती जरूर भरावी. त्यासाठी बँक खाते क्रमांक आणि खाते असलेल्या शाखेचा आयएसएफसी कोड आपणास माहिती असावा. ज्यांच्याकडे बर्थ सर्टिफ़िकेट (जन्मदाखला), एसएसएलसी बुक/­सर्टिफ़िकेट, पासपोर्ट किंवा अ श्रेणीच्या फ़र्स्ट क्लास राजपत्रित अधिकारयाने लेटरहेडवर दिलेला जन्मदाखला या चौघांपैकी एक डॉक्युमेंट असेल त्यांनी रकाना ५ मध्ये वयाचा (एज) तपशील नोंदविताना व्हेरिफ़ाईड (पडताळलेले) बॉक्समध्ये टीक करावे. ज्यांच्याकडे जन्मतारखेची कागदपत्रे नाहीत; पण जन्मतारीख माहिती आहे त्यांनी डिक्लेअर्ड (घोषित) बॉक्समध्ये टीक करावे. ज्यांना जन्मतारीख नेमकी माहिती नाही त्यांनी फक्त अंदाजे वय लिहावे. ज्यांच्याकडे आपल्या घरी जनगणना करायला आलेल्या व्यक्तीने दिलेली एका छोटीसी स्लीप असेल त्या स्लीपरील एनपीआर नंबर (राष्ट्रीय जनगणना रजिस्टर सर्वेक्षण स्लीप क्रमांक) लिहावा.
आधार नोंदणी फॉर्म केवळ एका पानाचा अतिशय सोपा व सुटसुटीत आहे. फक्त माहिती भरताना कैपिटल लेटर्समध्ये अचूक व नेमकी भरावी. फॉर्म जरी एजन्सीच्या माणसाने भरला तरी आपण स्वत: अचूक माहिती नोंदविल्याची खात्री करून घ्यावी. पत्ता, वय व बँक खाते क्रमांक याबाबत विशेष काळजी घ्यावी.
आपण आधार नोंदणीसाठी ही माहिती जरूर लक्षात ठेवावी. इतरत्रही आपणास, आपले मित्र, नातेवाईक, शेजारी, परिचित यांना ती उपयोगी पडू शकते. नेमक्या माहितीअभावी अनेकदा गोंधळ उडतो, फसवणूक होउ शकते. आधार नोंदणीसाठी बाहेरही कुठे एक पैसाही शुल्क लागत नाही. आधार कार्डची नोंदणी कोणीही भारतभर कोणत्याही केंद्रावर करू शकतो; फक्त त्याच्याजवळ ओळखीचा पुरावा आणि जो पत्ता नोंदावितोय घराचा त्याचा पुरावा आवश्यक असतो.
आधार फॉर्म अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केलेलाही चालतो. त्यात नोंदणीच्या वेळी केंद्रावर एजन्सीमार्फत रकाना १ मध्ये जो प्रीएनरोलमेण्ट आयडी (नोंदणी क्रमांक) नोंदविला जातो. तो नंतर आधार कार्डवरही वरच्या बाजूस नमूद करून येतो. जे पूर्वीचे फॉर्म आहेत त्यात हा प्रीएनरोलमेण्ट आयडी छापील असायचा म्हणून सरकारी फॉर्मचीच सक्ती असायची. आता मात्र कोणताही विहित नमुन्यातील फॉर्म चालतो. त्यात प्रीएनरोलमेण्ट आयडी नोंदणी एजन्सी भरून देते.

१) ओळखीचा पुरावा (पीओआय: प्रूफ ऑफ आयडेण्टिटी)
(खालील १८ पैकी कोणतेही एक ज्यावर पत्ता स्पष्ट व पूर्ण नमूद असावा; त्याच पत्त्यावर पोस्टाद्वारे आधार कार्ड पाठविले जाईल.)-
पासपोर्ट, पैन कार्ड, रेशन कार्ड/पीडीएस फ़ोटो कार्ड, व्होटर्स कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी फ़ोटो आयडी कार्ड/ सरकारी कंपनीचे आयडी कार्ड, एनआरईजीएस जॉब कार्ड, नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेचे आयडी कार्ड, शस्त्र परवाना, फ़ोटो असलेले सरकारी बँकेचे एटीएम कार्ड, फ़ोटो असलेले सरकारी बँकेचे क्रेडिट कार्ड, पेन्शनर्स फ़ोटो कार्ड, फ्रीडम फ़ायटर फ़ोटो कार्ड, किसान फ़ोटो पासबुक, सीजीएचएस/­ईसीएचएस फ़ोटो कार्ड, पोस्ट खात्याने जारी केलेले पत्यासह फ़ोटोआयडी कार्ड, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटोसह राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांच्यापैकी कुणीही एकाने लेटरहेडवर दिलेले ओळखत असल्याचे पत्र, राज्य सरकारचे फोटोसह अपंग कार्ड.

२) रहिवाशी पत्त्याचा पुरावा (पीओए: प्रूफ ऑफ एड्रेस) :
(खालील ३३ पैकी कोणतेही एक ज्यावर पत्ता स्पष्ट व पूर्ण नमूद असावा; त्याच पत्त्यावर पोस्टाद्वारे आधार कार्ड पाठविले जाईल.)-
लाईटबिल, टेलिफोनबिल, रेशनकार्ड, पासपोर्ट, सरकारी बँक खात्याचे पासबुक किंवा अकाउंट स्टेटमेण्ट, मतदान ओळखपत्र, सरकारी ओळखपत्र, पाणी पट्टी बिल, घरपट्टी बिल, मालमत्ता कर भरणा पावती, क्रेडिट कार्ड स्टेटमेण्ट, एलआयसी/­इन्शुरन्स पोलिसी, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह बँकेने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारया कर्मचारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह नोंदणीकृत नियोक्ता कंपनीने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेने लेटरहेडवर दिलेले पत्र, एनआरईजीएस जॉब कार्ड, शस्त्र परवाना, पेन्शनर कार्ड, फ्रीडम फ़ायटर कार्ड, किसान पासबुक, सीजीएचएस/­ईसीएचएस कार्ड, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह खासदार/आमदार/­राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांच्यापैकी कुणीही एकाने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह सरपंचाने ग्रामपंचायतीच्य­ा लेटरहेडवर दिलेले पत्र(फक्त ग्रामीण भागासाठी), आयकर विवरण आदेश, वाहन नोंदणी पुस्तक (आरसी बुक), नोटरी केलेले सेल/लीझ/­रेण्ट करारपत्र, पोस्ट खात्याने जारी केलेले पत्यासह फ़ोटोआयडी कार्ड, राज्य सरकारने जारी केलेले आधार कार्ड काढू इच्छिणारयाचा फोटो असलेले कास्ट किंवा डोमिसाईल सर्टिफ़िकेट, राज्य सरकारचे अपंग कार्ड, एलपीजी गैस कनेक्शन बिल, पत्नीचा पासपोर्ट, वडिलांचा पासपोर्ट(अज्ञान मुलांसाठी फक्त)

आधारचा फॉर्म नंदन निलकेणी यांच्या भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करा.
http://­uidai.gov.in/­images/­FrontPageUpdates­/uid_download/­enrolmentform.pd­f

तुमच्या शहरा, घराजवळील आधार नोंदणी केंद्रांची यादी पाहा -
http://­appointments.uid­ai.gov.in/­easearch.aspx

आधार कार्ड नोंदणीसाठी ऑनलाईन वेळ निश्चित करून (आपोईन्टमेन्ट घेउन) गैरसोय टाळा-
http://­appointments.uid­ai.gov.in/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आधार कार्डा साठी apply करून एक वर्ष झाले, तरी सुद्धा अजून कार्डाचा पत्ता नाहीं . UID website चे status check केले पण अजून data recieve झाला नाही असे येते. काय करावे?

गजानन. पोस्ट ऑफिसमधे जाऊन एक फॉर्म भरून द्यायचा असतो. पोस्टमन घरी येऊन अ‍ॅड्रेस व्हेरीफाय करतो आणि ते ओळखपत्र आपल्याला मिळते. हे ओळखपत्र बहुतेक सरकारी कागदपत्रांमधे व्हॅलिड मानलेले आहे. कार्डावर फोटोदेखील असल्याने तेच कार्ड फोटो आयडी म्हणून्देखील वापरू शकतो. नवीन शहरामधे बर्‍याचदा रेंट अ‍ॅग्रीमेंट अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून वापरत नाहीत अशावेळेलाभे कार्ड फार उपयोगी पडते. हे कार्ड वैयक्तिक रीत्या मिळत असल्याने नावावर टेलीफोन्/ईलेक्ट्रिक वगैरे नसेल हे कार्ड मिळवणे अतिशय उपयुक्त. अ‍ॅड्रेस बदलल्यावर पोस्ट ऑफिसला ते ओळखपत्र रीटर्न मात्र अवश्य करावे.

विनायक परांजपे, जिथे तुम्ही आधार कार्डासाठी अ‍ॅप्लाय केलं होतं तिथे पावती दाखवून विचारा. सोबत वेबसाईटवरच्या स्टेटसचा प्रिंटआउट घेऊन जा.

नंदिनीने पोस्ट ऑफिसमधून मिळणार्‍या ओळखपत्राबद्दल सांगितलंय ते मलाही माहित नव्हतं. इथे बर्‍याच जणांना माहित नसावं.

वरदा कानिटकर आहे का?

ठाण्यात विष्णूनगर पोलिस स्टेशनच्या समोर शाहू मार्केट आणि कचराळी समोरचं महापालिकेचं ऑफिस या दोन्ही ठिकाणी ऑनलाईन अपॉईन्टमेन्ट घेऊन आधार नोंदणी करता येते आहे. रविवारीही केंद्र चालू आहे. अपॉईन्टमेन्ट मिळते आहे. मी २८ एप्रिलची शाहू मार्केटची घेऊन ठेवली आहे.

गंमत म्हणजे कार्ड आल्यावर दोन महिन्यांनी तुमचे आधार कार्ड अप्रुव्ह झाले आणि ते येतील असा SMS आला !>> असाच मेसे ज मलाही आला आणी कार्ड ही आले. पण नवरयाचे त्याचवेळी काढुन आले नाही. मग साईट वर जाऊन
enrollment number टाकुन कलरप्रिंट घेतली. हे वैध आहे.

acknowledment slip हरवली असेल तर परत नविन आधार कार्ड काढणे हाच उपाय आहे का?
माझ्या आजीची acknowledgement स्लिप हरवलिये. तिने डायरीमधे नंबर लिहून ठेवला होत स्लिप्वरचा पण वेळ लिहायची राहीली आणि वेळ माहीत असल्याशिवाय पुढे काहीच होत नाहिये. त्या help च्या ईमेल आयडीवर मेल पाठवलाय. पण लवकर उत्तर येण्याची शक्यता कमी.

आमचीही आधारकार्ड नोंदणी अखेरीस पास पडली. आधी अपॉइण्टमेण्ट आणि मग नोंदणी असे न होता एका फेरीत आणि कसलेही फाटे न फुटता पाऊणतासात सगळ्यांची नोंदणी झाली. आम्ही सगळ्या कागदपत्रांचे व्यक्तिनिहाय बाड, त्यांच्या झेरॉक्षी, अशा सगळ्या तयारीनिशी सगळ्यांच्या वेळा जुळवून धाकधुकत गेलो होतो. पण एका पासपोर्ट वर सगळे भागले. बाकी कसलेच कागदपत्र लागले नाही. मला फार म्हणजे फारच उपकृत वाटतेय. Proud

माझा एक प्रश्न आहे -
तिथल्या दोन वेगवेगळ्या काऊंटरांवर आमच्या नोंदी झाल्या. पहिल्या काऊंटरावर ज्या नोंदी झाल्या त्यात जन्मतारखेच्या पुढे 'व्हेरीफाईड' असा शेरा आहे आणि आधारकार्ड नोंदणीसोबत बँकखात्याची नोंदही झाली आहे. दुसर्‍या काऊंटरावर ज्या नोंदी झाल्या त्यात जन्मतारखेच्या पुढे 'डिक्लेअर्ड' असा शेरा आहे आणि आधारकार्डासोबत बँकखात्याची नोंदही केलेली नाही. यामुळे काही फरक पडेल का? जन्मतारखेच्या पुढे डिक्लेअर्ड' ऐवजी 'व्हेरीफाईड' अशी दुरुस्ती तसेच कुटुंबातल्या ज्यांची बँक खात्याची नोंद झालेली नाही तीही करून घ्यावी का?

डिक्लेअर्ड वा वेरिफाईडने काही फरक पडत नाही.

बँक अकाऊंट साठी बँकेतच एक फॉर्म भरून द्यावा लागतो. जमेल तेव्हा करून ठेवा. कुटुंबप्रमुखाचे आधी करावे.

ज्यांचा HP चा गॅस आहे, ते लोक सबसिडीसाठी आपल्या आधारक्रमांकाची नोंदणी ऑनलाईन करू शकतात. त्यासाठी एजन्सीच्या कार्यालयात जायची आवश्यकता नाही.

१. HP च्या वेबसाईटीवर जाऊन आधी तुमचं लॉगीन आकाऊंट उघडा. http://dcms.hpcl.co.in/ConsumerPortal/Logging/SecureLogin.aspx

२. लॉगीन केल्यावर पानाच्या तळाशी Check /Provide your Aadhaar No असा पर्याय येतो. तिथे जाऊन तुमचा आधारक्रमांक नोंदवा.
http://dcms.hpcl.co.in/ConsumerPortal/SecurityProfile/UpdateAadharNumber...

किंवा

सिलिंडर बुक करण्यासाठी HP चा जो ऑटोमेटेड फोन क्रमांक त्यावरही हल्ली ही सुविधा उपलब्ध केली आहे.

गजानन यांनी दिलेल्या माहितीत थोडी भर.

अँड्रॉईड स्मार्ट फोन वाल्यांसाठी एचपी कं चे ऑफिशिअल अ‍ॅप आहे. एकदा तिथे लॉगिन अकाऊंट उघडले, की ते अ‍ॅप डा.लो. करून ठेवा.

ऑनलाईन रिफिल बुकिंग, तुमची रिफिल ऑर्डर ट्रॅक करणे. प्रिफर्ड डेट्/टाईम ऑफ डिलिवरी इ. तिथून करता येते. सबसिडी प्राप्त होणार की नाही, आधार लिंकिंग झाले की नाही इ. देखिल समजते.

(ता.क. पहिले वाक्य 'यांच्या माहितीत' असे झाले होते. त्याचा अर्थ जरा वेगळाच निघत होता, म्हणून संपादित केले.)

आधारकार्डावर पत्ताबदल करून घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.

या https://ssup.uidai.gov.in/web/guest/update दुव्यावर जाऊन तुमचा आधारकार्ड नंबर द्या. आधारकार्ड काढताना नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो दिलेल्या रकान्यात टाकून पुढे गेल्यावर पुढे ४ सोप्या पायर्‍या आहेतः

१) नवीन पत्ता भरा.
२) भरलेला पत्ता तपासून पाहा आणि पुढे जा.
३) अ‍ॅड्रेसप्रूफची रंगीत स्कॅन कॉपी अपलोड करा आणि पुढे जा.
४) यानंतर तुमच्या या विनंतीवर पुढची प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या दोन BPOs चे पर्याय दिसतील. त्यातील एक निवडा आणि पुढे जा.

(ही निवड करताना दोन बीपीओंपैकी कोणत्याकडे किती विनंत्या आल्या आहेत आणि त्यांचा विनंत्या हातावेगळ्या करण्याचा वेग काय आहे. इ. माहिती तिथे दिसेल. ती बघून योग्य त्या बीपीओची निवड करा.)

यानंतर तुम्हाला एक URN क्रमांक मिळेल. तो स्टेटस ट्रॅक करण्यासाठी वापरावयाचा आहे.
नोंद केलेल्या मोबाईलनंबरवरही URN क्रमांकाचा एक मेसेज येईल.
या दुव्यावरून स्टेटस बघता येईलः https://ssup.uidai.gov.in/check-status

पत्ताबदल झाल्यानंतर नवीन आधारकार्ड इथून डाऊनलोड करता येईलः http://www.aadharcardkendra.org.in/online-adhar-card-download-possible-1...

नवीन पत्त्यासह आधारकार्ड नवीन पत्त्यावर घरी येते का, ते माहीत नाही.

हो, अनिवार्य नाही पण ते अ‍ॅड्रेस प्रूफ आणि फोटो आयडेंटिटी प्रूफ म्हणून ग्राह्य धरले जाते.

Pages